Join us  

फिटनेस आणि परफेक्ट फिगरसाठी भाग्यश्री न चुकता करते १ सोपा व्यायाम, व्यायाम करतानाही येईल मजा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 26, 2024 9:43 AM

Actress bhagyashree tuesday tip about jumping for good fitness : वयाच्या पन्नाशीतही तिशीच्या तरुणीला लाजवेल इतकी सुंदर दिसणारी भाग्यश्री देते खास फिटनेस टिप

उत्तम आरोग्यासाठी व्यायामाचा आपल्या जीवनशैलीत अवश्य समावेश असायला हवा. हे आपल्याला माहित असूनही वेळ होत नाही या गोष्टीमुळे आपण व्यायाम करणे टाळतो. रोजच्या धावपळीत व्यायामासाठी वेगळा वेळ काढणे खरंच शक्य नसेल कदाचित. पण अगदी जाता-येता काही सोप्या गोष्टी केल्यास आपण फिटनेस आणि फिगर या दोन्हीकडे नक्कीच लक्ष देऊ शकतो. महिलांना तर आपली फिगर अभिनेत्रींसारखी असावी असं कायम वाटतं. पण त्यामागे त्या घेत असलेले कष्टही बरेच असतात हे आपल्याला दिसत नाही. प्रसिद्ध अभिनेत्री भाग्यश्री ही वयाच्या पन्नाशीतही तिशीच्या तरुणीला लाजवेल इतकी सुंदर दिसते. यामागे ती घेत असलेला आहार आणि व्यायाम हेच असल्याचे दिसते (Actress bhagyashree tuesday tip about jumping for good fitness). 

इन्स्टाग्रामवर अॅक्टीव्ह असणारी भाग्यश्री अनेकदा तिच्या फिटनेसचे रहस्य आपल्याशी शेअर करताना दिसते. यामध्ये कधी ती एखादी रेसिपी सांगते तर कधी महत्त्वाच्या डाएट टिप्स देते. कधी व्यायामाच्या सोप्या पद्धती सांगते तर कधी उत्तम आरोग्यासाठी काही सोप्या गोष्टी सांगते. तिची फिगर पाहून या वयातही तिने स्वत:ला इतके कसे फिट ठेवले असा प्रश्न आपल्याला पडतो. पण व्यायामाच्या बाबतीत असलेले सातत्य आणि आहारा यामुळे भाग्यश्रीचे सौंदर्य कायम असल्याचे दिसते. नुकताच भाग्यश्रीने इन्स्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केला असून त्यामध्ये तिने व्यायामातील एक अतिशय सोपा प्रकार सांगितला असून त्याचे महत्त्वही सांगितले आहे. हा व्यायामप्रकार कोणता आणि त्यामुळे कोणते फायदे होतात पाहूया...

(Image : Google)

न चुकता करायला हवा असा सोपा मजेशीर व्यायामप्रकार

उड्या मारणे ही गोष्ट आपण सगळ्यांनीच लहानपणी खूप जास्त प्रमाणात केलेली असते. तेव्हा आपल्याला ती करायला मजाही येते. पण जसजसे मोठे होत जातो आपले खेळणे आणि उड्या मारणे नकळत कमी होते. पण लहान मुलांसारख्या उड्या मारणे हा आरोग्यासाठी अतिशय उत्तम व्यायाम असल्याचे भाग्यश्रीचे म्हणजे आहे. उड्या मारण्यासाठी ट्रंपोलिन हा एक चांगला पर्याय ठरु शकतो. यामुळे गुडघ्याचे त्रास दूर राहतात तसेच यावर आपल्याला उड्या मारण्यासाठी जास्त कष्ट करावे लागत नसल्याने व्यायाम करताना येणारी मजा काही औरच असते. या उड्या मारताना आपल्या चेहऱ्यावर नकळत एकप्रकारची स्माईलही येते. बॅलन्स येत नाही तोवर हलक्या पद्धतीने उड्या मारा, नंतर हळूहळू स्पीड वाढवत न्या. त्यानंतर उड्यांमधले वेगवेगळे प्रकारही तुम्ही या ट्रंपोलिनवर ट्राय करु शकता असे ती सांगते.   

 

टॅग्स :फिटनेस टिप्सव्यायामभाग्यश्री