Lokmat Sakhi >Fitness > वजन कमी करण्यासाठी वेगाने फॅट बर्न करायचं असेल तर चालताना 'या' ८ गोष्टी ठेवा लक्षात

वजन कमी करण्यासाठी वेगाने फॅट बर्न करायचं असेल तर चालताना 'या' ८ गोष्टी ठेवा लक्षात

तुम्हाला माहित आहे का की, जर तुम्ही योग्य पद्धतीने चाललात तर तुम्ही जास्तीत जास्त फॅट बर्न करू शकता? चला तर मग जाणून घेऊया चालण्याचे फायदे...

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 18, 2025 17:27 IST2025-03-18T17:26:51+5:302025-03-18T17:27:13+5:30

तुम्हाला माहित आहे का की, जर तुम्ही योग्य पद्धतीने चाललात तर तुम्ही जास्तीत जास्त फॅट बर्न करू शकता? चला तर मग जाणून घेऊया चालण्याचे फायदे...

8 things to keep in mind while walking to lose weight | वजन कमी करण्यासाठी वेगाने फॅट बर्न करायचं असेल तर चालताना 'या' ८ गोष्टी ठेवा लक्षात

वजन कमी करण्यासाठी वेगाने फॅट बर्न करायचं असेल तर चालताना 'या' ८ गोष्टी ठेवा लक्षात

वजन कमी करण्यासाठी आणि तंदुरुस्त राहण्यासाठी चालणं हा एक उत्तम मार्ग आहे. हा एक व्यायाम आहे जो सर्व वयोगटातील लोकांसाठी योग्य मानला जातो. चालणं केवळ वजन कमी करण्यास मदत करत नाही तर पूर्णपणे निरोगी राहण्यासाठी देखील खूप फायदेशीर आहे. तुम्हाला माहित आहे का की, जर तुम्ही योग्य पद्धतीने चाललात तर तुम्ही जास्तीत जास्त फॅट बर्न करू शकता? चला तर मग जाणून घेऊया चालण्याचे फायदे...

चालताना 'या' ८ गोष्टी ठेवा लक्षात

वेग वाढवा - जर तुम्हाला लवकर फॅट बर्न करायचे असतील तर तुमच्या चालण्याचा वेग वाढवा. 

इंटरवल वॉकिंग - चालताना, काही मिनिटे वेगाने चाला, नंतर काही वेळ सामान्य वेगाने चाला. यामुळे चयापचय मेटाबॉलिज्म आणि जास्त कॅलरीज बर्न होतात.

उंच रस्त्यावर चाला - उंच रस्त्यावर चालल्याने स्नायूंना अधिक काम करावे लागते, ज्यामुळे वेगाने फॅट बर्न होण्यास मदत होते.

वजन उचला - हात किंवा पायांना हलके वजन बांधून चालल्याने स्नायू अधिक सक्रिय राहतात आणि जास्त कॅलरीज बर्न होतात.

हात हलवा - चालताना हात हलवल्याने जास्त कॅलरीज बर्न होतात आणि शरीराचा बॅलेन्स चांगला राहतो.

वेळ वाढवा - जास्त फॅट बर्न करण्यासाठी दररोज किमान ६० मिनिटं चाला. चालण्याचा वेळ वाढवा.

संगीत ऐका - चालताना संगीत ऐकल्याने उत्साह येतो, प्रोत्साहन मिळतं आणि तुम्हाला जास्त काळ चालावंस वाटतं.

सातत्य - वजन कमी करण्यासाठी नियमित चालणं आवश्यक आहे. आठवड्यातून किमान ५ दिवस चालायला नक्की जा.

चालण्याचे फायदे

वजन कमी करण्यास उपयुक्त

- चालण्यामुळे कॅलरीज बर्न होतात ज्यामुळे वजन कमी होण्यास मदत होते.
- दररोज वेगाने चालल्याने शरीरात जमा झालेली अतिरिक्त चरबी कमी होते.

हृदयाचे आरोग्य सुधारतं

- चालण्याने हृदयाचं आरोग्य सुधारतं.
- रक्ताभिसरण वाढतं ज्यामुळे हृदयाशी संबंधित आजारांचा धोका कमी होतो.

मेटाबॉलिज्म वाढवण्यास उपयुक्त

- नियमितपणे चालल्याने मेटाबॉलिज्म वाढतं, ज्यामुळे शरीर जास्त कॅलरीज बर्न करते.

ताण कमी होतो

- चालताना ताजी हवा घेतल्याने तुम्हाला आराम मिळतो.
- स्ट्रेस हार्मोन कमी होतो.

हाडे आणि सांधे मजबूत करतं

- हाडे आणि सांधे चांगले, मजबूत राहतात. 
- ऑस्टियोपोरोसिस सारख्या समस्येपासून बचाव होतो.

ब्लड शुगर कंट्रोल

- जेवल्यानंतर चालल्याने ब्लड शुगर लेव्हल कंट्रोलमध्ये राहते.
-  मधुमेहाचा धोका कमी होतो.

पचन सुधारतं

- जेवणानंतर चालल्याने पचन सुधारतं.
- गॅस आणि अपचन यासारख्या समस्यांपासून आराम मिळतो.

Web Title: 8 things to keep in mind while walking to lose weight

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.