नागपंचमीनंतर सणावाराला सुरुवात होते. ११ दिवसांचा गणेशोत्सव सर्वत्र साजरा होत आहे. या दिवसात आपण गोड पदार्थ जास्त प्रमाणात खातो. त्यानंतर दिवाळीत गोड, तिखट, नमकीन पदार्थ खातो. सणासुदीच्या दिवसात आपल्याला बारीक तर दिसायचे आहेच, परंतु हे पदार्थ खाल्ल्यानंतर वजन झपाट्याने वाढते. वजन वाढणे ही जागतिक समस्या बनली आहे. सणासुदीच्या दिवसात बारीक, सुडौल दिसायचं असेल तर, आठवडाभरासाठी वेट लॉस प्लॅन फॉलो करून पाहा. या वेट लॉस प्लॅनमुळे आठवडाभरात आपल्याला फरक दिसून येईल.
योग प्रशिक्षक कुमार सौरव सांगतात, 'वजन कमी करणं ही खरंतर अवघड प्रोसेस आहे. वजन लवकर वाढते, पण कमी होताना खूप वेळ लागतो. वजन कमी करण्यासाठी वर्कआउट आणि डाएटला फॉलो करणं अत्यंत गरजेचं आहे. जर आपल्याला सुडौल शरीर हवं असेल तर, आठवडाभर या वेट लॉस प्लॅनला फॉलो करून पाहा'(5 weight loss tips that always work).
हायड्रेट राहा
वजन कमी करताना स्वतःला हायड्रेट ठेवा. दिवसातून दर मिनिटाला पाणी प्या. पाणी प्यायल्याने खूप फरक पडतो. पाणी प्यायल्याने भूक कमी लागते. ज्यामुळे आपण सतत उलट सुलट खाणं टाळतो. शरीराला हायड्रेट ठेवल्याने चयापचय बुस्ट होते. पुरेशा प्रमाणात पाण्यासोबत नारळ पाणी आणि फळांचा ज्यूस देखील पिऊ शकता.
सुटलेले पोट कमी करायचे? ४ पैकी १ डाळ रोज खा, पोट होईल सपाट लवकर
कार्बोहायड्रेट आहारातून वगळा
तज्ज्ञांच्या मते, 'जर आपल्याला आठवडाभरात वजन कमी करायचं असेल तर, आपल्या आहारातून कार्बोहायड्रेट्स वगळा. जर आपल्याला आठवड्यात ०.५ ते ०.७ किलो वजन कमी करायचं असेल तर, ७५० हून कमी कॅलरीजचे सेवन करा. नियमित प्रोटीनयुक्त आहार खा. यामुळे पोट दीर्घकाळ भरलेले राहते.
फळ आणि उकडलेल्या भाज्या खा
वजन कमी करण्यासाठी आहारात फळे, सुका मेवा, उकडलेल्या भाज्या, सूप, चीज, ताक यांचा समावेश करा. फळे शरीराला हायड्रेट ठेवतात. यासह आवश्यक पोषक तत्त्वे देतात. दुग्धजन्य पदार्थ प्रथिने आणि कॅल्शियमयुक्त असतात. ज्यामुळे शरीराला दिवसभर काम करण्याची उर्जा मिळते. उकडलेल्या भाज्या खाल्ल्याने दीर्घकाळ भूक लागत नाही.
‘जवान’फेम अभिनेत्री नयनताराचे ६ फिटनेस रुल्स, तिशीनंतरही दिसते कमाल सुंदर
व्यायाम करा
वजन कमी करण्यासाठी दररोज रनिंग करा. दररोज ३० मिनिटे रनिंग केल्याने वजन कमी होण्यास मदत होते. रनिंग केल्याने संपूर्ण शरीराचा व्यायाम होतो. नियमित ३० मिनिटं रनिंग केल्यामुळे ५०० कॅलरीज बर्न होतात.
योग
फिजिकल इंटेंस वर्कआउट व्यतिरिक्त आपण योग करू शकता. किमान एक तास योग करायला हवा. दररोज आपण सूर्यनमस्कार, धनुरासन आणि उत्कटासन ही योगासने करू शकता. यामुळे मानसिक आणि शारीरिक आरोग्य सुधारते.