पोटावरची चरबी (Weight Gains) कमी करण्यासाठी आपण अनेक उपाय करून पाहतो (Belly Fat). पण काही उपाय फेल तर काही उपायांमुळे वेट लॉस करण्यास मदत होते. काही जणांचे हात - पाय बारीक पण पोट सुटत जाते (Healthy Tips). सुटलेल्या पोटामुळे शरीराचा आकारही बिघडतो (Weight loss). पोटाची चरबी वाढली की, गंभीर आजारांचा धोकाही वाढतो.
फिगर खराब दिसल्यावर आपण आपल्या आवडीचेही कपडे घालणं टाळतो. पोटाची चरबी कमी करणे अवघड काम. पण आपण काही घरगुती उपायांनी कमी करू शकता. यासाठी विशेष मेहनत घेण्याची गरज नाही. वाढलेलं वजन आणि सुटलेलं पोट कमी करण्यासाठी, ४ उपाय करून पाहा. कोणते उपाय फॉलो केल्याने, वजन कमी होतं? याची माहिती फंक्शनल मेडिसिन एक्स्पर्ट शिवानी बाजवाने इन्स्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर करत केली आहे(5 Ways to Lose Belly Fat and Live a Healthier Life).
पाण्यात घाला सी - सॉल्ट
पाण्यात सी - सॉल्ट घालून प्यायल्याने वेट लॉससाठी मदत होते. जास्त भूक लागत नाही. शिवाय खाल्लेलं व्यवस्थित पचतं. त्यामुळे पाण्यात सी - सॉल्ट घालून प्या.
ना डाएट - ना व्यायाम; फक्त दिवभारात 'एवढे' लिटर पाणी प्या; बघा वजनातला फरक झ्टपट
लिव्हर डिटॉक्स चहा प्या
लिव्हर डिटॉक्समुळे पोटाची चरबी लवकर कमी होते. हे शरीरातील विषारी पदार्थ काढून टाकते आणि पोटावरील चरबी कमी करण्यास मदत करते. यासाठी डँडेलियन चहा घेऊ शकता. हे शरीरातील विषारी पदार्थ काढून टाकण्यास आणि वजन कमी करण्यास उपयुक्त आहे.
हळू हळू अन्न चावून खा
अन्न हळूहळू चघळल्याने शरीराला अन्न पचण्यास मदत होते. यामुळे शरीराला पोषक तत्वे शोषण्यास मदत होते. याशिवाय अन्न लवकर पचल्याने पोटाची चरबीही लवकर कमी होते.
पुरेशी झोप घ्या
जर आपले कोर्टिसोल जास्त असेल तर, पोटाची चरबी कमी करणं कठीण होईल. अपूर्ण झोपेमुळे देखील कोर्टिसोल वाढू शकते. त्यामुळे दररोज पुरेशी झोप घ्या. पुरेशी झोप मिळाली तर, तणावाची पातळी कमी राहते. कोर्टिसोल कमी होईल आणि पोटाची चरबी करण्यास मदत होईल.
लेकीसाठी काहीपण! मार्क झकरबर्ग लेकीसाठी झाला नेल आर्टिस्ट, पाहा कशी लावली नेल पॉलिश
प्रोटीन जास्त आणि कार्ब्सचे प्रमाण कमी करा
पोटाची चरबी कमी करण्यासाठी आहारात कार्ब्सचा समावेश करा. कार्ब्स पचायला खूप वेळ लागतो. त्यामुळे कॅलरीज लवकर बर्न होत नाही. म्हणून, पास्ता, ब्रेड आणि भाताऐवजी, प्रोटीनयुक्त पदार्थ खा. प्रोटीनयुक्त पदार्थ खाल्ल्याने लवकर भूक लागत नाही. ज्यामुळे वेट लॉसमध्ये मदत होते.