Join us  

आमीर खानने कसं कमी केलं २७ किलो वजन? वजन झटपट कमी करण्यासाठी पाहा त्याचं ‘खास’ डाएट

By ऑनलाइन लोकमत | Published: June 14, 2024 11:36 AM

Aamir Khan Weight Loss Diet Protein Water : आमिर खानं आपलं वजन पुन्हा कमी करण्यासाठी स्वत:वर भरपूर मेहनत घेतली.

कलाकार हे नेहमीच आपली भूमिका उत्तमरित्या साकारण्याासाठी आपल्या शरीरावर वेगवेगळ्या प्रकारे मेहनत घेत असतात. प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेता आमिर खानने सुद्धा स्वत:वर भरपूर मेहनत घेतली त्यानंतर दंगल चित्रपटात झळकला. (Weight Loss Tips) या चित्रपटासाठी आमिर खानं स्वत:वर भरपूर मेहनत घेतली. एकदा वजन वाढलं की ते कमी करणं सोपं नसतं. आमिर खानं आपलं वजन पुन्हा कमी करण्यासाठी स्वत:वर भरपूर मेहनत घेतली. (Aamir Khan Weight Loss Diet Protein Water Intake Fat To Fit Transformation) 

आमिर खाननं हा रोल करण्यासाठी आधी २६ किलो वाढवलं होतं. नंतर पुन्हा १७ किलो कमी केलं.  ज्यात १३ किलो फॅट होते. सुरूवातीला बॉडी फॅट परसेंट ९ टक्क्यांपर्यंत होते.  या भूमिकेसाठी अमिर खानला फक्त वजन वाढवायचं नव्हतं तर मसल्स वाढवण्याचीही आवश्यकता होती. 

यासाठी अमिर खाननं ट्रेनर डॉक्टर. निखिल वी. धुरंधर सोबत मिळून कस्टमाईज डाएटची तयारी केली.  ज्यात त्यांचे ट्रांस्फॉर्मेशन झाले होते. डॉ. निखिल यांनी १५ हजारांपेक्षा जास्त लोकांचे वजन कमी केले आहे. अमिर खानचं ट्रांस्फॉर्मेशन त्यांच्यासाठी चॅलेंजिंग गोष्ट होती. कारण फॅट लॉससाठी कमी खाण्याची आणि मसल्स लॉससाठी जास्त खाण्याची गरज असते. 

या वेटलॉस जर्नीत आमिर खान  सकाळी ४ वाजता व्यायाम सुरू करत होता. ज्यात  ४५ मिनिटांचा कार्डिओ, ७५ मिनिटांचे वेट ट्रेनिंग, वॉकिंग, रनिंग, तर ६ ते ७ तासांचे वर्कआऊट याचा समावेश होता. आमिर जवळपास १८०० कॅलरीज घेत होते. मसल्स गेनसाठी जवळपास २१०० ते २३०० कॅलरीज घेतल्या.  डाएटमध्ये रोज १०० ते ११० ग्राम प्रोटीन असायचे.

चपातीला तूप लावून खाल्ल्याने वजन वाढतं का? चपातीला तूप लावाचयं की नाही, तज्ज्ञ सांगतात...

आमिर दिवसातून ६ वेळा थोडं थोडं खात होता. त्यानं एका मुलाखतीत सांगितले होते की,  मी सकाळच्या नाश्त्याला अंडी, दुपारी नॉनव्हेज आणि ग्रीन सॅलेड खायचो. रात्रीच्या जेवणात ग्रीन सॅलेड आणि ग्रील चिकनचा समावेश असायचा.

जास्वंदाचं रोपं लावलंय पण त्यात फुलंच नाही? मातीत 'ही' १ सिक्रेट वस्तू मिसळा, फुलचं फुलं येतील

दिवसभरात  ड्रायफ्रुट्स, प्रोटीन शेक आणि जवळपास  ३ ते ४ लिटर पाणीसुद्धा घ्यायचे, डाएट आणि वर्कआऊटबरोबर माईंडसेटची आवश्यकता असते.   दिवसभरात ड्रायफ्रुट्स, प्रोटीन शेक जवळपास ३ ते ४ लीटर पाणी लागत होतं.  डाएट आणि वर्कआऊटबरोबर  माईंड सेटची आवश्यकता असते. 

टॅग्स :हेल्थ टिप्सआरोग्यलाइफस्टाइलफिटनेस टिप्सआमिर खान