Join us  

5 yoga asanas to practice daily : आलिया भटसारखी परफेक्ट फिगर हवी? तिची ट्रेनर सांगते करा 5 आसनं नियमित, व्हा ग्लॅमरस फिट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 22, 2022 3:35 PM

5 yoga asanas to practice daily : योगामुळे आरोग्य उत्तम राहण्यास तर मदत होतेच पण मनही शांत राहण्यास मदत होते. पाहूयात कोणती आसने नियमीत करायला हवीत...

ठळक मुद्देसकाळी उठल्यावर फोन चेक करण्यापेक्षा ५ सोपी आसनं केल्यास त्याचा नक्कीच फायदा होतोसेलिब्रिटी योगा थेरपिस्ट सांगते दररोज करायच्या आसनांविषयी...

नुकतेच आलिया भट आणि रणबीर कपूर या बॉलिवूडमधील क्यूट जोडीचे लग्न झाले आणि त्यांची फॅशन, फिगर, अभिनय याविषयावर जोरदार चर्चा रंगल्या. आलिया भट जितकी क्यूट आहे तितकीच ती फिटनेस फ्रिकही आहे. तिची फिगर पाहून आपल्यातील अनेकींना आपलीही अशी फिगर हवी असे वाटत असेल. आलिया बॉलिवूडमध्ये यायच्या आधी खूप जाड होती. अतिशय कष्टाने तिने आपले वजन कमी केले असून आता तिची परफेक्ट फिगर असण्यामध्ये ती करत असलेल्या फिटनेसचा मोठा वाटा आहे (5 yoga asanas to practice daily). आलिया अनेकदा योगा करत असल्याचे तिच्या सोशल मीडिया हँडल्सवरुन समजते. मध्यंतरी तिने घरातल्या घरात मॅटवर वेगवेगळी आसने करत असल्याचा व्हिडिओ शेअर केला होता. योगामुळे आरोग्य उत्तम राहण्यास तर मदत होतेच पण मनही शांत राहण्यास मदत होते. 

(Image : Google)

प्रसिद्ध योगा थेरपिस्ट अनुष्का परवानी सेलिब्रिटी योगा टिचर म्हणून प्रसिद्ध आहे. करीना कपूर, अनन्या पांडे आणि आलिया भट यांसारख्या बॉलिवूडमधील आघाडीच्या अभिनेत्रींना ती नेहमी योगाचे धडे देत असते. नुकताच अनुष्का हिने एक व्हिडिओ आपल्या इन्स्टाग्रामवर शेअर केला असून त्यामध्ये तिने पाच आसने सांगितली आहेत. सकाळी उठल्यावर आपण ही आसने नियमित केल्यास त्याचा आपल्या आरोग्यासाठी अतिशय चांगला फायदा होईल असे ती सांगते. सकाळी उठल्याउठल्या मोबाईल आणि सोशल मीडिया पाहण्यापेक्षा मॅट ओपन करुन योगासने केल्यास त्याचा नक्कीच चांगला उपयोग होईल. यामुळे तुम्ही शारीरिकदृष्ट्या तर सक्षम राहालच पण मानसिकदृष्ट्याही खंबीर राहायला याची मदत होईल. या आसनांनी आपली ताकद वाढेल, पचनशक्ती सुधारेल आणि भिती कमी होऊन फोकस वाढण्यास मदत होईल. योगा क्लासमध्ये एका मॅटवर ही आसने ती अगदी सहज करत असल्याचे दिसते, पाहूयात यामध्ये अनुष्का कोणकोणती आसने सांगते.  

१. बटरफ्लाय पोज

दोन्ही पाय जांघेच्या जवळ घेऊन पायाची फुलपाखरासारखी पोज यामध्ये केली जाते. दोन्ही पायांना, मांड्यांना आणि मणक्यालाही यामुळे चांगला ताण पडतो.

(Image : Google)

२. विपरीत करणी

पाठ जमिनीवर टेकवून पाय भिंतीला टेकून सरळ रेषेत ठेवावेत. दोन्ही हात जमिनीवर बाजूला पसरावेत. यामुळे शरीर रिलॅक्स व्हायला चांगली मदत होते. 

(Image : Google)

३. भुजंगासन

पोटावर झोपून दोन्ही हात खांद्यापाशी ठेवायचे आणि कंबरेतून शरीर वर उचलायचे. यामध्ये हात, पाय, मणका, पाठ सगळ्याला ताण पडत असल्याने संपूर्ण शरीरासाठी हे आसन अतिशय चांगले असते. 

(Image : Google)

४. पवनमुक्तासन

पाठीवर झोपून दोन्ही पाय गुडघ्यात वाकवून आपल्या जवळ ओढून घ्यायचे. यामुळे पोटाला ताण पडून पोटात साचलेला वायू बाहेर पडण्यास मदत होते.

(Image : Google)
 

५. अर्ध मस्त्येंद्रासन 

दोन्ही पाय जमिनीवर सरळ ठेवावेत एक पाय गुडघ्यात वाकवून दुसऱ्या पायाच्या बाजूला ठेवावा. कंबरेतून वळून हात या पायाच्या बाजूला घ्यावा. यामुळे संपूर्ण शरीराला ताण पडतो.  

(Image : Google)

 

टॅग्स :फिटनेस टिप्सयोगासने प्रकार व फायदेआलिया भट