Lokmat Sakhi >Fitness > ७ साेप्या डिटॉक्स टिप्स; मनावरची मरगळ झटकून शारीरिक थकवा करतील कमी, मिळेल नवीन ऊर्जा

७ साेप्या डिटॉक्स टिप्स; मनावरची मरगळ झटकून शारीरिक थकवा करतील कमी, मिळेल नवीन ऊर्जा

7 Effective Tips To Naturally Detox Your Body : रोजच्या खाण्यात असे अनेक पदार्थ  येत असतात ज्यामुळे शरीरात विषारी पदार्थ जमा व्हायला सुरूवात होते. डिटॉक्स पदार्थ शरीर निरोगी ठेवण्यास मदत करतील.

By ऑनलाइन लोकमत | Published: May 8, 2023 09:45 AM2023-05-08T09:45:00+5:302023-05-08T12:59:03+5:30

7 Effective Tips To Naturally Detox Your Body : रोजच्या खाण्यात असे अनेक पदार्थ  येत असतात ज्यामुळे शरीरात विषारी पदार्थ जमा व्हायला सुरूवात होते. डिटॉक्स पदार्थ शरीर निरोगी ठेवण्यास मदत करतील.

7 Effective Tips To Naturally Detox Your Body : Detox diet for healthy body How to detox body | ७ साेप्या डिटॉक्स टिप्स; मनावरची मरगळ झटकून शारीरिक थकवा करतील कमी, मिळेल नवीन ऊर्जा

७ साेप्या डिटॉक्स टिप्स; मनावरची मरगळ झटकून शारीरिक थकवा करतील कमी, मिळेल नवीन ऊर्जा

शरीराच्या बाहेरील भागात घाण जमा झाल्यास आपण आपले शरीर साफ करतो जेणेकरून आपण स्वच्छ, सुंदर दिसू. शरीराच्या आतल्या भागातील साफ साफ करणंही गरजेचं असतं. चुकीच्या खाण्यापिण्याच्या सवयी, अनियमित जीवनशैली यामुळे शरीरात आतल्या बाजूनं घाण जमा होते. (7 Effective Tips To Naturally Detox Your Body) यामुळे शरीर व्यवस्थित काम करू शकत नाही शरीर आतून व्यवस्थित राहण्यसााठी डिटॉक्स करणं गरेजेचं असतं. शरीरात जमा झालेला हा कचरा योग्यवेळी बाहेर फेकला नाही तर शरीर व्यव्यवस्थित कार्य करू शकणार नाही. याची लक्षणं लगेच दिसून येतात. (Detox diet for healthy body How to detox body)

शरीर डिटॉक्स करण्यासाठी डिटॉक्स डाएट प्लॅन उत्तम मानले जातात. शरीरात जमा झालेले टॉक्सिन्स बाहेर काढण्यासाठी आणि शरीर आतून स्वच्छ ठेवण्यासाठी ते गरजेचे आहे. रोजच्या खाण्यात असे अनेक पदार्थ  येत असतात ज्यामुळे शरीरात विषारी पदार्थ जमा व्हायला सुरूवात होते. डिटॉक्स पदार्थ शरीर निरोगी ठेवण्यास मदत करतील.

१) रिकाम्या पोटी लिंबूपाण्यात मध घालून प्या. मध गरम करू नका. शरीर डिटॉक्स करण्यासाठी लिंबू गुणकारी मानला जातो.

२) नाश्त्यामध्ये स्प्राऊट्स सॅलेड खा. कांदा, काकडी, गाजर, बीट आणि पालेभाज्यांचा आहारात समावेश करा.

३) संध्याकाळी हिरव्या भाज्या, दुधी, हेल्दी फळांचे सेवन करा. याशिवाय  दोन भिजवलेले अक्रोड खा.

४) दुपारच्या जेवणात एक वाटी मूंग डाळीच्या खिचडीचे सेवन करा. याशिवाय दह्याचेही सेवन करा.

५) संध्याकाळी ग्री टी सह स्नॅक्स आणि भाजलेले चणे खा

६) रात्रीच्या जेवणात टोमॅटो आणि बिटाचा ज्यूस घ्या.

७) रात्री जेवल्यानंतर बडीशेपेचं पाणी प्या.

हे पदार्थ  तुमच्या शरीराला डिटॉक्स करण्यासाठी उत्तम आहेत. यासोबतच स्वत:ला हायड्रेटेड कायम ठेवा. दिवसातून किमान 3-4 लिटर पाणी प्या. आपल्या आहारात फक्त घरच्या जेवणाचा समावेश करा. बाहेरचे अन्न टाळावे. तुम्ही काय खात आहात, किती प्रमाणात आणि कोणत्या वेळी खात आहात हे देखील महत्त्वाचे आहे.  संतुलित आहार घ्या. तेकलट, जंक फूड, फ्रोजन पदार्थ खाणं टाळा. उन्हाळ्याच्या दिवसात आईस्क्रीम खाण्यपेक्षा घरी बनवलेला फळांचा रस, ताक, पन्ह या पदार्थांचा आहारात समावेश करा.

Web Title: 7 Effective Tips To Naturally Detox Your Body : Detox diet for healthy body How to detox body

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.