सद्गुरू जग्गी वासूदेव सोशल मीडियावर नेहमीच आरोग्यदायी व्हिडिओज शेअर करत असतात. त्यांच्या खाण्यापिण्याच्या सवयी, तब्येतीसाठी काय चांगले काय वाईट हे नेहमीच ते आपल्या चाहत्यांबरोबर शेअर करत असतात. (Health Tips) एका व्हिडिओत त्यांनी आपल्या जेवणाच्या आणि झोपण्याच्या सवयी कशा असाव्यात याबाबत सांगितले आहे. त्यांनी दिवसाला किती झोपावं, किती खावं याचं सोपं गणित सांगितलं आहे. (According To Sadhguru What Should Eat And How Long Should A Person Sleep For Good Health)
सद्गुरू जग्गी वासूदेव यांना काही विद्यार्थांनी विचारलं की कोणत्या प्रकारचं जेवण करायला हवं. या प्रश्नाचे उत्तर देत सद्गुरूंनी सांगितले की विद्यार्थ्यांनी हे लक्षात घ्यायला हवं की जेवणाचा कोणताही धर्म नसतो. याशिवाय जेवणाचीसुद्धा कोणती संस्कृती नसते. जेवण शरीरासाठी इंधनाप्रमाणे काम करते. चवीबाबत काही सांस्कृतिक पैलू असू शकतात. याशिवाय धार्मिक रंगतही वाढते. पण मुख्य स्वरूपात भोजन शरीरासाठी इंधन आहे.
केसांना टक्कल पडलं-वय जास्त दिसतं? आयुर्वेदीक डॉक्टर सांगतात १ उपाय करा, भरभर वाढतील केस
सद्गुरू सांगतात की जेवण यौगिक पद्धतीत तमस, रजस आणि सत्व रूपात दिसते.जेव्हा व्यक्ती अभ्यास करते तेव्हा एक प्रकारच्या संतुलित उर्जेची आवश्यकता असते. कारण त्यांना एक संतुलित आणि स्थिर मन हवे असते. विद्यार्थ्यांनी आपलं जेवण व्यवस्थित चावून खायला हवं. असं करावे कारण लाळेत एंजाईम्स असतात.
जेव्हा जेवण चावून खाल्लं जातं तेव्हा जेवणाचा 30 ते 50 टक्के भाग हा तोंडातच पचतो. पण सध्या जे लोक खात आहेत त्यात अधिकाधित पचलेलं किंवा आंशिक रूपात नष्ट जेवण करत आहेत. अशा स्थितीत उर्जा प्राप्त करण्यासाठी जेवणाचं प्रमाण वाढतं.
अधिक प्रमाात जेवण केल्यानं शरीराचं जडत्व वाढते. शरीरात जेव्हा जडपणा येतो तेव्हा व्यक्तीच्या झोपेचा कोटा वाढतो. झोपेबाबत सदगुरू सांगतात की जबरदस्ती जागं राहण्याची काही गरज नाही. योग्य प्रमाणात खा आणि शरीर चांगले ठेवण्याचा प्रयत्न करा.
विद्यार्थ्यांनी आपल्या आहारात कच्च्या भाज्या, फळांचा समावेश करायला हवा. ज्यात भाज्या, मोड आसलेली कडधान्य यांचा समावेश असतो. या अन्नामुळे व्यक्तीची मानसिक अवस्था, फोकस आणि झोपेवर चांगला परिणाम होतो. मांसाहारी पदार्थांपासून लांब राहा.