Join us  

पोट आणि कंबरेचा घेर कमीच होत नाही ? रोज १० मिनिटे करा ६ गोष्टी...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 02, 2023 10:16 AM

6 floor exercises to lose belly fat : Do these for a toned midsection : घरच्या घरी फ्लोर एक्सरसाइज करून कंबरेचा घेर होईल कमी... दिसाल सडपातळ...

सध्याच्या बिझी लाइफस्टाइलमुळे अनेकांना वजन वाढीची, पोटाचा - कंबरेचा घेर वाढण्याची समस्या उद्भवते. वाढलेलं वजन, कंबरेचा - पोटाचा वाढता घेर कमी करणं तितकं सोपं नसलं तरीही अवघड नक्कीच नाही. काहीवेळा डाएट , व्यायाम करूनही फारसा परिणाम दिसून येत नाही. पोट व कंबरेजवळील भागातील चरबी (6 exercises that you can do in 10 minutes to lose waist fat) वाढल्याने अनेक आजार होऊ शकतात. त्यामुळे आपल्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी वजन नियंत्रित ठेवणे महत्त्वाचे असते. कंबरेची चरबी आणि लठ्ठपणा हे आजकाल अनेकजणांची समस्या बनली आहे. 

आपण कितीही व्यायाम - डाएट केला तरीही पोट व कंबरेजवळील चरबी कमी करण्यासाठी खूप मेहेनत घ्यावी लागते. काहीजणांना कंबर प्रमाणाबाहेर सुटण्याच्या व कंबरेवर चरबीचे थर वाढण्याची समस्या जाणवते. कंबरेचा वाढता घेर कमी करण्यासाठी डाएट कोणतं फॉलो करावं, वर्कआउट काय करावं असे असंख्य प्रश्न अनेकांच्या मनात असतात. मग अशावेळी आपण वजन कमी करण्यासाठी विविध मार्ग निवडता. असे असले तरीही पोटाची - कंबरेची वाढलेली चरबी कमी करणे तारेवरची कसरत असते. यासाठी जर आपण लाइफस्टाइलमध्ये काही बदल केले, त्याचबरोबर योग्य डाएट व व्यायामाच्या मदतीने तुम्ही कंबरेवरची चरबी कमी करू शकता. कंबरेवरची चरबी कमी करण्यासाठी आपण घरच्या घरी वर्कआऊट करून बॉलीवूड अभिनेत्रींप्रमाणे टोन्ड फिगर मिळवू शकता(6 Best Floor Exercises to Burn Calories & Shrink Belly Fat Fast). 

कंबरेचा वाढता घेर कमी करण्यासाठी वर्कआऊट :- 

१. प्लँक (Plank) :- पुशअप्स करण्यासाठी आपण जी पोझिशन घेतो, तशी पोझिशन सुरुवातीला घ्या. यानंतर आता दोन्ही हात कोपऱ्यापासून तळव्यापर्यंत जमिनीवर टेकवा आणि शरीराचा सगळा भार हातांवर आणि पायाच्या बोटांवर पेलण्याचा प्रयत्न करा. डोक्यापासून पायापर्यंत सगळे शरीर एका सरळ रेषेत ठेवण्याचा प्रयत्न करा.   

मॉर्निंग वॉकला काही खाऊन जावे की उपाशीपोटीच जाणे योग्य ? तज्ज्ञ सांगतात, नक्की योग्य काय...

२. माउंटन क्लाइंबर (Mountain Climber) :- माउंटन क्लाइंबर हा व्यायाम करताना टेबलावर दोन्ही हात ठेवून पुशअप व्यायामाच्या स्थितीमध्ये शरीर आणावे. मग एकानंतर दुसरा पाय गुडघ्यात मोडून पुढे आणून ताणावा. हे करत असताना अ‍ॅब्सच्या आसपासचा भाग ताठ ठेवायचा प्रयत्न करावा. व्यायामा दरम्यान हृदयाचे ठोके वाढतात आणि मोठ्या प्रमाणामध्ये कॅलरीज बर्न होतात.

वजन कमी करण्यासाठी ४ मंत्र विसरुच नका ! तापसी पन्नूच्या न्यूट्रिशनिस्ट मुनमुन गनेरीवालचा सल्ला...

३. लंजेस (Lunges) :- लंजेस म्हणजे एका जागी उभे राहून तुम्हाला एक पाय पुढे घेऊन तो पुढच्या दिशेला काटकोनात वाकवायचा असतो. असे करताना तुम्हाला तुमचा पाय तळव्यांच्यापुढे जाऊ द्यायचा नाही. हा प्रकार तुम्हाला थोडा जलद गतीने करायचा आहे. तुम्ही दुसरा पाय पुढे घेताना तुम्हाला उडी मारुन दुसऱ्या पायाने लंजेस मारायचे आहेत.

आपल्या वयानुसार आपण दिवसभरात किती पावले चालावीत ? पहा स्वीडन विद्यापीठाचा अभ्यास काय सांगतो...

४. रिवर्स प्लॅंक (Reverse Plank) :- रिवर्स प्लॅंक करण्यासाठी सरळ ताठ उभे राहा. टेबल आपल्या मागे ठेवून द्या. आपली पाठ टेबलाच्या बाजूने असेल असे उभे राहा. आता टेबलाच्या कडांवर हात ठेवा. पाय सरळ लांब करा. आता हातांवर आणि पायांवर जोर देत संपूर्ण शरीर हलकेच वर खाली करा.

रोज मॉर्निंग वॉकला जाता पण वजन कमीच होत नाही? ५ गोष्टी करा, वजन आणि होईल कमी...

५. रशियन ट्विस्‍ट (Russian Twist) :- रशियन ट्विस्ट करण्यासाठी, आपले गुडघे वाकवून आणि पाय जमिनीवर सपाट ठेवून ताठ बसा. नितंबाच्या मदतीने शरीराचा समतोल जमिनीवर ठेवा. हे करत असताना, पाठ ४५ अंशांवर झुकलेली असावी. आत दोन्ही हातात उशी धरा. पाठ थोडी झुकवून कमरेचे स्नायू घट्ट करा. त्यानंतर हातातील उशी प्रथम डावीकडे आणि नंतर उजवीकडे वळवा. डावीकडे किंवा उजवीकडे टर्न होत असताना नितंब स्थिर एका जागेवर ठेवून कमरेतून झुका. असे किमान १५ ते २० वेळा करा.

६. प्लँक ट्विस्ट (Plank Twist) :- प्लँक ट्विस्ट हा व्यायाम करताना कंबरेवरील साईड फॅट्स कमी होतात. हा व्यायाम करण्यासाठी आपण प्लॅंक करतो तशी पोझिशन घ्यावी. त्यानंतर दोन्ही पायांचे तळवे सोबतच एकदा उजवीकडे तर नंतर डावीकडे वळवावे. असे करताना कंबरेतून पुर्ण शरीर ट्विस्ट होईल याची काळजी घ्यावी. पण हात मात्र एका जागेवरच स्टेबल असावेत.

टॅग्स :फिटनेस टिप्स