Join us  

अमृता खानविलकरने शेअर केलं तिचं फिटनेस सिक्रेट, बघा जबरदस्त वर्कआऊट व्हिडिओ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 06, 2022 8:18 AM

Fitness Tips By Amruta Khanvilkar: मराठी अभिनेत्री अमृता खानविलकर हिने रविवारच्या सुटीचा पुरेपूर उपयोग करत जबरदस्त वर्कआऊट केलं.. तिचा हा वर्कआऊट व्हिडिओ सध्या सोशल मिडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.

ठळक मुद्देइन्स्टाग्रामवर अमृताने शेअर केलेला हा व्हिडिओ चांगलाच व्हायरल झाला असून 'Sunday is the perfect day for a tough workout' असं कॅप्शन तिने या व्हिडिओला दिलं आहे.

बॉलीवूड अभिनेत्रींप्रमाणे मराठी अभिनेत्रीही त्यांचा फिटनेस सांभाळण्यात अजिबातच मागे नाहीत. त्यांच्या कामाचा भाग म्हणून आणि तब्येतीची काळजी म्हणूनही अनेक सेलिब्रिटी न चुकता व्यायाम करतात. काहीही झालं तरी त्यांचं वर्कआऊट सेशन सहसा बिघडत नाही. फिटनेसविषयीचा किंवा आरोग्याविषयीचा हाच जागरुकपणा आपल्या चाहत्यांमध्येही यावा, असा अनेक सेलिब्रिटींचा उद्देश असतो. मलायका अरोरा, शिल्पा शेट्टी, करिना कपूर, भाग्यश्री या अशाच काही अभिनेत्री. त्या नेहमीच त्यांचे वर्कआऊट व्हिडिओ (Tough workout by Amruta Khanvilkar) शेअर करून चाहत्यांना व्यायामासाठी प्रोत्साहन देत असतात. मराठी अभिनेत्री अमृता खानविलकर हिनेही तिचा एक वर्कआऊट व्हिडिओ (Amruta Khanvilkar shared her fitness secret) नुकताच शेअर केला आहे.

 

इन्स्टाग्रामवर अमृताने शेअर केलेला हा व्हिडिओ चांगलाच व्हायरल झाला असून 'Sunday is the perfect day for a tough workout' असं कॅप्शन तिने या व्हिडिओला दिलं आहे.

थंडीच्या दिवसांत रोपट्यांची काळजी कशी घ्यायची? ४ टिप्स... बाग दिसेल फ्रेश हिरवीगार 

आठवडाभराचं काम करून थकवा येतो. त्यामुळे रविवारच्या दिवशी अनेक जण नेहमीपेक्षा जरा जास्तच आळसावलेले असतात. पण अमृता मात्र रविवारचा पुरेपूर उपयोग तिच्या फिटनेससाठी करून घेते आणि त्यादिवशी नेहमीपेक्षा अवघड व्यायाम करते, असं तिच्या कॅप्शनवरून दिसून येतं.

 

व्हिडिओमध्ये अमृता ४ ते ५ प्रकारचे व्यायाम करताना दिसत आहे. पहिल्यांदा ती वॉल स्ट्रेच या प्रकारातला व्यायाम करते आहे. यामध्ये हॅण्डसॅण्ड प्रकारची तिची पोझिशन असून पाय भिंतीला लावून अधिकाधिक स्ट्रेच करते आहे.

तान्ह्या बाळाला पोटाशी धरून आईनं केला अप्रतिम बॅले डान्स, बघा देखणा व्हिडिओ

दुसऱ्या प्रकारात ती स्टिक स्ट्रेच करताना दिसते आहे. यात ती जमिनीवर पोटावर झोपली असून दोन्ही हात समोर आहेत आणि दोन्ही हातांमध्ये तिने काठी पकडली असून समोरून हात आणि मागून पाय जास्तीतजास्त ताणण्याचा तिचा प्रयत्न आहे. तिसऱ्या व्यायामात तिने चक्रासन केले आहे. चक्रासन आणि आधीच्या दोन व्यायामांमुळे पोटावरची चरबी कमी होण्यास फायदा होतो. तर चौथ्या प्रकारच्या व्यायामात अमृताने तिच्या फिटनेस ट्रेनरच्या मदतीने हॅण्डस्टॅण्ड केले आहे. 

 

 

टॅग्स :फिटनेस टिप्सअमृता खानविलकरव्यायाम