युरीक एसिड वाढल्यानं मासपेशींमध्ये वेदना जाणवतात तर कधी इतर शारिरीक समस्या उद्भवू शकतात. ताण,तणाव, जीवनशैलीतील बदल यामुळे शरीरातील युरीक एसिडचं प्रमाण वाढतं. युरी एसिड वाढल्यानं किडन्या, लिव्हर आणि हृदयाच्या कार्यक्षमतेवर परिणाम होतो. यामुळे मांसपेशीतील वेदना वाढू शकतात. (How to lower uric acid levels naturally) युरिक एसिड वाढल्यानं हायपरयुरिसिमिया, किडनी स्टोन, गाऊटसारखे गंभीर आजार उद्भवू शकतात. फॅट टू स्लिमच्या डायरेक्टर आणि न्युट्रिशनिस्ट शिखा अग्रवाल यांनी खास ज्यूस सांगितले आहेत जे युरिक एसिड कमी करण्यास फायदेशीर ठरतात. (According to dietitian carrot and cucumber juice can reduce uric acid level naturally)
शरीरातील युरिक एसिड कसे कमी होते
युरिक एसिड कमी करण्यासाठी अनेक औषध उपलब्ध आहेत पण युरिक एसिड कमी करण्याचा सोपा उपाय म्हणजे खाण्यापिण्यातील बदल. सगळ्यात आधी प्युरिनयुक्त खाद्यपदार्थ मासे, बिअर, रेडमीट, ब्रोकोली यांसारखे पदार्थ जास्त खाऊ नये. याव्यतिरिक्त पाणीयुक्त पदार्थांचा आहारात समावेश करावा.
काकडीचा रस
काकडीच्या रसात लिंबू मिसळून प्यायल्यानं लिव्हर, किडनी डिटॉक्ट होण्यात मदत होते. आणि रक्तप्रवाहात यूरिक ऍसिडची पातळी कमी होते आणि किडनी डिटॉक्स करण्यास मदत होते. हे मूत्रपिंडाचे कार्य सुधारण्यास आणि शरीरातील विषारी पदार्थ बाहेर टाकण्यास मदत करते.
गाजराचा रस
गाजराचा रस लिंबाच्या रसात मिसळून प्यायल्याने युरिक अॅसिडचे वाढलेले प्रमाण नियंत्रित केले जाऊ शकते. कारण गाजराच्या रसामध्ये अँटिऑक्सिडंट्स, व्हिटॅमिन ए, फायबर, बीटा कॅरोटीन, मिनरल्स असतात जे यूरिक ऍसिड वाढल्याने होणारे नुकसान कमी करण्यास मदत करतात. तसेच, लिंबूमध्ये अँटिऑक्सिडेंट, व्हिटॅमिन सी असते, जे नैसर्गिकरित्या रोगप्रतिकार शक्ती वाढवते.
ग्रीन टी
ग्रीन टी केवळ तुमची रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करण्यास मदत करत नाही तर यूरिक ऍसिड कमी करण्यास देखील मदत करते. त्यात असलेले अँटिऑक्सिडंट्स आणि बायोएक्टिव्ह संयुगे काही दिवसांतच नैसर्गिकरित्या यूरिक अॅसिड कमी करण्यास मदत करू शकतात.