नुकताच दिवाळी सण आपण सगळ्यांनीच मोठ्या थाटामाटात साजरा केला. सणवार म्हटलं की गोडधोड, तेलकट पदार्थ खाणं ओघाने आलंच. दिवाळी सणाला आपण फराळ असो किंवा गोड मिठाया खाल्ल्याशिवाय राहू शकत नाही. सणाला सगळा परिवार, मित्रमंडळी एकत्र भेटून दिवाळी साजरी करतात, या निमित्ताने नेहमीपेक्षा चार घास जास्तच जातात. सणावाराला आपण सगळी बंधन मोडून गोडधोड तसेच तेलकट पदार्थांवर ताव मारतो. अशावेळी आपण वाढत्या कॅलरीजची चिंता न करता अगदी बिनधास्तपणे खातो(6 ways to detox your body post-Diwali).
फराळ, गोड मिठाया यात भरपूर प्रमाणात कॅलरीज असतात. काहीवेळा आपण खाताना कशाचाही विचार न करता अगदी बेफिकीर होऊन हे पदार्थ खातो. पण नंतर वाढलेलं वजन, अपचनाच्या समस्या सतावू लागतात. यामुळे काहीवेळा आपण इतकं का खाल्लं असा पश्चाताप देखील होतो. अशा परिस्थितीत, आपण सणवार झाल्यानंतर स्वतःला एक हेल्दी स्टार्ट (Post Diwali Detox Top 6 Ways To Cleanse Your Body) देण्यासाठी काही छोट्या गोष्टींची काळजी घेऊ शकतो. दिवाळीत खूप खा - खा खाल्ल्याने आपले रोजचे रुटीन पूर्णपणे बिघडून गेलेले असते. यासाठीच आपले रोजचे रुटीन सुरु करण्यापूर्वी स्वतःला हेल्दी स्टार्ट देण्यासाठी या सहजसोप्या टिप्स फॉलो करता येतील(6 Easy Tips to Detox Your Body Post Diwali).
१. ग्रीन टी किंवा हर्बल टी पिणे :- बॉडी रिसेट करण्यासाठी, ग्रीन टी किंवा कोणत्याही प्रकारचा हर्बल टी, जसे पुदीना, आले, दालचिनीचा हेल्दी चहा प्यावा. त्यामध्ये अँटीऑक्सिडंट्स असतात जे शरीराच्या डिटॉक्सिफिकेशनमध्ये मदत करतात. यामुळे पचनसंस्थाही व्यवस्थित काम करते. दिवाळीनिमित्ताने खाल्लेल्या तेलकट, मसालेदार आणि गोडधोड पदार्थांमुळे पोटदुखी, अपचन अशा अनेक तक्रारी उद्भवतात, यामुळे आपले रुटीन बिघडते. यासाठीच शक्यतो चहा, कॉफी न पिता ग्रीन टी किंवा हर्बल टी पिण्यावर अधिक भर द्यावा.
२. भरपूर पाणी प्यावे :- भरपूर प्रमाणात पाणी पिऊन आपले शरीर कायम हायड्रेटेड ठेवावे. दिवसभरात किमान ८ ते १० ग्लास पाणी प्या, जर तुम्हाला साधे पाणी प्यायचे नसेल तर तुम्ही लिंबू पाणी पिऊ शकता. यामध्ये व्हिटॅमिन 'सी' आणि अँटिऑक्सिडंट्स सारखे पोषक घटक असतात जे तुमच्या शरीरातील विषारी पदार्थ बाहेर टाकतात.
३. सॅलॅड-कोशिंबीर खावी :- सणावाराला तेलकट, गोडधोड, पचायला जड पदार्थ खाऊन पोटाच्या अनेक समस्या उद्भवतात. शक्यतो असे पदार्थ खाऊन पोटदुखी, अपचन होऊन पचन कार्यात बिघाड होऊ नये म्हणून जेवणात सॅलॅड-कोशिंबीरचा समावेश करावा. सॅलॅड-कोशिंबीर यात कमी कॅलरीज आणि फायबर भरपूर असते. त्यामुळे शरीर डिटॉक्स होते. पचनसंस्थाही सुधारते.
४. निरोगी आहार :- सणावाराला खूप खा-खा केल्यानंतर स्वतःला रिस्टार्ट देण्यासाठी निरोगी, पौष्टिक आणि सकस आहार घ्यावा. दुपारच्या जेवणात हिरव्या भाज्या, डाळ आणि चपाती खाऊ शकता. रात्रीच्या जेवणात दलिया खाऊ शकता. तुम्ही जे काही खात आहात ते मर्यादित प्रमाणातच खा. सण-उत्सवात तुम्ही गोडधोड जास्त खाल्ले असेल तर पुढचे काही दिवस साखर खाणे बंद करा. यामुळे आपल्या शरीरातील साखरेची लेव्हल बॅलन्स केली जाईल.
५. एक्सरसाइज :- अधिक कॅलरीज बर्न करण्यासाठी एक्सरसाइज करा, यामुळे सणावाराला खाल्लेल्या अतिरिक्त कॅलरी बर्न करण्यात मदत होते. जर तुम्ही खूप हेव्ही वर्कआउट करू शकत नसाल तर तुम्ही कार्डिओ करू शकता किंवा अर्धा तास चालणे देखील फायदेशीर ठरेल.
६. पुरेशी झोप :- आपल्या आरोग्यासाठी पुरेशी झोप घेणे देखील तितकेच आवश्यक आहे. जेव्हा आपण झोपतो तेव्हा आपला मेंदू रिचार्ज होतो. शरीर आतून रिपेअर करण्यास मदत होते. पुरेशी झोप घेतल्याने शरीरात साचलेले विषारी घटक काढून टाकण्यासही मदत होते.