उंची वाढणं हे अनुवंशिक आहे, पण उंची वाढविण्यासाठी (exercise for increasing children's height in marathi) काही प्रमाणात आपल्या शारिरीक हालचालीदेखील कारणीभुत ठरत असतात. जर लहान मुलांच्या शरीराला योग्य तो व्यायाम पुरेशा प्रमाणात, योग्य वयात मिळाला तर नक्कीच त्यांच्या उंचीत फरक पडू शकतो. जी मुले बुटकी असतात, त्यांना लहानपणी त्याचे काही वाटत नाही. पण मोठी झाल्यावर मात्र त्यांना त्यांच्या उंचीमुळे चारचौघात विनाकारण कॉम्प्लेक्स येऊ शकतो. उंचीचा आणि यश मिळविण्याचा, आत्मविश्वासाचा काहीही संबंध नाही. पण तरीदेखील उंची नसल्यामुळे आत्मविश्वास हरवून बसणारी अनेक तरूण मुले आपण आपल्या सभोवताली नेहमीच बघतो. म्हणूनच तुमच्या मुलाला- मुलीला भविष्यात अशी अडचण येऊ नये, तिची- त्याची उंची चांगली व्हावी, म्हणून हे काही व्यायाम (physica exercise for children) तुमच्या लहानग्यांकडून अवश्य करून घ्या.
१. दोरीवरच्या उड्या skipping
उंची वाढविण्यासाठी हा सगळ्यात चांगला व्यायाम आहे, असे मानले जाते. तुमच्या मुलांना दररोज १० ते १५ मिनिटे दोरीवरच्या उड्या मारायला सांगा. सायकलिंग पद्धतीच्या किंवा एकदम दोन्ही पाय वर उचलून जंम्पिंग प्रकारात मोडणाऱ्या अशा कोणत्याही प्रकारच्या दोरीवरच्या उड्या चालतील.
२. लटकणे hanging
लोखंडी बारला लटकणे हा खेळ मुलांच्या पालकांसाठी नक्कीच नवा नाही. एखाद्या बगिच्यात असे लोखंडी बार हमखास लावलेले असतातच. या बारला मुलांना पकडायला सांगा आणि त्यांना त्याला काही वेळ लटकू द्या. बगिच्यात जाणं शक्य नसेल तर घरातच कधी कधी खिडकी, दरवाजे यांना पकडून लटकण्याचा प्रयत्न मुलं करत असतात, त्यांना तसं करू द्या. रोखू नका.
३. भुजंगासन Bhujangasan or Cobra pose
भुजंगासन हेच इंग्रजीमधून कोब्रा पोझ म्हणून ओळखले जाते. लहान मुलांची उंची वाढावी म्हणून भुजंगासन उपयुक्त ठरते. भुजंगासन करण्यासाठी जमिनीवर पालथे झोपा. यानंतर दोन्ही हात कोपऱ्यात वाकवून छातीजवळ दोन्ही बाजूंनी ठेवा. हळू हळू डोके, छाती पोटाचा कंबरेपर्यंतचा भाग हळूहळू उचला आणि शरीराचा भार दोन्ही हातांच्या तळव्यावर पेला. यानंतर मान वर करा आणि नजर छताकडे स्थिर ठेवा.ही आसनस्थिती ३० सेकंद टिकविण्याचा प्रयत्न करा.
४. पोहणे Swimming
पोहणे हा एक सर्वोत्तम व्यायाम मानला जातो. त्यामुळेच उंची वाढविण्यासाठीही स्विमिंग करणे खूप उपयुक्त ठरते. पोहण्याचा व्यायाम केल्यामुळे शरीर खूप जास्त लवचिक होते आणि शरीरातल्या सगळ्याच पेशी या व्यायामामुळे ॲक्टीव्ह होतात. त्यामुळे उन्हाळ्याच्या सुटीत मुलांकडून हमखास पोहण्याचा व्यायाम करून घ्या.
५. पायाचे अंगठे पकडणे hold your toes
व्यायामाची ही अवस्था लहान मुलांची उंची वाढविण्यासाठी उपयुक्त ठरणारी आहे. यासाठी सगळ्यात आधी मुलांना दोन्ही पाय समोर सरळ एका रेषेत पसरवायला आणि ताठ बसायला सांगा. यानंतर कंबरेत वाकून मुलांना त्यांच्या दोन्ही पायांचे दोन्ही अंगठे पकडायला लावा. ही अवस्था काही सेकंद टिकवून ठेवा आणि हा व्यायाय नियमितपणे करा.
६. सुर्यनमस्कार Surya namaskar
योगासनातील सुर्य नमस्कार हा देखील एक पुर्ण व्यायाम मानला जातो. पुर्ण व्यायाम म्हणजे हा व्यायाम जर नियमितपणे ठराविक प्रमाणात केला तर त्यानंतर फिटनेससाठी इतर काहीही करण्याची गरज नसते. सुर्यनमस्कार नियमितपणे केल्यामुळे स्नायुंना बळकटी मिळते. त्यामुळेच मुलांची उंची वाढविण्यासाठीही सुर्यनमस्कार करणे अतिशय उपयुक्त ठरते.