Join us  

टराटरा वाढणाऱ्या वजनाचं टेंशन आलं? ९-१ चा हा घ्या सोपा फॉर्म्युला, महिनाभरात घटेल चरबी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 18, 2024 1:24 PM

9-1 Rule For Weight Loss And Healthy Lifestyle: वाढत्या वजनाची चिंता वाटत असेल तर आता सध्या ट्रेडिंग असणारा हा '9-1' वेटलॉस फॉर्म्युला ट्राय करून पाहा. महिना भरातच खूप चांगला फरक दिसून येईल. (simple tips for weight loss)

ठळक मुद्देवजन कमी करण्याची ही एक निरोगी प्रक्रिया मानली जाते. हा फॉर्म्युला नेमका कसा असतो आणि त्यानुसार वजन कसं कमी करायचं?

दिवसागणिक वाढत जाणारं वजन, सुटत चाललेलं पोट कमी कसं करायचं हा अनेकांपुढचा प्रश्न. याचं सगळ्यात महत्त्वाचं कारण म्हणजे बदललेली जीवनशैली. खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयी आणि व्यायामाचा अभाव या दोन्हीमुळे वजन वाढीची समस्या सध्या खूपच वाढलेली आहे. तुम्हीही वाढत्या वजनाचं टेन्शन घेऊन हैराण झालेले असाल तर आता '9-1' हा वजन कमी करण्याचा नियम पाळून पाहा (9-1 rule for fast weight loss and healthy lifestyle). हा नियम पाळायचा म्हणजे नेमकं काय करायचं ते आता बघुया... (simple tips for weight loss)

 

वजन कमी करण्यासाठी '9-1' फॉर्म्युला

हा फॉर्म्युला नेमका कसा असतो आणि त्यानुसार वजन कसं कमी करायचं याची माहिती हैद्राबादचे डॉ. मजहर अली यांनी एस्प्रेस ग्रुपला दिली आहे. वजन कमी करण्याची ही एक निरोगी प्रक्रिया मानली जाते.

पाठदुखी, कंबरदुखी, अशक्तपणा कायमचा जाईल! ५ प्रकारच्या बिया रोज खा- तब्येत राहील ठणठणीत

१. या फॉर्म्युलाचा सगळ्यात पहिला नियम म्हणजे दररोज ९ हजार पावलं तरी चाला. 

२. दररोज ८ ग्लास तरी पाणी प्यायलाच हवे. पाणी योग्य प्रमाणात प्यायल्यास बॉडी डिटॉक्स होण्यास मदत होते, तसेच हायड्रेशनचा वेटलॉससाठीही खूप फायदा होतो.

३. दररोज रात्री कमीतकमी ७ तासांची झोप तरी झालीच पाहिजे. यामुळे मानसिक, शारिरीक आरोग्य चांगलं राहतं. शिवाय हार्मोन्सचे संतुलन बिघडत नाही.

 

४. दररोज सकाळी शांत बसून कमीतकमी ६ मिनिटांचे मेडिटेशन करा. यामुळे मानसिक आरोग्य उत्तम राहाते.

केसांना लावा तुमचं स्वत:चं नाव लिहिलेली हेअरक्लिप, बघा कस्टमाईज हेअरक्लिप्सचा भन्नाट ट्रेण्ड

५. दिवसभरातून ५ प्रकारची फळं खा. यातून मिळणारे व्हिटॅमिन्स, खनिजे, पोषणमुल्ये तब्येत उत्तम राखण्यासाठी मदत करतील.

६. दिवसातून ४ अगदी एक- दोन मिनिटांचे ब्रेक घ्या. या ब्रेकमध्ये डोळे मिटून शांत बसा आणि मनाचा, शरीराचा थकवा, ताण घालविण्याचा प्रयत्न करा.

 

७. दिवसातून ३ वेळा म्हणजेच नाश्ता, दुपारचं जेवण, रात्रीचं जेवण यांच्या माध्यमातून प्रोटीन्स, फायबर्स उत्तम देणारा आहार घ्या.

केस खूप पातळ झाले- वाढतही नाहीत? तांदळाच्या पाण्याचा खास उपाय, महिनाभरातच होतील दाट- लांब

८. रात्रीचं जेवण आणि झोप यांच्यामध्ये कमीतकमी २ तासांचा गॅप असायलाच हवा. यामुळे खाल्लेल्या अन्नाचं व्यवस्थित पचन, चयापचय होतं. याचा खूप चांगला परिणाम वजन कमी होण्यावर दिसून येतो.

९. दिवसातला १ तास तरी व्यायामासाठी किंवा शारिरीक हालचालींसाठी करा. यामध्ये सायकलिंग, वॉकिंग, रनिंग, स्विमिंग किंवा कोणताही एखादा मैदानी खेळ असं काहीही तुमच्या आवडीचं करा. 

 

टॅग्स :फिटनेस टिप्सवेट लॉस टिप्सव्यायामहेल्थ टिप्सआहार योजना