सध्या फिटनेसच्या बाबतीत अनेक लाेक खूप जागरुक झाले आहेत. कारण पुर्वी जे आजार वयाच्या पन्नाशीनंतर किंवा साठीनंतर गाठायचे ते बीपी, शुगर, हृदयविकार हे आजार खूपच कमी वयात मागे लागत आहेत. वाढत्या वजनाच्या समस्येमुळे तर कित्येक लोक त्रस्त आहेत. याशिवाय कमी वयात गुडघेदुखी, कंबरदुखी, सांधेदुखी असे त्रासही अनेकांना सुरू झाले आहेत (9-1 Rule for fitness and weight loss). म्हणूनच हे सगळे त्रास टाळून फिट राहायचं असेल, वाढतं वजनही आटोक्यात ठेवायचं असेल तर त्यासाठी '9-1 Rule' अतिशय महत्त्वाचा आहे (health benefits of 9-1 rule for fitness), असं डॉक्टर सांगत आहेत. हा नियम पाळायचा म्हणजे नेमकं काय करायचं ते पाहूया..(how to follow 9-1 rule?)
फिटनेस टिकविण्यासाठी महत्त्वाचा '9-1 Rule'
फिटनेस टिकविण्यासाठी कोणत्या ९ गोष्टी नियमितपणे करणं गरजेचं आहे याविषयीची माहिती डॉक्टरांनी drmanasitanvitejpanchakarama या इन्स्टाग्राम पेजवर शेअर केली आहे. यामध्ये त्यांनी सांगितलेल्या ९ गोष्टी कोणत्या ते पाहा...
पांढऱ्याशुभ्र कपड्यावर चहाचा डाग पडला? चटकन करा 'हा' उपाय, डाग शोधूनही सापडणार नाही
१. दररोज ९ हजार पावलं चाला. यामुळे तुमच्या स्नायूंचा चांगला व्यायाम होतो.
२. दिवसांतून तुम्ही ८ ग्लास पाणी प्यायलाच पाहिजे. यामुळे शरीर हायड्रेटेड राहण्यास मदत होते.
३. ७ तासांची शांत झोप दररोज रात्री घेतली पाहिजे. यामुळे शारिरीक, मानसिक थकवा जाऊन मन, शरीर फिट राहाते.
४. ६ मिनिटे दररोज ध्यानधारणा करा. प्राणायाम करा. यामुळे सकारात्मक उर्जा मिळते.
५. दिवसांतून ५ वेळा काही ना काही अगदी थोड्या प्रमाणात खाणं. उदाहरणार्थ सकाळी सुकामेवा खाणं, नाश्ता आणि दुपारच्या जेवणाच्या मध्ये एखादं फळ खाणं, रात्री झोपण्यापुर्वी दूध घेणं, दुपारी ४ वाजता थोडीशी भूक लागल्यानंतर काहीतरी थोडंसंच पण पौष्टिक खाणं असं तुम्ही करू शकता.
लग्नसराई स्पेशल: चेहऱ्याला लावा 'हा' खास लेप, फक्त १५ मिनिटांत मिळेल स्किन पॉलिशिंगसारखा इफेक्ट
६. तुमच्या दिवसभराच्या कामातून ४ वेळा छोटा ब्रेक नक्की घ्या. या ब्रेकमध्ये काहीतरी पॉझिटीव्ह ऐका. एखादा जोक वाचा, लोकांशी चांगल्या विषयावर सकारात्मक बोला. यामुळे नवी उर्जा मिळण्यास मदत होते. कामाच्या ताणातून आपण थोडं रिलॅक्स होतो.
७. दिवसातून तीन वेळा म्हणजेच नाश्ता, दुपारचं जेवण आणि रात्रीचं जेवण हे तुम्ही व्यवस्थित केलंच पाहिजे.
सुपरस्टायलिश लूक देणारे कॉलर ब्लाऊजचे १० सुंदर पॅटर्न- लग्नसराईमध्ये दिसाल एकदम आकर्षक
८. तुमचं रात्रीचं जेवण आणि झोप यामध्ये २ तासांचं अंतर असायलाच हवं.
९. दररोज १ तास कोणताही शारिरीक व्यायाम करायलाच हवा.