Join us  

आलिया भटची फिटनेस ट्रेनर सांगतेय स्ट्रेचिंगचे ९ प्रकार, फिट राहायचं तर एवढं तरी कराच..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 26, 2022 8:16 AM

9 Types of Stretches: खूप काही धावपळ न करता बसल्या बसल्या करता येतील, असे सहज सोपे स्ट्रेचिंगचे प्रकार. व्यायामाचा कंटाळा येतो, मग फिट राहण्यासाठी एवढं तरी करायलाच पाहिजे. 

ठळक मुद्दे अवघ्या ५ ते ७ मिनिटांत झटपट करता येतील, असे हे व्यायाम आहेत. याला ऑफिसमधे करता येण्यासारखा चेअर योगा असं म्हटलं तरी ते वावगं ठरणार नाही.

आलिया भटसह अनेकांना फिटनेसबाबत मार्गदर्शन करणाऱ्या सेलिब्रिटी फिटनेस ट्रेनर अनुष्का परवानी (fitness trainer Anushka Parwani) सोशल मिडियावर जबरदस्त ॲक्टीव्ह असतात. वेगवेगळ्या व्हिडिओच्या माध्यमातून त्या नेहमीच फिटनेसबाबत छोट्या छोट्या टिप्स देत असतात, ज्या रुटीनमध्ये प्रत्येकासाठीच अतिशय उपयुक्त ठरतात. आता फिट रहायचं असेल तर व्यायामाला पर्याय नाही. पण अनेकदा व्यायामाला (exercise) वेळ नसतो किंवा मग कंटाळा येतो. अशावेळी व्यायामात खंड पडू नये, म्हणून कमीतकमी स्ट्रेचिंगचे काही प्रकार तरी केलेच पाहिजेत. 

 

अनुष्का यांनी जे काही व्यायाम प्रकार सांगितले आहेत, ते अगदी एका जागी बसून सहज करता येण्यासारखे आहेत. या व्यायामाला त्यांनी joint exercises and stretches असे नाव दिले आहे. हे व्यायाम नियमित केल्यामुळे जॉईंट्सला तर आराम मिळतोच शिवाय तेथील स्नायुंचा लवचिकपणाही वाढतो. शिवाय अवघ्या ५ ते ७ मिनिटांत झटपट करता येतील, असे हे व्यायाम आहेत. याला ऑफिसमधे करता येण्यासारखा चेअर योगा असं म्हटलं तरी ते वावगं ठरणार नाही.

 

प्रत्येकासाठी गरजेचे स्ट्रेचिंगचे प्रकार- नेक रोटेशन म्हणजे मानेचे व्यायाम करा. यामध्ये मान क्लॉकवाईज आणि ॲण्टीक्लॉकवाईज दिशेने गाेलाकार फिरवा. त्यानंतर वर- खाली, डावीकडून उजवीकडे, उजवीकडून डावीकडे अशा पद्धतीने मान हलवा.- मानेचं झाल्यानंतर खांदा गोलाकार फिरवून खांद्याची हालचाल करा.- यानंतर कोपऱ्यापासून हाता खाली- वर तसेच गोलाकार फिरवा.- हळूहळू मनागटाकडे या. यानंतर मनगटाच्या जॉईंटपासून हात गोलाकार फिरवा.- हातांच्या बोटांची उघडझाप करा. एका हाताचे तळवे दुसऱ्या हातात पकडून आधी वरच्या बाजूने तर नंतर खालच्या बाजूने ओढा. दोन्ही हातांनी अशाच पद्धतीने व्यायाम करा.- यानंतर बसल्या- बसल्याच सगळे शरीर आधी डावीकडे नंतर उजवीकडे वळवा. यामुळे पाठीच्या कण्याचाही व्यायाम होतो.- दोन्ही हात वर करून एकमेकांत गुंफा. यानंतर एकेक करत दोन्ही बाजूंनी खाली वाका आणि साईड स्ट्रेच करण्याचा प्रयत्न करा.  

टॅग्स :फिटनेस टिप्सव्यायामआलिया भट