Lokmat Sakhi >Fitness > रोज सकाळी न चुकता प्या लिंबू पाणी; ७ फायदे, वजन घटेल, चेहरा दिसेल टवटवीत-ग्लोईंग

रोज सकाळी न चुकता प्या लिंबू पाणी; ७ फायदे, वजन घटेल, चेहरा दिसेल टवटवीत-ग्लोईंग

7 Benefits of Drinking Lemon Water Every Morning : लिंबात पेक्टिन असते. याच्या रसाचे सेवन केल्यानं तुम्हाला दीर्घकाळ पोट भरल्याप्रमाणे वाटतं.

By ऑनलाइन लोकमत | Published: September 7, 2023 07:33 PM2023-09-07T19:33:34+5:302023-09-08T13:39:38+5:30

7 Benefits of Drinking Lemon Water Every Morning : लिंबात पेक्टिन असते. याच्या रसाचे सेवन केल्यानं तुम्हाला दीर्घकाळ पोट भरल्याप्रमाणे वाटतं.

7 Benefits of Drinking Lemon Water Every Morning : Reasons to Start Your Day With Lemon Water | रोज सकाळी न चुकता प्या लिंबू पाणी; ७ फायदे, वजन घटेल, चेहरा दिसेल टवटवीत-ग्लोईंग

रोज सकाळी न चुकता प्या लिंबू पाणी; ७ फायदे, वजन घटेल, चेहरा दिसेल टवटवीत-ग्लोईंग

लिंबू पाणी (Lemon Water) हे अनेकांचे आवडते पेय आहे. बाहेरून आल्यानंतर लिंबू पाणी प्यायलास शरीराला बरेच फायदे मिळतात.  लिंबू हे एक आंबट फळ आहे ज्यात अनेक नैसर्गिक गुणधर्म आहेत यात व्हिटामीन सी, कॅल्शियम, फॉलेट आणि पोटॅशियम यांसारखी पोषक तत्व असतात.  हे एक पोषक तत्वांचे पॉवरहाऊस आहे.  (Benefits of Drinking Lemon Water Every Morning) त्वचेपासून केसांपर्यंत प्रत्येक अवयवाच्या पोषणासाठी लिंबू फायदेशीर ठरतो. याच्या सेवनाने रोगप्रतिकारकशक्ती वाढण्यास मदत होते. रोज सकाळी लिंबू पाणी प्यायल्याने कोणते फायदे मिळतात ते समजून घेऊ. (Reasons to Start Your Day With Lemon Water)

रोगप्रतिकारकशक्ती वाढते

लिंबात व्हिटामीन सी मोठ्या प्रमाणात असते. व्हिटामीन सी मध्ये अशी पोषक तत्व असतात  जे आपली रोगप्रतिकारकशक्ती वाढवतात. व्हिटामीन सी शरीरातील पांढऱ्या ब्लड सेल्सचं उत्पादन वाढवतात. यामुळे शरीरातील संक्रमण आणि आजारांपासून बचाव होण्यास मदत होते.

पचनक्रिया चांगली राहते

लिंबाच्या सालीच पेक्टिन नावाचे फायबर असते. यामुळे लिव्हरच्या पचन एजाइंम्च्या निर्मीतीस मदत होते.  ज्यामुळे शरीरातील टॉक्सिन्स बाहेर पडतात.

ब्लड शुगर नियंत्रणात राहते

ज्या फळांमध्ये जास्त साखर असते. त्यांच्या सेवनानं शरीरातील साखरेचे प्रमाण नियंत्रणात राहते. याव्यतिरिक्त मधुमेह होण्याचा धोका टाळता येतो. 

एंटीऑक्सिडंट्सचा मुख्य स्त्रोत

एंटी ऑक्सिडेंट्स आपल्याला फ्री रेडीकल्सपासून वाचवतात. फ्री रॅडिकल्समुळे त्वचेच्या पेशींचे नुकसान होऊ शकते. ज्यामुळे हृदयरोग, मधूमेह आणि कॅन्सरखारख्या आजारांचा धोका वाढतो.

वजन कमी होण्यास मदत होते

लिंबात पेक्टिन असते. याच्या रसाचे सेवन केल्यानं तुम्हाला दीर्घकाळ पोट भरल्याप्रमाणे वाटतं. जर तुम्ही वजन कमी करण्याच्या प्रयत्नात असाल तर लिंबू पाण्याचे सेवन करा. लिंबाच्या सेवनानं वेट मॅनेटमेंट आणि फॅट कमी होण्यास मदत होते.

किडनी स्टोनचा  धोका टळतो

लिंबाचा रस मुत्रातील सायड्रेटचा स्तर वाढवून किडनी स्टोनचा आजार टाळण्यास मदत करते. सायड्रेट कॅल्शियमला चिकटते ज्यामुळे किडनी स्टोनची समस्या टाळण्यास मदत होते.

हळदीचं दूध चांगलं पण हे ४ आजार असतील तर चुकूनही पिऊ नका; लिव्हर-किडनीसाठी धोक्याचं

घशातील खवखव दूर होते

जर तुमचा घसा खवखवत असेल तर लिंबाचा रस फायदेशीर ठरतो. चुटकीभर मध आणि लिंबाचा रस गरम पाण्याबरोबर घेतल्यास घश्याची खवखव दूर होते. लिंबात व्हिटमीन ससी असते. ज्यामुळे घश्यातील खवखवीपासून आराम मिळतो. 

Web Title: 7 Benefits of Drinking Lemon Water Every Morning : Reasons to Start Your Day With Lemon Water

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.