Lokmat Sakhi >Fitness > योगा, व्यायाम करून काहीच उपयोग नाही; जर रोज कराल ६ चुका; नव्या वर्षात तब्येत 'अशी' ठेवा उत्तम

योगा, व्यायाम करून काहीच उपयोग नाही; जर रोज कराल ६ चुका; नव्या वर्षात तब्येत 'अशी' ठेवा उत्तम

6 Common yoga mistakes everyone must avoid : कोणत्याही योगा वर्कआउटमध्ये श्वासोच्छवासाचे तंत्र राखणे आवश्यक आहे. पण योगाभ्यास करताना मंद आणि खोल श्वासांवर नियंत्रण ठेवणे अवघड असते.

By ऑनलाइन लोकमत | Published: January 2, 2022 04:36 PM2022-01-02T16:36:14+5:302022-01-02T16:47:03+5:30

6 Common yoga mistakes everyone must avoid : कोणत्याही योगा वर्कआउटमध्ये श्वासोच्छवासाचे तंत्र राखणे आवश्यक आहे. पण योगाभ्यास करताना मंद आणि खोल श्वासांवर नियंत्रण ठेवणे अवघड असते.

6 Common yoga mistakes everyone must avoid : 6 common yoga mistakes that might be rendering your efforts futile | योगा, व्यायाम करून काहीच उपयोग नाही; जर रोज कराल ६ चुका; नव्या वर्षात तब्येत 'अशी' ठेवा उत्तम

योगा, व्यायाम करून काहीच उपयोग नाही; जर रोज कराल ६ चुका; नव्या वर्षात तब्येत 'अशी' ठेवा उत्तम

नवीन वर्षाच्या सुरूवातील प्रत्येकजण काहीना काही संकल्प करत असतो. वजन कमी करून आपला लूक आणखी आकर्षक बनवण्यापासून फिगर मेंटेन करण्यापर्यंत अनेक गोष्टी लोकांनी ठरवल्या असतील. पण जर व्यायाम आणि योगा करताना काही चुका केल्या तर तुमचे वजन कमी करण्याचे प्रयत्न यशस्वी होऊ शकणार नाहीत. योगामध्ये एक नाही तर अनेक आसने आहेत, ज्याचे अनेक आरोग्य फायदेही आहेत.  (yoga mistakes to avoid) प्रत्येक व्यक्ती आपल्या शरीराच्या समस्यांनुसार आसनं निवडते. योगा करणं वाटतं तितकं सोपे नाही. योगासनादरम्यान अनेक गोष्टी घडतात  ते लक्ष केंद्रित करणे, श्वास घेणे, पुढे झुकणे, संतुलन करणे, या  क्रियांना शरीर, मन आणि सर्व समर्पण आवश्यक असते. (6 Common yoga mistakes everyone must avoid ) 

तज्ज्ञ म्हणतात की तुम्ही नवीन योगा शिकत असाल किंवा अनुभवी असाल तरी या चुका होणे सामान्य आहे. योगासने करताना झालेल्या चुकांचा गंभीर परिणाम होत नसला तरी काही चुका चिंतेचे कारण ठरू शकतात. योगाच्या बहुतेक चुका सहज टाळता येण्याजोग्या असतात. आज तुम्हाला योगासने करताना होणाऱ्या चुका सांगत आहोत. तुमचा योगाभ्यास चांगल्या प्रकारे पार पाडण्यासाठी हे टाळले पाहिजे.

श्वास घेण्याची चुकीची पद्धत टाळा

कोणत्याही योगा वर्कआउटमध्ये श्वासोच्छवासाचे तंत्र राखणे आवश्यक आहे. पण योगाभ्यास करताना मंद आणि खोल श्वासांवर नियंत्रण ठेवणे अवघड असते. प्रत्येक योगा प्रकारासाठी श्वास घेण्याचे वेगळे तंत्र वापरले जाते. चांगल्या परिणामांसाठी त्याचे नियमन केले पाहिजे. जर तुम्ही पहिल्यांदाच योगा शिकत असाल तर ही चूक तुमच्याकडून होऊ शकते. म्हणून, श्वासोच्छवासाचे तंत्र करण्यासाठी योग प्रशिक्षकाची मदत घेणे चांगले.

विचारपूर्वक व्यायाम करावा

शरीराचा व्यायाम आणि मनावर नियंत्रण ठेवणे हा योगाचा उद्देश आहे. जर योगा करताना तुमच्या मनात सर्व चुकीचे विचार येत असतील किंवा तुमचे लक्ष भटकत असेल, तर  योगासनांचा तुम्हाला कमी फायदा होईल.

योगा मॅटची निवड

जेव्हा तुम्ही पहिल्यांदा योग सुरू करता तेव्हा तुम्ही नेहमी स्वस्त योग मॅट्स खरेदी करता. परंतु प्रत्यक्षात स्वस्त चटईवर योगासनं करणं  तुम्हाला सरावात प्रगती होण्यापासून रोखू शकते. कारण काही काळानंतर या स्वस्त मॅट्स घसरायला लागतात आणि आकारात राहू शकत नाहीत. एवढेच नाही तर योगासने करताना तुमचे लक्ष विचलित होते, तुम्हाला दुखापतही होऊ शकते. 

योगा मॅट खरेदी करताना, हे लक्षात ठेवा की ते केवळ तुमच्या सांधे, गुडघे आणि तळवे यांच्यासाठी उशीचे काम करत नाही तर कोणत्याही प्रकारच्या दुखापतीपासून तुमचे संरक्षण करण्यास देखील मदत करते. म्हणूनच नेहमी चांगल्या दर्जाच्या योगा मॅट्स खरेदी करा.

नियमित प्रॅक्टिस न करणं

योगावर प्रभुत्व मिळवणंही तितकं सोपं नाही. योग्य तंत्रे आणि पोझेस समजून घेण्यासाठी बराच वेळ लागतो. तुम्ही योगामध्ये एक किंवा दोनदा परिपूर्णता मिळवू शकत नाही. एक म्हण आहे "सराव माणसाला परिपूर्ण बनवतो". म्हणूनच नियमितपणे योगाभ्यास करणे अत्यंत आवश्यक आहे.

कपड्यांची निवड

तुम्ही योग वर्ग किंवा सत्रांमध्ये सहभागी होणार असाल तर, तुम्हाला कपड्यांकडे विशेष लक्ष देणे आवश्यक आहे. घट्ट किंवा सैल कपडे तुमचे श्वास आणि योगासनांवर लक्ष केंद्रित करण्यापासून तुमचे लक्ष विचलित करू शकतात. त्यामुळे योगासने करताना असे कपडे घालण्याचा सल्ला नेहमीच दिला जातो. ज्यामध्ये तुम्ही सहज हालचाल करू शकता. 

शवासन  टाळणं

जर तुम्ही शवासन करत नसाल, तर सर्व आसने करूनही तुम्हाला योग्य फायदा मिळू शकणार नाही. योग सत्राचा प्रत्येक टप्पा पूर्ण केल्यानंतर, शेवटच्या टप्प्यात 5-8 मिनिटे शवासन केले पाहिजे. तुमचे सत्र कितीही कठीण आणि लांब असले तरीही. योगाभ्यास चांगल्या प्रकारे समाप्त करण्याचा शवासन  हा एक उत्तम मार्ग आहे. तुम्हीही निरोगी आणि तंदुरुस्त राहण्यासाठी योगा करत असाल तर येथे नमूद केलेल्या चुका टाळा आणि तब्येतीची काळजी घ्या.

Web Title: 6 Common yoga mistakes everyone must avoid : 6 common yoga mistakes that might be rendering your efforts futile

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.