वाढतं वजन कमी (Weight Loss) करण्यासाठी आपण खटाटोप करत असतो. आपले वजन हे बीएमआय इंडेक्सनुसार असायला हवे. कधी जिममध्ये घाम गाळतो. तर कधी योगभ्यास तर कधी डाएट फॉलो करतो. बऱ्याचदा या तिन्ही गोष्टी करूनही वजन घटत नाही. खाण्याच्या चुकीच्या सवयी आणि जीवनशैलीमुळे वजन वाढते (Fitness Tips). शिवाय अपुरी झोप, हालचाल कमी, व्यायामाचा अभाव यामुळेही वजन वाढते.
जर आपल्याला वजनासह इतर आजारांपासून लांब राहायचं असेल तर, आयुर्वेदानुसार काही वजन कमी करण्याच्या पद्धती अवलंबल्या हव्या (Ayurvedic tips). या आयुर्वेदिक पद्धती जीवनशैलीमध्ये समाविष्ट केल्याने आरोग्याला बराच फायदा मिळतो. '६' प्रकारचे आयुर्वेदिक बदल केल्याने फक्त वजन नसून, गंभीर आजारांचा धोकाही टळतो(6 Ayurvedic Diet Tips To Lose Weight And Cut Belly Fat).
वजन कमी करण्यासाठी काही आयुर्वेदिक पद्धती
हलका आहार घ्या
ऑन्ली माय हेल्थ या वेबसाईटनुसार, आयुर्वेदात हलके पदार्थ खाण्याचा सल्ला दिला जातो. कारण ते शरीरात लवकर पचते आणि वजन वाढत नाही. तसेच, ते शरीरात कफ आणि पित्त तयार होण्यापासून रोखते. मुख्य म्हणजे आपण रात्रीच्या वेळेस जड नसून हलके अन्न आवर्जून खायला हवे.
कोमट पाणी प्या
रिकाम्या पोटी गरम किंवा कोमट पाणी प्यायल्याने शरीरातील विषारी पदार्थ बाहेर टाकण्यास मदत होते. याशिवाय, याचे नियमित सेवन करणे चयापचय सुधारण्यासाठी फायदेशीर ठरते. चयापचय बुस्ट झाल्याने शरीरातील कॅलरीज बर्न करण्यास मदत होते. याशिवाय पचनसंस्थाही निरोगी राहते.
व्यायाम किंवा योग
आपल्याला वेळापत्रकातून स्वतःसाठी वेळ काढणं गरजेचं आहे. नियमित योग किंवा व्यायाम करा. व्यायामामुळे चयापचय बुस्ट होते. शरीर कायम सक्रीय आणि फिट राहते. शिवाय योग केल्याने एकाग्रता वाढते. त्यामुळे शरीराला व्यायामाची सवय लावा.
बिना हेल्मेट-ट्रिपल सीट त्यात अश्लील रोमान्स; मुलींनो हे काय वागणं म्हणायचं? -व्हायरल व्हिडिओ
योग्य वेळी अन्न खा
आरोग्यदायी खाण्यासोबतच वेळेवर खाणेही आयुर्वेदात महत्त्वाचे मानले जाते. जर आपण आपल्या जेवणात जास्त अंतर ठेवल्यास, तर आपण पुढच्या जेवणामध्ये जास्त पदार्थ खाल. ज्यामुळे शरीरात जास्त कॅलरीजचे प्रमाण वाढेल. आपल्या प्रत्येक जेवणामध्ये ४ तासांचे अंतर ठेवा.
रात्री उशिरा खाऊ नका
काही लोकांना असे वाटते की, रात्रीचं जेवण स्किप केल्याने वजन कमी होते. पण हे चुकीचे आहे, वेळेत रात्रीचं जेवण करायला हवे. पण जर आपण रात्रीचं जेवण उशिरा केलात तर, ही सवय वजन वाढण्याचे मुख्य कारण बनू शकते. कारण रात्रीचं उशिरा जेवल्याने अन्न पचायला वेळ मिळत नाही, ज्यामुळे वजन वाढू शकते. त्यामुळे झोपण्याच्या ३ ते ४ तास आधी अन्न खावे.
पुरेशी झोप घ्या
आयुर्वेदात वजन कमी करण्यासाठी विश्रांती आवश्यक मानली जाते. पुरेशी झोप न मिळाल्यास ताण वाढू शकते. जास्त तणावामुळे शरीरात कोर्टिसोल हार्मोनचे उत्पादन वाढू लागते. ज्यामुळे वजन वाढते. त्यामुळे दररोज ७ ते ९ तासांची झोप घ्या.