Join us  

बैठे काम, व्यायामाचा अभाव मांड्या आणि कंबर फार बेढब दिसते ? ७ व्यायाम, दिसाल सुडौल...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 14, 2022 3:30 PM

7 Best Exercises For Curvy Hips : तुमच्या हिप्सना रिलॅक्स करण्यासाठी तसेच त्यांना शेप देण्यासाठी काही महत्वाचे व्यायाम प्रकार समजून घेऊया. तुमच्या बिझी शेड्युलमधून थोडा वेळ काढा आणि एक्सरसाइजसाठी तयार व्हा.

एखाद्या बॉलिवूड अभिनेत्रीसारखी किंवा मॉडेल सारखी फिगर आपलीपण असावी ही सगळ्यांचीच इच्छा असते. आपण अशी फिगर करूच शकतो परंतु त्यासाठी रोजच्या रुटीनमध्ये व्यायामाचा समावेश करावा लागेल. योगासने, दंड बैठका, एरोबिक्स, सूर्यनमस्कार, प्राणायाम अश्या व्यायामप्रकारांमुळे आपले स्नायू बळकट होतात. चांगले आरोग्य पाहिजे असल्यास व्यायाम हा अत्यंत महत्त्वाचा घटक आहे. शरीराच्या प्रत्येक अवयवाला व्यायामाची गरज असते. ऑफिसमध्ये डेस्क जॉब आणि वर्क फ्रॉम होममुळे आपण दिवसातील बरेच तास खुर्चीवर बसून घालवतो. यामुळे तुमच्या हिप्स आणि पायांची फारशी हालचाल होत नाही. अशा स्थितीत तुमच्या हिप्समध्ये कधीही वेदना होऊ शकतात किंवा बसून बसून त्या भागातील मेद वाढू शकते. तुमच्या हिप्सना रिलॅक्स करण्यासाठी तसेच त्यांना शेप देण्यासाठी काही महत्वाचे व्यायाम प्रकार समजून घेऊया... तुमच्या बिझी शेड्युलमधून थोडा वेळ काढा आणि एक्सरसाइजसाठी तयार व्हा.(7 Best Exercises For Curvy Hips).

हिप्सना शेप देण्यासाठी कोणता एक्सरसाइज करावा ?

१. स्कॉट्स (Squat) - सरळ उभे रहा. त्यानंतर दोन्ही पायांमध्ये काही अंतर ठेवा. मग दोन्ही हात आपल्या समोर धरा. मग हिप्स बाहेर काढून खाली बसा. तुमची पोझिशन ही खुर्चीसारखी होईल. असे सातत्याने करा.

 

२. साईड लेग (Side Leg)  - सर्वप्रथम डाव्या बाजूला सरळ झोपा. मग उजवा पाय थोडा वर करा. थोडा वेळ त्याच पोझिशनमध्ये रहा. मग तसेच दुसऱ्या पायासोबत करा. 

३. हिप रेज (Hip Raise) - सर्वात आधी सरळ झोपा. आपले हात शरीराच्या बाजूला सरळ जमिनीवर ठेवा. मग हिप्सवर भार देऊन बॉडी वर उचला. आपल्या बॉडीचा भार खांद्यांवर थोडावेळ ठेवा. 

४. पायऱ्या चढणे (Stair Climbing)- ऑफिसमध्ये किंवा रेल्वे स्टेशनवर जाताना लिफ्ट ऐवजी पायऱ्यांचा वापर करा. दररोज २० मिनिटे पायऱ्या चढा. हा एक खूप चांगला व्यायाम आहे ज्यामुळे हिप्सला चांगला शेप मिळतो. 

५. सिजर किक (Scissor Kick) - पाठीवर झोपा. उजवा पाय ४५ अंश आणि डावा पाय जमिनीपासून थोडा वर घ्या. त्यानंतर एक पाय खाली घ्या आणि मग दुसरा पाय वर घ्या. हा व्यायाम करताना तुमच्या पायाची स्थिती कात्रीसारखी असेल.

६. सुमो स्कॉट (Sumo Squat) -  मांड्या व हिप्सना चांगला शेप देण्यासाठी सुमो स्कॉट करणे आवश्यक आहे. आपले पाय एकमेकांपासून दूर ठेवा. पायाची बोटे बाहेरच्या दिशेने आणि गुडघे घोट्यावर ठेवून सुरुवात करा. तुमचे एब्स घट्ट करा, तुमचे गुडघे शक्य तितके मागे ढकला आणि तुमचे हिप्स जमिनीच्या दिशेने खाली करा. लक्षात घ्या की तुमच्या मांड्या जमिनीला समांतर आहेत. नियंत्रणासह जमिनीवरून तुमची टाच उचला, धरून ठेवा आणि हळूहळू तुमची टाच खाली करा.

७. बल्जेरियन स्प्लिट स्कॉट्स (Bulgarian Split Squats) - सर्वप्रथम सरळ उभे राहून दोन्ही हातात डंबेल्स घ्या. तुमचा उजवा पाय गुडघ्यात दुमडून तुमचे  पाऊल मागे असणाऱ्या टेबलावर असे ठेवा कि तुमच्या पायाची बोट टेबलाला स्पर्श करतील. अश्या स्थितीत मान व पाठ ताठ ठेवा.

 

टॅग्स :फिटनेस टिप्सआरोग्य