Lokmat Sakhi >Fitness > तासंतास ऑफिसमध्ये बाक काढून - वाकून बसता ? चुकीच्या बॉडी पोश्चर सुधारण्याचे ७ फायदे, पाठीचा कणा सांभाळा...

तासंतास ऑफिसमध्ये बाक काढून - वाकून बसता ? चुकीच्या बॉडी पोश्चर सुधारण्याचे ७ फायदे, पाठीचा कणा सांभाळा...

Importance of Good Body Posture : सतत चुकीच्या पद्धतीने उठण्या - बसण्याने झाल्यात गंभीर शारीरिक समस्या, शरीर योग्य बॉडी पॉश्चरमध्ये ठेवण्याचे आहेत काही खास फायदे...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 25, 2023 03:32 PM2023-10-25T15:32:07+5:302023-10-25T15:50:39+5:30

Importance of Good Body Posture : सतत चुकीच्या पद्धतीने उठण्या - बसण्याने झाल्यात गंभीर शारीरिक समस्या, शरीर योग्य बॉडी पॉश्चरमध्ये ठेवण्याचे आहेत काही खास फायदे...

7 Incredible Benefits of Good Posture, The benefits of good posture, Importance of Good Body Posture | तासंतास ऑफिसमध्ये बाक काढून - वाकून बसता ? चुकीच्या बॉडी पोश्चर सुधारण्याचे ७ फायदे, पाठीचा कणा सांभाळा...

तासंतास ऑफिसमध्ये बाक काढून - वाकून बसता ? चुकीच्या बॉडी पोश्चर सुधारण्याचे ७ फायदे, पाठीचा कणा सांभाळा...

बरेचदा आपल्या बॉडी पॉश्चरचा आपल्या एकूणच व्यक्तिमत्वावर प्रभाव पडत असतो. आपल्यापैकी काहीजणांना पाठीला बाक काढून बसायची सवय असते. तर काहीजण चालताना, बसताना पोक काढून बसतात. काहीवेळा तर बराचकाळ आपण याच चुकीच्या बॉडी पॉश्चरची शरीराला सवय केली तर त्यामुळे अनेक आजारांच्या समस्या उद्भवू शकतात. आपण कायम चुकीचे बॉडी पॉश्चर(7 Benefits of good body posture & how to maintain it)फॉलो केल्यामुळे सांधेदुखी, पाठदुखी, मानदुखी यांसारख्या लहान - मोठ्या शारीरिक व्याधी निर्माण होण्याची शक्यता असते. चुकीच्या बॉडी पॉश्चरमुळे आपल्या शरीरयष्टीमध्ये बदल जाणवू शकतो(What are the advantages of correct posture?).

आपल्या जीवनशैलीतील अनेक लहान-सहान गोष्टी आपल्या आरोग्यावर परिणाम करत असतात. दिवसभर एकाच जागी बसून राहील्याने किंवा शरीराच्या चुकीच्या ठेवणीमुळे आपल्याला अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. आपल्या शरीराची ठेवण योग्य असल्यास आपण काही समस्या टाळू शकतो. यातही बसण्याची आणि उभे राहण्याची पद्धत महत्त्वाची असते. काही लोकांना दिर्घकाळ उभे राहून किंवा तासंतास बसून काम करावे लागते. अशावेळी आपली उभे राहण्याची किंवा बसण्याची पद्धत (Importance of Good Body Posture) जर चुकत असेल तर आरोग्याच्या काही समस्या उद्भवू शकतात. या सगळ्या गोष्टी आरोग्यासाठी हानिकारक आहेत. खराब बॉडी पोजीशनमुळे ( 7 Benefits of Improved Posture) आरोग्याच्या अनेक समस्या निर्माण होऊ शकतात. जर आपल्याला या समस्यांसपासून सुटका हवी असेल तर आपले बॉडी पॉश्चर योग्य राखण्याचे नेमके फायदे काय आहेत ते पाहूयात(What You Should Know About the Benefits of Good Posture).

योग्य बॉडी पॉश्चर फॉलो करण्याचे फायदे :- 
 
१. पाठदुखीपासून आराम मिळतो :- जर आपण आपले शरीर योग्य बॉडी पॉश्चरमध्ये ठेवले तर आपल्या शरीराचे वजन सगळीकडे एकसमान विभागले जाते. शरीराचे सगळे वजन योग्य प्रमाणांत राखलं जात. ज्यामुळे पाठीच्या हाडांवर ताण कमी पडतो. पाठीच्या हाडांवर ताण कमी पडल्यास पाठीच्या दुखण्यापासून आराम मिळतो.
    
२. आत्मविश्वास वाढतो :- योग्य बॉडी पॉश्चर आपल्याला आत्मविश्वासी बनवण्यास मदत करते. योग्य मुद्रेत उभे राहिल्याने आपला कॉन्फिडंस वाढतो. ज्यामुळे आपण कायम सकारात्मक राहता.

मलासनात बसून पाणी पिण्याचे आहेत भन्नाट फायदे, पोटाचे विकार अनेक समस्या होतील कायमच्या दूर...

३. श्वासोच्छवासाचा दर्जा सुधारतो :- पाठीचा कणा ताठ ठेवून बसल्यास फुफ्फुस योग्य पद्धतीने काम करण्यास तयार होते. ज्यामुळे आपण दीर्घश्वास घेऊ शकता. जे शरीरात ऑक्सिजन लेव्हल वाढवून श्वासाचे उत्सर्जन योग्यप्रकारे करण्यास फायदेशीर ठरते. 

४. पचनशक्ती सुधारते :- शरीराचे योग्य पोश्चर आपल्याला योग्यप्रकारे काम करण्यास प्रोत्साहित करतात. ज्यामुळे आपली पचनशक्तीसुद्धा सुधारते आणि गॅस्ट्रोइंटेस्टायनल व पोटासंबंधीच्या समस्यांचा धोकासुद्धा कमी होतो.

तुम्हालासुद्धा ही ५ लक्षण जाणवतात का ? असे असेल तर आपल्याला 'बॉडी डिटॉक्स' करण्याची गरज आहे...

५. मांसपेशी मजबूत बनतात :- ताठ बसल्याने मांसपेशी सक्रिय राहतात. ज्यामुळे मांसपेशींची ताकद आणि सहनशक्ती वाढून त्या मजबूत बनतात. 

ट्रेडमिलवर चालावे की बाहेर मॉर्निंग वॉक ? फिट राहण्यासाठी नेमकं काय आहे फायदेशीर...

तुम्हाला पण वर्कआऊट पूर्वी चहा पिण्याची सवय आहे का ? चहाची तलफ लागलीच तर चहाला उत्तम पर्याय...

६. सांध्यांचे आरोग्य सुधारण्यास मदत मिळते :-आपले शरीर नेहमी योग्य बॉडी पॉश्चरमध्ये ठेवल्याने त्याचे अनेक फायदे आपल्या शरीराला होतात. ताठ बसल्यास सांध्यांचे आरोग्य सुधारण्यास मदत मिळते. ज्यामुळे सांधेदुखी यांसारख्या समस्या कमी होतात. 

७. मणक्याचे दुखणे थांबते :- वाकून चालण्याने आपल्या आरोग्यावर नकारात्मक परिणाम तर होतोच पण यामुळे आपली उंचीही कमी दिसते. यामुळे जर आपल्यालाही वाकून चालण्याची सवय असेल तर आजपासूनच ही सवय बदलण्याचा प्रयत्न करा. यामुळे मणक्याचे दुखणेसुद्धा कमी होण्यास मदत मिळते.

Web Title: 7 Incredible Benefits of Good Posture, The benefits of good posture, Importance of Good Body Posture

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.