Lokmat Sakhi >Fitness > सकाळी ५ चुका करता म्हणून भरभर वाढते वजन, व्यायाम आणि डाएटचाही होणार नाही असर

सकाळी ५ चुका करता म्हणून भरभर वाढते वजन, व्यायाम आणि डाएटचाही होणार नाही असर

5 weight loss diet mistakes that can make you gain weight : कितीही व्यायाम-डाएट फॉलो करा, सकाळी ५ चुका करत असाल तर वजन वाढणारच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 30, 2024 10:50 AM2024-01-30T10:50:00+5:302024-01-30T10:50:01+5:30

5 weight loss diet mistakes that can make you gain weight : कितीही व्यायाम-डाएट फॉलो करा, सकाळी ५ चुका करत असाल तर वजन वाढणारच

5 weight loss diet mistakes that can make you gain weight | सकाळी ५ चुका करता म्हणून भरभर वाढते वजन, व्यायाम आणि डाएटचाही होणार नाही असर

सकाळी ५ चुका करता म्हणून भरभर वाढते वजन, व्यायाम आणि डाएटचाही होणार नाही असर

वडीलधारे लोकं आपल्याला नेहमी सकाळी लवकर उठण्याचा (Morning Habits) सल्ला देतात. सकाळी लवकर उठून काम केल्याने प्रॉडक्टिव्हिटी वाढते. शिवाय संपूर्ण दिवसभरातील कामं भरभर पूर्ण होतात. सकाळी लवकर उठण्याचा फायदा आरोग्याला होतो. पण सकाळी नकळत घडणाऱ्या चुकांमुळे वजन वाढते, शिवाय आपण विविध आजारांना आमंत्रणही देतो (Weight Loss).

मुख्य म्हणजे जर आपण वेट लॉस करत असाल आणि सकाळच्या वेळेस ५ प्रकारच्या चुका होत असतील तर, वजन कमी होण्याऐवजी वाढू शकते (fitness). वजन कमी करताना सकाळी कोणत्या चुका टाळायला हव्या? पाहा(5 weight loss diet mistakes that can make you gain weight).

सकाळी उठताच एक ग्लास पाणी न पिणे

बऱ्याच जणांना सकाळी पाणी न पिण्याची सवय असते. पण ही सवय आरोग्याच्या दृष्टीने योग्य नाही. काही जण आंघोळ केल्यानंतर लगेच नाश्ता करतात. नाश्ता केल्यानंतर पाणी पितात. पण सकाळी उठल्यानंतर आधी एक ग्लास पाणी प्यावे. नियमित सकाळी एक ग्लास पाणी प्यायल्याने चयापचयावर मोठा प्रभाव पडतो. जे शरीरातील वाईट विषारी पदार्थ काढून टाकण्यास मदत करते.

काय सांगता! फळांचा रस प्यायल्याने वाढते वजन? काय खरं काय खोटं? संशोधक सांगतात..

सूर्यप्रकाश न घेणं

सकाळी सूर्यप्रकाश घेण्याचे अनेक फायदे आहेत. नॅशनल लायब्ररी ऑफ मेडिसिननुसार, व्हिटॅमिन डी मिळविण्यासाठी सकाळी ११ ते दुपारी २ दरम्यान सूर्यप्रकाश घेण्यासाठी बाहेर पडावे. हाडांच्या आजारांनी त्रस्त असलेल्या रुग्णांसाठी दुपारची वेळ सर्वोत्तम मानली जाते.

साखरयुक्त चहा आणि कॉफी पिणे

बऱ्याच जणांची सकाळ कॉफी किंवा चहानेच होते. जर आपण देखील सकाळची सुरुवात चहा किंवा कॉफीने करत असाल तर, वेळीच ही सवय मोडा. साखर वगळून चहा, कॉफी किंवा ग्रीन टी प्या. यामुळे चयापचय क्रिया बुस्ट होते. शिवाय पचनक्रियाही सुधारते. जर आपण सकाळची सुरुवात साखरयुक्त पेयाने करत असाल तर, वजन वाढू शकते.

घाईघाईत बकाबका ५ मिनिटांत जेवता? संशोधन सांगते, वजन वाढण्यापासून पित्ताच्या त्रासाचं महत्त्वाचं कारण

ब्रेकफास्ट न करणे

न्याहारी करणे आणि ते योग्य वेळी करणे अत्यंत गरजेचं आहे. पण जर आपण ब्रेकफास्ट स्किप करत असाल तर, याचा थेट दुष्परिणाम आरोग्यावर दिसून येतो. ब्रेकफास्ट नेहमी हेल्दी पदार्थांनी करावा. जास्त साखर किंवा लोणीचा वापर पदार्थात करू नका. सकाळी ब्रेकफास्ट वगळू नका, सकाळचा नाश्ता अवश्य खा.

गरजेपेक्षा जास्त झोपणे

झोप पूर्ण नाही झाली, किंवा आळस आला की आपण जास्त वेळ अंथरुणात पडून असतो. यामुळे बाकीचा दिनक्रम बिघडतो. शिवाय आपली सकाळी पाणी पिण्याची सवय, नाश्ता वेळेवर न करणे यासह इतर पुढील कार्य व्यवस्थित पूर्ण होत नाही. त्यामुळे वेळेवर सकाळी उठणे गरजेचं आहे.

Web Title: 5 weight loss diet mistakes that can make you gain weight

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.