Lokmat Sakhi >Fitness > सुटलेलं पोट आणि कंबरेचा घेर कमी करण्यासाठी भाग्यश्री सांगतेय ४ व्यायाम- व्हाल एकदम फिट 

सुटलेलं पोट आणि कंबरेचा घेर कमी करण्यासाठी भाग्यश्री सांगतेय ४ व्यायाम- व्हाल एकदम फिट 

How To Lose Belly Fat?: पोटावरची आणि कंबरेवरची वाढलेली चरबी कमी करायची असेल तर अभिनेत्री भाग्यश्रीने सांगितलेले काही व्यायाम नियमितपणे करून बघा....(Actress Bhagyashree suggest exercise to lose belly fat)

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 2, 2025 15:18 IST2025-04-02T15:17:13+5:302025-04-02T15:18:50+5:30

How To Lose Belly Fat?: पोटावरची आणि कंबरेवरची वाढलेली चरबी कमी करायची असेल तर अभिनेत्री भाग्यश्रीने सांगितलेले काही व्यायाम नियमितपणे करून बघा....(Actress Bhagyashree suggest exercise to lose belly fat)

Actress Bhagyashree suggest exercise to lose belly fat, perfect exercise for slim body, Simple exercises to start breaking the fat on your obliques. | सुटलेलं पोट आणि कंबरेचा घेर कमी करण्यासाठी भाग्यश्री सांगतेय ४ व्यायाम- व्हाल एकदम फिट 

सुटलेलं पोट आणि कंबरेचा घेर कमी करण्यासाठी भाग्यश्री सांगतेय ४ व्यायाम- व्हाल एकदम फिट 

Highlightsअभिनेत्री भाग्यश्रीने एक व्हिडिओ नुकताच सोशल मीडियावर शेअर केला आहे. यामध्ये तिने एकूण ४ प्रकारचे व्यायाम सांगितले आहेत.

सध्या आपली जीवनशैली प्रचंड बदललेली आहे. त्यामुळेच अनेक जणांना वजनवाढीच्या समस्या जाणवत आहेत. काही जणांच्या बाबतीत असंही दिसून येतं की शरीर तर सुडौल असते. पण पोटाचा, कंबरेचा घेर मात्र वाढलेला असतो. अशामुळे मग शरीराला एक वेगळाच बेढबपणा येतो. म्हणूनच पोट आणि कंबरेवरची चरबी कमी करायची असेल तर अभिनेत्री भाग्यश्री सांगते आहे ते काही साधे- सोपे व्यायाम नियमितपणे करून बघा (Simple exercises to start breaking the fat on your obliques). हे व्यायाम करण्यासाठी खूपच कमी वेळ लागतो आणि शिवाय पोटावरची, कंबरेवरची चरबी कमी होण्यासोबतच फिटनेस टिकवून ठेवण्यासाठीही मदत होते.(Actress Bhagyashree suggest exercise to lose belly fat)

 

पोट आणि कंबरेवरची चरबी कमी करण्यासाठी कोणते व्यायाम करावे? 

अभिनेत्री भाग्यश्रीने एक व्हिडिओ नुकताच सोशल मीडियावर शेअर केला आहे. यामध्ये तिने एकूण ४ प्रकारचे व्यायाम सांगितले आहेत. सुटलेलं पोट सपाट होण्यासाठी हे व्यायाम काही दिवस नियमितपणे करून पाहा.. 

सोहा अली खानने शेअर केले ईद सेलिब्रेशनचे फोटो आणि करिना कपूरच झाली ट्रोल! बघा कारण 

१. पहिल्या प्रकारचा व्यायाम करण्यासाठी सरळ उभे राहा. दोन्ही हात एकमेकांमध्ये गुंफा. यानंतर उजवा पाय गुडघ्यात दुमडून तो डाव्या बाजूला आणा आणि डाव्या हाताने उजव्या पायाच्या गुडघ्यांना स्पर्श करा. अशीच क्रिया डाव्या बाजूनेही करावी. एकानंतर एक याप्रमाणे हा व्यायाम करावा.

उपवासाच्या साबुदाणा- बटाटा चकल्या करण्याची सगळ्यात सोपी रेसिपी- गॅस पेटविण्याचीही गरज नाही...

२. दुसरा व्यायाम करण्यासाठी दोन्ही पायात थोडे अंतर ठेवा. त्यानंतर उजवा हात वर उचलून संपूर्ण शरीर उजव्या हातासकट डाव्या बाजूने झुकवा. पुन्हा पुर्वस्थितीत या आणि डावा हात वर उचलून शरीर उजव्या बाजूने झुकवा. ही क्रियासुद्धा एका नंतर एक या पद्धतीने करावी. 

 

३. तिसरा व्यायाम करण्यासाठी दोन्ही पायात अंतर घेऊन भिंतीच्या समोर भिंतीकडे पाठ करून उभे राहा.  यानंतर उजव्या बाजुला वळून दोन्ही तळहात भिंतीला लावा आणि त्यानंतर डाव्या बाजुला वळून दोन्ही तळहात पुन्हा भिंतीला लावा.  

मुलांचं वजन वाढतच नाही? डॉक्टर सांगतात ४ उपाय- थोडंस खाऊनही मिळेल भरपूर एनर्जी

४. चौथा व्यायाम करण्यासाठी दोन्ही तळहात एकमेकांवर गुंफून डोक्याच्या मागे लावा. त्यानंतर डावा पाय गुडघ्यात वाकून वर करा. डाव्या हाताच्या कोपऱ्याने डाव्या पायाच्या गुडघ्याला स्पर्श करा. अशाच पद्धतीने उजव्या बाजुनेही व्यायाम करा. हा व्यायाम आणि वरचे सगळेच व्यायाम एकानंतर एक या पद्धतीने २० वेळा करावे.


 

Web Title: Actress Bhagyashree suggest exercise to lose belly fat, perfect exercise for slim body, Simple exercises to start breaking the fat on your obliques.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.