Lokmat Sakhi >Fitness > कंबर दुखते-हाडं ठणकतात; ICMR सांगते १० रूपयांत कॅल्शियम देणारे ५ पदार्थ खा, हाडं बळकट होतील

कंबर दुखते-हाडं ठणकतात; ICMR सांगते १० रूपयांत कॅल्शियम देणारे ५ पदार्थ खा, हाडं बळकट होतील

Eat These10 High Calcium Rich Foods To Strong Bones : कॅल्शियम मांसपेशींच्या संकुचनासाठी आवश्यक आहे. ज्यामुळे चालण्यास, पडण्यात आणि इतर शारीरिक कामकाज करण्यास मदत होते.

By ऑनलाइन लोकमत | Published: June 3, 2024 03:14 PM2024-06-03T15:14:18+5:302024-06-03T20:47:43+5:30

Eat These10 High Calcium Rich Foods To Strong Bones : कॅल्शियम मांसपेशींच्या संकुचनासाठी आवश्यक आहे. ज्यामुळे चालण्यास, पडण्यात आणि इतर शारीरिक कामकाज करण्यास मदत होते.

According To ICMR Eat These 10 High Calcium Rich Foods To Strong Bones And Teeth And Prevent Osteoporosis | कंबर दुखते-हाडं ठणकतात; ICMR सांगते १० रूपयांत कॅल्शियम देणारे ५ पदार्थ खा, हाडं बळकट होतील

कंबर दुखते-हाडं ठणकतात; ICMR सांगते १० रूपयांत कॅल्शियम देणारे ५ पदार्थ खा, हाडं बळकट होतील

कॅल्शियम (Calcium) शरीराच्या सर्वात महत्वपूर्ण मिनरल्सपैकी एक आहे. हाडं आणि दातांसाठी  कॅल्शियमयुक्त पदार्थ फायदेशीर ठरतात. (Top 10 Foods For Calcium According To ICMR) शरीराच्या सर्व कामकाजासाठी भेंडी उपयुक्त ठरते. कॅल्शियमच्या कमतरतेमुळे शरीरात गंभीर समस्या उद्भवू शकतात. शरीरात कॅल्शियमची कमतरता भासल्यास दात आणि हाडांवर याचा परिणाम दिसून येतो. (Foods For Calcium)

कॅल्शियम का गरजेचे आहे

आयसीएमआरच्या एक रिपोर्टनुसार टॉप १० कॅल्शियमयुक्त पदार्थांचा आहारात समावेश केल्यास पोषक तत्वांची कमतरता भरून निघण्यास मदत होईल. कॅल्शियम हाडं आणि दातांसाठी एक मुख्य घटक आहे ज्यामुळे दात मजबूत होण्यास मदत होते. (According To ICMR Eat These10 High Calcium Rich Foods To Strong Bones And Teeth And Prevent Osteoporosis) ज्यामुळे  बोन्स फॅक्चरचा धोका कमी होतो. कॅल्शियम मांसपेशींच्या संकुचनासाठी आवश्यक आहे. ज्यामुळे चालण्यास, पडण्यात आणि इतर शारीरिक कामकाज करण्यास मदत होते. याव्यतिरिक्त ब्लड क्लॉटींग आणि हृदयाचे आरोग्यही चांगले राहण्यास मदत होते.  

कॅल्शियमच्या कमतरतेची लक्षणं

हाडं कमकुवत होण, ऑस्टियोपोरोसिस, मांसपेशींच्या वेदना, थकवा, कमकुवतपणा,  हृदयाचे ठोके अनियमित होणं,  केस तुटणं, नखं तुटणं.

कॅल्शियमची जास्त गरज कोणाला असते

गर्भवती किंवा स्तनपान करणाऱ्या महिलांना आपल्या मुलांच्या विकासासाठी तसंच स्वत:चे  आरोग्य चांगले ठेवण्यासाठी कॅल्शियमची  आवश्यकता असते. वयस्कर लोकांच्या हाडांची डेन्सिटी कमी होते. ज्यामुळे फॅक्चर होण्याची शक्यता वाढते. ६ महिन्यांच्या लहान मुलांना ४०० मिलीग्राम,  १ ते ३ वर्षांच्या मुलांना ६०० मिलिग्राम तर ४ ते ८ वर्षांच्या मुलांना  ८००  मिलीग्राम कॅल्सियमची आवश्यकता असते.  

९ ते १८ वर्ष वयोगटातील लोकांना  १२०० मिलीग्राम कॅल्शियमची आवश्यकता असते. १९ ते ५० वर्ष वयोगटातील लोकांना ८०० मिलीग्राम कॅल्शियम,  १९ ते ५० वर्ष वयोगटातील महिलांना ८०० मिलीग्राम  कॅल्शियमची आवश्यकता असते.  ५१ वर्ष वयोगटातील  पुरूषांना ८०० मिलीग्राम कॅल्शियमची आवश्यकाता असते. महिलांना १२०० मिलीग्राम कॅल्शियमची गरज असते.

आयसीएमआरच्या रिपोर्टनुसार दुधापासून तयार झालेल्या पदार्थांमध्ये  ७५५ मिलीग्राम कॅल्शियम असते, सुक्या मसाल्यांमध्ये  ३६७.२  मिलीग्राम कॅल्शियम असते तर नट्समध्ये २११.६ मिलीग्राम कॅल्शियम असते. डाळी,  दूध,  मिलेट्ससुद्धा कॅल्शियमचा चांगला स्त्रोत आहेत. 

१) डेअरी उत्पादनं -दूध, पनीर, दही,  ताक

२) हिरव्या पालेभाज्या- पालक, मेथी, कोथिंबीर

३) सोया उत्पादनं- टोफू, सोयाबीन, सोया मिल्क

४) नट्स आणि बाीया- बदाम, अक्रोड, तीळ, खसखस

५) फळं- अंजीर, संत्री व्हिटामीन डी साठी  सप्लिमेंट्सचे सेवन करा. मॅग्नेशियमसाठी  हिरव्या पालेभाज्या, नट्स,  अन्नधान्य यांचा आहारात समावेश करा. प्रोटीन्ससाठी  शेंगा, बीयांचा आहारात समावेश करा.

Web Title: According To ICMR Eat These 10 High Calcium Rich Foods To Strong Bones And Teeth And Prevent Osteoporosis

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.