Lokmat Sakhi >Fitness > चष्म्याचा नंबर वाढू नये म्हणून करा ७ गोष्टी! मुलांसोबत करा आणि चष्मा टाळा

चष्म्याचा नंबर वाढू नये म्हणून करा ७ गोष्टी! मुलांसोबत करा आणि चष्मा टाळा

How To Reduce Eye Number Naturally?: चष्म्याचा नंबर कमी करण्यासाठी ७ स्टेप्स... तुम्हीही दररोज करा आणि मुलांनाही करायला लावा. नंबर वाढणार नाही.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 31, 2023 05:19 PM2023-08-31T17:19:28+5:302023-08-31T17:20:32+5:30

How To Reduce Eye Number Naturally?: चष्म्याचा नंबर कमी करण्यासाठी ७ स्टेप्स... तुम्हीही दररोज करा आणि मुलांनाही करायला लावा. नंबर वाढणार नाही.

7 Tips to reduce your eyeglass number, eye exercise for reducing the eye's number naturally? | चष्म्याचा नंबर वाढू नये म्हणून करा ७ गोष्टी! मुलांसोबत करा आणि चष्मा टाळा

चष्म्याचा नंबर वाढू नये म्हणून करा ७ गोष्टी! मुलांसोबत करा आणि चष्मा टाळा

Highlightsज्यांना चष्मा नाही, त्यांनीही डोळ्यांचं आरोग्य चांगलं रहावं म्हणून करायला हरकत नाही.

हल्ली प्रत्येक घरात किमान एका व्यक्तीला तरी चष्मा असतोच असतो. चाळीशीनंतर चष्मा लागला तर ते समजण्यासारखे आहे. पण आता तर प्राथमिक शाळेतल्या मुलांनाही चष्मा असण्याचे प्रमाण खूप जास्त वाढले आहे. वाढत्या वयासोबत मुलांचा चष्म्याचा नंबरही वाढत जातो. असं होऊ द्यायचं नसेल तर मुलांसोबत या काही गोष्टी तुम्हीही नियमितपणे करा. तुमचा आणि मुलांचा चष्म्याचा नंबर नियंत्रणात राहण्यास नक्कीच मदत होईल (7 Tips to reduce your eyeglass number). चष्म्याचा नंबर वाढणार नाही. ज्यांना चष्मा नाही, त्यांनीही डोळ्यांचं आरोग्य चांगलं रहावं म्हणून करायला हरकत नाही. (eye exercise for reducing the eye's number naturally?)

 

हा उपाय इंस्टाग्रामच्या yoga.rubika या पेजवर शेअर करण्यात आला आहे. यामध्ये चष्म्याचा नंबर वाढू नये म्हणून एकूण ७ गोष्टी करायला सांगितल्या आहेत. त्या कशा ते आपण बघूया.....

१. सगळ्यात आधी थंड पाण्याने डोळे स्वच्छ धुवा. डोळ्यावर थंड पाण्याचे 10 शिबके मारा.

अंकिता लोखंडेने आईला राखी बांधली तर काय बिघडलं? लोकांनी का केलं तिला ट्रोल?

२. त्यानंतर एका जागी शांतपणे बसा आणि डोळ्यांचे पुढील व्यायाम करा. १० ते १५ सेकंदांसाठी डोळ्यांची उघडझाप करा. 

३. त्यानंतर दोन्ही तळहात एकमेकांवर चोळा आणि त्यानंतर काही सेकंदांसाठी डोळ्यांना लावून ठेवा. असं ३ वेळा करा.

४. आता उजवा हात समोरच्या बाजूला घ्या आणि डोळ्याला समांतर उजव्या हाताचा अंगठा असू द्या. त्या अंगठ्याकडे एक टक बघा. यानंतर उजवा हात उजव्या दिशेने न्या आणि पुन्हा नाकासमोर आणा. असं करताना अंगठ्यावरची नजर ढळू देऊ नका. अशीच क्रिया डाव्या हाताने ५ वेळा करा.

 

५. वरील क्रियेमध्ये हाताचे अंगठे आपण उजव्या आणि डाव्या बाजुला नेले. आता वर आणि खाली याप्रमाणे फिरवावे. दोन्ही हातांनी ही क्रिया प्रत्येकी ५- ५ वेळा करावी.

६. आता उजवा हात समोरच्या बाजूला घ्या आणि डोळ्याला समांतर उजव्या हाताचा अंगठा असू द्या.

भला मोठा स्कर्ट घालून गरागरा मारल्या कोलांट्या उड्या, छोट्याशा मुलीचा भन्नाट व्हायरल व्हिडिओ

अंगठ्याकडे नजर स्थिर करा. हळूहळू उजवा हात डोळ्यासमोर नाकाजवळ घ्या आणि पुन्हा दुर न्या. असं ५ वेळा करावे.

७. डोळे क्लॉकवाईज आणि ॲण्टीक्लॉकवाईज असे प्रत्येकी ५- ५ वेळा गोल फिरवा.


 

Web Title: 7 Tips to reduce your eyeglass number, eye exercise for reducing the eye's number naturally?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.