तंदुरुस्त राहण्यासाठी यासह आकर्षक शरीर बनवण्यासाठी व्यायाम करणे खूप महत्वाचे आहे. व्यायामशाळेत जाऊन तासंतास घाम गाळणे केव्हाही उत्तम. परंतु असे देखील काही व्यायाम आहेत जे कोणत्याही उपकरणाशिवाय घरी केले जाऊ शकतात. काहींना दररोज व्यायाम शाळेत जाऊन व्यायाम करायला जमत नाही. यावेळी आपण बॉक्स जंप हा व्यायाम करू शकता.
हा व्यायाम केल्याने तुमचे नितंबांचे स्नायू मजबूत आणि टोन्ड होतात. यासह थाईचे स्नायू सुधारण्यासोबतच पायांनाही मजबुती देतात. केवळ सामान्य माणूसच नाही तर सेलिब्रिटी आणि क्रिकेटपटूंनाही हा व्यायाम करायला फार आवडतो. हे करण्यासाठी आपल्याला जिममध्ये जाण्याची गरज नाही, आपण हा व्यायाम घरी देखील करू शकता. बॉक्स जंप या व्यायामाचे अनेक फायदे आहेत. याने वजन देखील लवकर कमी होण्यास मदत मिळते.
हिपचे स्नायू मजबूत करते
हिपचे स्नायू मजबूत ठेवणे खूप महत्वाचे आहे. बॉक्स जंप या व्यायामामध्ये स्नायूंवर जास्त भर दिला जातो. या व्यायामात नितंबांच्या स्नायूंवर प्रामुख्याने जास्त ताण पडतो, ज्यामुळे एक प्रकारे स्नायू सक्रिय आणि मजबूत होण्यास मदत मिळते.
ताकद वाढवण्यास मदतगार
बॉक्स जंप व्यायाम केल्याने शरीराची ताकद वाढते. जिममध्ये जाण्यापूर्वी आपण बॉक्स जंप व्यायाम करू शकता. ज्यामुळे तुमची शारीरिक क्षमता वाढण्यास मदत होते. बॉक्स जंप हा व्यायाम केल्याने, थकवा आणि आळशीपणा शरीरात येत नाही, शरीराला एक चांगली उर्जा मिळते. यामुळे तुमचा स्टॅमिना आणि ताकद दोन्ही वाढेल.
वजन कमी करण्यासाठी प्रभावी
बॉक्स जंप व्यायाम केवळ शरीर मजबूत करत नाही तर, वजन कमी करण्यातही मदत करते. बरेच लोक वजन कमी करण्यासाठी याचा अवलंब करतात. दररोज एक तास बॉक्स जंप व्यायाम करून आपण ८०० ते १००० कॅलरीज सहज कमी करू शकता. हा व्यायाम नियमित केल्याने पोटाभोवतीची अतिरिक्त चरबी सहजपणे कमी होते. यासह शरीरातील मेटाबॉलिक रेट वाढतो.
बॉडी पोश्चर सुधारते
बॉक्स जंप या व्यायामामुळे बॉडी पोश्चर सुधारते. हा व्यायाम नियमित केल्याने शरीराला आकर्षक आकार मिळतो. शरीराच्या खालच्या भागाला आकार देण्यासोबतच शरीराच्या वरच्या भागाला टोन्ड बनवण्यातही मदत होते. हा व्यायाम आपल्या शरीरातील चरबीचे प्रमाण संतुलित करते, ज्यामुळे तुमचे शरीर आपोआपच टोन्ड रूपात येते.
गुडघे निरोगी ठेवते
आजकालची लोकं गुडघेदुखीने त्रस्त आहेत. बॉक्स जंप व्यायामाचा नियमित सराव केल्यामुळे गुडघ्यांना आराम मिळतो. गुडघे मजबूत होतात. हा व्यायाम करताना सर्व भार गुडघ्यांवर येतो, ज्यामुळे गुडघे सक्रिय राहतात आणि गुडघेदुखीच्या समस्येपासूनही आराम मिळतो.
समतोल राखण्यास उपयुक्त
जर आपण बॉक्स जंप व्यायामाचा नियमित सराव करत असाल तर, आपल्याला स्वतःचे बँलेंस राखायला उत्तम जमेल. यामुळे पायांची पकड मजबूत होते. चांगले संतुलन मिळविण्यासाठी तुम्ही दररोज हा व्यायाम करू शकता.