Join us  

लग्न जवळ आलं पण अद्यापही वजन कमी झाले नाही? लाईफस्टाईलमध्ये करा ८ सोपे बदल, वजन होईल झरझर कमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 20, 2023 5:04 PM

A Bride's Guide To Wedding Weight Loss : लग्नात दिसायचं स्लिम-फिट, मग लागा तयारीला, लग्नापर्यंत व्हाल फिट-दिसाल सुडौल..

प्रत्येक मुलीसाठी लग्नाचा (Marriage Day) दिवस अत्यंत खास असतो. लग्न ठरल्यानंतर मुली आपल्या लग्नाच्या तयारीला लागतात. ड्रेस, साडी, मेकअप, जेवण, आमंत्रण या सगळ्या गोष्टी आवरण्यात लग्नाचा दिवस कधी जवळ येईल सांगता येत नाही. काही महिला लग्नाच्या काही दिवसाआधी वजन कमी करण्यासाठी विशेष मेहनत घेतात.

आजकाल लग्नाआधी देखील प्री-वेडिंग शूट (Pre-wedding Shoot) करण्यात येते.  या फोटो शूटमध्ये बऱ्याच महिलांना सुडौल-सुंदर (Weight loss) दिसायचे असते. पण अनेकदा मेहनत घेऊनही वजन लवकर कमी होत नाही. जर आपल्याला लग्नामध्ये स्लिम-फिट दिसायचं असेल तर, काही विशेष टिप्स फॉलो करून पाहा. या टिप्समुळे वजन कमी करण्यास तर मदत होईलच, शिवाय चेहऱ्यावर नवा तेज येईल(A Bride's Guide To Wedding Weight Loss).

लग्नाआधी स्लिम-फिट फिगर हवी? तर फॉलो करा काही खास टिप्स

- ऑन्ली माय हेल्थ या वेबसाईटनुसार, लग्नाआधी स्लिम फिगर हवी असेल तर, त्यासाठी लग्नाच्या एक महिनाआधी तयारीला लागा. आपल्या आहारात पौष्टीक पदार्थांचा समावेश करा. शिवाय संतुलित-पौष्टीक पदार्थांचा आहारात समावेश करा. त्यात फायबर आणि प्रोटीनसारखे पौष्टीक घटकांचा समावेश असेल हे तपासा.

- आपल्या आहारात व्हिटॅमिन सीयुक्त फळांचा समावेश करा. किवी, संत्री, लिंबू, पेरू इत्यादी फळं नियमित खा. यामुळे आपले वजन तर कमी होईलच, शिवाय चेहऱ्यावर नवा तेजही येईल.

- लग्नाच्या तयारीत आपण कितीही व्यस्त असलात तरी, सकाळी योग आणि व्यायामासाठी विशेष वेळ काढा. वजन कमी करण्यासाठी व्यायाम महत्वाचा, यामुळे आपण तंदुरुस्त तर राहालाच, शिवाय त्वचा देखील उजळेल. योग केल्याने आपली मानसिक स्थिती सुधारेल.

वजन कमी करायचं, पण व्यायाम-डाएट फॉलो होत नाही? झोपताना न चुकता करा १ सोपा उपाय, झरझर घटेल वजन

- निरोगी आरोग्यासाठी आराम, झोपही महत्वाची. झोपेच्या कमतरतेमुळे अनेकदा वजन कमी होत नाही, शिवाय डोळ्यांखाली डार्क सर्कलही निर्माण होतात. त्यामुळे नियमित ७ ते ८ तासांची झोप घ्या.

- किचनमधले काही मसाले वजन कमी करण्यास मदत करतात. भारतीय मसाले वजन तर कमी करण्यास मदत करतेच, शिवाय रोगप्रतिकारशक्तीही मजबूत करते.

- निरोगी आरोग्य आणि चमकदार चेहऱ्यासाठी पाणी पीत राहणे गरजेचं आहे. आपल्या दिवसाची सुरुवात कोमट पाण्याने करा आणि दिवसभरात किमान ३ ते ४ लिटर पाणी प्या. नियमित भरपूर पाणी प्यायल्याने शरीर डिटॉक्स होते. ज्यामुळे शरीरातील विषारी घटक बाहेर पडतात.

८ तास नोकरी-२ तास प्रवास-व्यायाम कधी करणार? फक्त २० मिनिटं करा शतपावली, बघा वजनाची जादू

- अनेकदा लग्नाची तारीख जवळ आली की मनात स्ट्रेस निर्माण होते, यासह इतर कारणांमुळेही स्ट्रेस वाढते. त्यामुळे तणावापासून दूर राहा. यासाठी योग आणि मेडीटेशन करा. नियमित १० मिनिटांसाठी मेडीटेशन करा.

- जर आपल्याला वजन कमी करताना अडचण निर्माण होत असेल तर, पोषणतज्ज्ञांचा सल्ला घ्या. 

टॅग्स :वेट लॉस टिप्सलग्नफिटनेस टिप्स