Join us  

मैने भी झाडू मारा.. भाग्यश्रीचा घर झाडतानाचा व्हायरल व्हिडिओ, ती म्हणते हा तर व्यायाम 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 13, 2022 1:18 PM

Fitness Tips by Actress Bhagyashree: अभिनेत्री भाग्यश्रीने दिलेला हा सल्ला, बघा तिचा व्हायरल व्हिडिओ..(viral video)

ठळक मुद्देभाग्यश्रीने तिचा एक व्हिडिओ नुकताच इन्स्टाग्रामला शेअर केला असून यामध्ये ती चक्क घर झाडताना दिसते आहे.

घर झाडणं, पुसून घेणं ही कामं अभिनेत्री भाग्यश्री (actress Bhagyashee is cleaning house) कशाला करेल? तिच्या घरी तर नोकर- चाकरांची फौज असणार. मग तिच्यावर घर झाडण्याची- पुसण्याची वेळ कशाला येईल? असं आपल्याला वाटत असेल तर ते अगदी योग्य आहे. भाग्यश्रीने तिचा एक व्हिडिओ नुकताच इन्स्टाग्रामला शेअर केला असून यामध्ये ती चक्क घर झाडताना दिसते आहे. आता असे व्हिडिओ फक्त शो ऑफ की ती मनापासून करतेय की फक्त सोशल मीडियापुरते या प्रश्नाचं उत्तर ज्यानं त्यानं आपापलं शोधावं. ती मात्र या घरकामाला वॉर्मअप एक्सरसाइज असं म्हणतेय.

 

तिचा हा घर झाडण्याचा व्हिडिओ बघता बघता चांगलाच व्हायरल झाला आहे. आपल्याला माहितीच आहे की भाग्यश्री सोशल मिडियावर अतिशय ॲक्टीव्ह असून ती तिच्या चाहत्यांना नेहमीच फिटनेस टिप्स देत असते. हा व्हिडिओ देखील तिने फिटनेसच्या बाबतीत टाकला असून तेच तिचं तिच्या चाहत्यांसाठी या आठवड्याचं #mondaymotivation आहे. 

फक्त १ मिनिटाचा व्यायाम, फुल बॉडी रिलॅक्स; बघा मलायका अरोराचा रिलॅक्सेशन फंडा

 

 

"My pre-workout !!" अशी कॅप्शनही तिने या व्हिडिओला दिली आहे. आता लक्षात आलंच असेल की ही सगळी कामं भाग्यश्री तिच्या वर्कआऊटच्या आधीचं वार्मअप म्हणून करतेय. पुढे ती असंही म्हणाली आहे की कोण म्हणतं घरकाम करणं हे फिटनेससाठी पुरेसं नाही म्हणून.. जर तुम्ही ते योग्य पद्धतीने केलं तर नक्कीच शरीरातले सुस्तावलेले स्नायु ॲक्टीव्ह करण्यासाठी त्याचा खूप चांगला उपयोग होऊ शकतो.

रिंकू राजगुरुसारखं सुंदर दिसायचंय, करा तिच्यासारखी २ जबरदस्त आसनं; फिगर आणि फिटनेस कमाल 

फक्त घर झाडण्याचंच नाही, तर पुसण्याचं कामही फिटनेसच्या दृष्टीने तेवढंच महत्त्वाचं आहे, असं तिचं म्हणणं आहे. 

 

घर झाडण्याचे आणि पुसण्याचे फायदे- याविषयी काही वर्षांपुर्वी नूम कंपनीने २ हजार लोकांचा अभ्यास केला होता. यामध्ये असं दिसून आलं की घराच्या साफसफाईचं काम ज्यांच्याकडे आहे, अशा व्यक्ती वर्षातून साधारण ३० तासांचा वेळ घर झाडण्यासाठी खर्च करतात. यातून वर्षभरात त्यांच्या ९२७७ कॅलरीज बर्न होतात. - तसेच ज्या व्यक्ती आठवड्यातून ४ वेळा घर पुसण्याचे काम करतात, त्यांच्या दरवर्षी ८७४७ एवढ्या कॅलरी बर्न होतात.  - ज्यांना पाठदुखी, मानदुखी असा त्रास आहे, अशा व्यक्तींनी झाडण्या- पुसण्याची काम वाकून करू नयेत.

टॅग्स :फिटनेस टिप्सस्वच्छता टिप्सभाग्यश्रीइन्स्टाग्रामव्यायाम