Lokmat Sakhi >Fitness > शरीराची लवचिकता टिकवून ठेवण्यासाठी फक्त रोज चालणे पुरेसे नाही, करा ३ व्यायाम, वाचा भाग्यश्रीचा सल्ला

शरीराची लवचिकता टिकवून ठेवण्यासाठी फक्त रोज चालणे पुरेसे नाही, करा ३ व्यायाम, वाचा भाग्यश्रीचा सल्ला

Exercise for the Body Flexibility: वॉकिंग करणे म्हणजेच चालणं शरीरासाठी फायदेशीर आहेच. पण शरीराची लवचिकता टिकवून ठेवायची असेल, तर त्यासोबतच अन्य काही व्यायामही केले पाहिजेच.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 31, 2023 09:06 AM2023-08-31T09:06:55+5:302023-08-31T09:10:06+5:30

Exercise for the Body Flexibility: वॉकिंग करणे म्हणजेच चालणं शरीरासाठी फायदेशीर आहेच. पण शरीराची लवचिकता टिकवून ठेवायची असेल, तर त्यासोबतच अन्य काही व्यायामही केले पाहिजेच.

Actress Bhagyashree Shares Exercise for the body flexibility, Must do exercise with walking | शरीराची लवचिकता टिकवून ठेवण्यासाठी फक्त रोज चालणे पुरेसे नाही, करा ३ व्यायाम, वाचा भाग्यश्रीचा सल्ला

शरीराची लवचिकता टिकवून ठेवण्यासाठी फक्त रोज चालणे पुरेसे नाही, करा ३ व्यायाम, वाचा भाग्यश्रीचा सल्ला

Highlightsशरीराची, जॉईंट्समधली लवचिकता टिकवून ठेवायची असेल, ॲक्टीव्ह राहायचं असेल, तर रोज वॉकिंगसोबतच इतरही काही हलके- फुलके व्यायाम करा

नित्यनेमाने सकाळी किंवा संध्याकाळी चालायला जाणाऱ्यांची संख्या खूप आहे. सकाळी एकदा अर्धा पाऊण तास किंवा आपापल्या वेळेनुसार चालून आल्याशिवाय अनेकांना चैन पडत नाही. अगदी वयस्कर व्यक्तीही रोज वॉकिंगला जातातच. पण जसंजसं वय वाढत जातं, तशीतशी हळूहळू शरीराची लवचिकता, जॉईंट्सची हालचाल कमी होत जाते. शिवाय तासनतास बसून काम केल्यामुळे पाठ- कंबरही आखडून जाते. म्हणूनच शरीराची, जॉईंट्समधली लवचिकता टिकवून ठेवायची असेल, ॲक्टीव्ह राहायचं असेल, तर रोज वॉकिंगसोबतच इतरही काही हलके- फुलके व्यायाम करा (Exercise for the Body Flexibility), असा सल्ला अभिनेत्री भाग्यश्री (Actress Bhagyashree) हिने दिला आहे. 

 

वॉकिंगसोबतच कोणते व्यायाम करावेत?
१. वॉकिंगसोबतच आपण ज्याला वार्मअप म्हणता येईल असे काही हलके- फुलके व्यायाम करू शकतो. हे वार्मअप केल्याने अंग मोकळं होण्यास नक्कीच मदत होते.

कलर केलेल्या केसांचा रंग टिकेल खूप दिवस, लावा जास्वंदाच्या फुलांचं खास कंडिशनर, केस चमकतील

२. भाग्यश्रीने जे व्यायाम सांगितले आहेत, त्याच्यातला पहिला व्यायाम करण्यासाठी दोन्ही तळहात आणि तळपाय जमिनीवर टेकवा. आता हात एकाच जागी ठेवा. एकानंतर एक पाय हलवा. उजवा पाय उजव्या बाजूने बाहेर काढा. पुन्हा जागेवर ठेवा. त्यानंतर दुसरा पाय दुसऱ्या बाजुने बाहेर काढा आणि पुन्हा जागेवर ठेवा.

 

३. यानंतर आता एकानंतर एक या पद्धतीने पाय तळहाताच्या बाजुला ठेवावा. उजवा पाय उजव्या हाताच्या बाजूने ठेवा. पुन्हा मागे घ्या. त्यानंतर असेच डाव्या पायाने करा. एकानंतर एक पायाची अशी हालचाल करा.

सारा खान ते माधुरी दिक्षित- सेलिब्रिटींनी साजरे केले रक्षाबंधन, मायेनं जपलं हक्काचंं नातं

४. यानंतर उभे राहून करण्याचे काही व्यायामही भाग्यश्रीने सांगितले आहेत. यामध्ये कंबर आणि पाठ या अवयवांचा विशेष व्यायाम होईल. 

 

Web Title: Actress Bhagyashree Shares Exercise for the body flexibility, Must do exercise with walking

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.