Join us  

फक्त ७ मिनिटांचा व्यायाम घरीच करा; जिमला न जाता सुटलेलं पोट होईल कमी, मेंंटेन राहाल

By ऑनलाइन लोकमत | Published: December 05, 2023 12:53 PM

7 Minutes Exercise For Reducing Belly Fat (Pot kami karnyasathi vyayam dakhva) : वजन कमी करण्यासाठी तुम्ही कसा व्यायाम करता याबरोबरच कितीवेळ व्यायाम करता हे सुद्धा महत्वाचे असते

जेव्हा तुम्ही ऑफिसमध्ये किंवा घरात जास्तवेळ एकाच स्थितीत बसून असता तेव्हा अनेक प्रकारच्या शारीरिक समस्यांचा सामना कराव लागू शकतो. पाठदूखी, कंबरदुखी  याशिवाय पोट सुटणं असे त्रास उद्भवतात. (Belly Fat Loss Tips) एकदा पोटाची चरबी सुटली की  कमीच होत नाही, अनेकजण चरबी कमी करण्यासाठी हेवी वर्कआऊट करता तर काहीजण डाएट फॉलो करतात. (Easy home exercises to lose belly fat)

वजन कमी करण्यासाठी तुम्ही कसा व्यायाम करता याबरोबरच कितीवेळ व्यायाम करता हे सुद्धा महत्वाचे असते.(Pot kami karnyasathi upay) रोज व्यायाम करण्यासाठी तुम्हाला अर्धा ते एक तास वेळ काढणं कठीण वाटत असेल तर तुम्ही फक्त ७ मिनिटांचा व्यायाम करून मेटेंन करू  शकता. (7 Minutes Exercise For Reducing Belly Fat)

साईड बेंड्स विथ वेट

साईट बेली फॅट कमी (Side Belly Fat) करण्यासाठी साईड बेंड्स विथ वेट हा उत्तम व्यायाम आहे. दोन्ही हातात वजन घेऊन आधी उजव्या नंतर डाव्या बाजूने खाली वाका. नियमित हा व्यायाम केल्यानं बेली फॅट कमी होण्यास मदत होईल. 

प्रोटीन हवंय, पनीर-बदाम परवडत नाही? प्रोटीनसाठी हा पदार्थ खा, रस्त्यावर मिळेल १० रूपये वाटा

फ्लटर किक्स

पोटाची चरबी कमी करण्यासाठी तुम्ही फ्लटर किक्स हा व्यायाम करू शकता. यात पूर्ण शरीराची हालचाल होते आणि फॅट बर्न करण्यासही मदत होते. हा व्यायाम करण्यासाठी जमिनीवर सरळ झोपा. त्यानंतर दोन्ही पाय हवेत थोडावेळ होल्ड करा. असं केल्याने एबडोमिनल एरियावर जोर येईल आणि पोटाचे अतिरिक्त फॅट कमी होण्यास मदत होईल.

साऊथचे लोक दिवसरात्र भात खातात तरी पोट का सुटत नाही? पाहा भात खाण्याची योग्य पद्धत-मेंटेन राहाल

स्वाट्स ट्विस्ट

हा व्यायाम केल्याने पोटाबरोबर पायांनाही चांगला आकार येईल. नियमित स्वाक्ट ट्विस्ट केल्यानं एका आठवड्याच्या आत वजन कमी होईल फॅट्स वाढणार नाहीत. हा व्यायाम करण्यासाठी पाय आपल्या हिप्सपासून वेगळे ठेवा. स्वाट्सच्या स्थितीत येऊन वरच्या दिशेने जंप करा. जंप करत  शरीर ९० डिग्रीत फिरवा. पायांनी जमिनीला स्पर्श करून पुन्हा जंप करा. फोटो दाखवल्याप्रमाणे व्यायाम करून तुम्ही जीमला न जाता घरीच फिटनेस मेंटेन ठेवू शकता.  

टॅग्स :फिटनेस टिप्सआरोग्यहेल्थ टिप्सवेट लॉस टिप्स