शरीर सडपातळ पण ओटीपोट वाढलंय? हात-पाय बारीक पोटाच्या वाढत्या आकारामुळे शरीर बेढप दिसते? पण आपण कधी विचार केला आहे का? की एका विशिष्ट वयानंतर पोट का वाढत जाते? वजन वाढीची समस्या ही जागतिक होत चालली आहे. प्रत्येक घरात एखादा व्यक्ती असा सापडेल जो लठ्ठपणाने त्रस्त आहे. पण शरीरात फॅट्स हे आपल्याकडून नकळत घडणाऱ्या चुकांमुळे वाढते.
शरीर लठ्ठ होण्यामागे अनेक कारणे आहेत. त्याच प्रमाणे पोट वाढण्यामागे देखील विशिष्ट कारणे आहेत. या नकळत घडणाऱ्या चुकांमुळे पोटाचा आकार वाढत जातो. पोट वाढण्यामागे नेमके कारणे कोणती? पोट कमी करण्यासाठी कोणत्या चुका टाळायला हव्या?(6 Things That Make You Gain Belly Fat).
प्रोसेस्ड फुड्सचे सेवन
प्रोसेस्ड फूड एकंदरीत आपले संपूर्ण आरोग्य बिघडवण्याचे काम करते. धावपळीच्या या जीवनात अनेकांना स्वतःसाठी वेळ काढायला जमत नाही. ज्यामुळे अनेक जण प्रोसेस्ड फुड्सच्या आहारी जातात. रिसर्च गेटमध्ये प्रकाशित झालेल्या एका अभ्यासानुसार, प्रोसेस्ड फुड्समध्ये जास्त प्रमाणात कॅलरीज असतात. तसेच, व कोणतेही पोषक घटक नसतात. जे लोकं जास्त प्रमाणात फास्ट फूड खातात, त्यांचे पोट फुगते. जर आपल्याला पोटावरील चरबी कमी करायची असेल तर, आहारातून फास्ट फूड वगळा.
ना जिम - ना डाएट, रोज सकाळी ५ पैकी १ मॉर्निंग ड्रिंक प्या, वजन आणि पोटही होईल कमी
गुड फॅट्सची कमी
आपल्या शरीरासाठी गुड फॅट्स आवश्यक आहे. गुड फॅट बॅड कोलेस्टेरॉल कमी करण्यास मदत करते. यासह पोटाचे फॅट्स जाळण्यास मदत करते. जर आपण फास्ट फूड खाऊन बॅड फॅट्सचे सेवन जास्त प्रमाणात करत असाल तर, ही चरबी पोटात जाऊन जमा होते. त्यामुळे आहारातून बॅड फॅट्स वगळा. आपल्या आहारात अॅव्होकॅडो, ऑलिव्ह ऑईल, अक्रोड, सूर्यफुलांच्या बिया, यांसारख्या गुड फॅट्सचा समावेश करा. यामुळे पाटाचे फॅट्स कमी होतात.
अपुरी झोप
मेयो क्लिनिकच्या मते, पोटाची चरबी वाढण्यामागे अपुरी झोप हे मुख्य कारण आहे. पुरेशी झोप न घेतल्यामुळे पोटावरील एकूण चरबी ९ टक्क्यांनी वाढते. तर, आतड्यांची चरबी देखील ११ टक्क्यांनी वाढते. त्यामुळे योग्य आहार घेतल्यानंतर शरीराला पुरेशी झोप देखील गरजेची आहे. परंतु, जेवल्यानंतर लगेच झोपणे टाळा.
खूप खा खा झाली तर टेन्शन विसरा, ५ सोपे उपाय - काही दिवसात वजनाचा काटा उतरलेला दिसेल
फिट राहा
शरीर तंदुरस्त ठेवण्यासाठी शारीरिक हालचाल गरजेची आहे. जर आपण दिवसभर बसून किंवा अधिक वेळ झोपून असाल तर, पोटाची चरबी वाढू शकते. त्यामुळे नियमित व्यायाम करा.
स्ट्रेस
पोटातील चरबी जमा होण्याचे आणखी एक कारण म्हणजे ताण. कामाशी संबंधित किंवा भावनिक तणावाच्या बाबतीत, शरीरात कोर्टिसोल तयार होते. ज्यामुळे पोटाची चरबी वाढते आणि बाहेर पडते. कॉर्टिसॉल कमी करण्यासाठी स्ट्रेस जास्त घेऊ नका. योग करा, किंवा मेडिटेशन करा.
हार्मोनल इश्यू
गर्भधारणा किंवा रजोनिवृत्तीमुळे होणाऱ्या हार्मोनल असंतुलनामुळे, महिलांमध्ये वजन वाढीची समस्या वाढते. याशिवाय, हायपोथायरॉईडीझम, ओव्हेरियन सिस्ट्स इत्यादी हार्मोन्सशी संबंधित समस्यांमुळे पोटावर चरबी जमा होऊ लागते. अशावेळी डॉक्टरांचा सल्ला घेऊन डाएट सूरू करा.