Lokmat Sakhi >Fitness > खाली डोकं- वर पाय! वयाच्या पन्नाशीतही भाग्यश्री करतेय जबरदस्त व्यायाम- वाचा ५ फायदे

खाली डोकं- वर पाय! वयाच्या पन्नाशीतही भाग्यश्री करतेय जबरदस्त व्यायाम- वाचा ५ फायदे

Fitness Tips By Actress Bhagyashree: अभिनेत्री भाग्यश्रीने सोशल मिडियावर नुकताच एक वर्कआऊट (workout) व्हिडिओ शेअर करत पुन्हा एकदा तिचा जबरदस्त फिटनेस दाखवला आहे.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 29, 2022 08:08 AM2022-12-29T08:08:25+5:302022-12-29T18:12:10+5:30

Fitness Tips By Actress Bhagyashree: अभिनेत्री भाग्यश्रीने सोशल मिडियावर नुकताच एक वर्कआऊट (workout) व्हिडिओ शेअर करत पुन्हा एकदा तिचा जबरदस्त फिटनेस दाखवला आहे.

Actress Bhagyashree's Inversion workout, Must watch her video that showing her amazing fitness  | खाली डोकं- वर पाय! वयाच्या पन्नाशीतही भाग्यश्री करतेय जबरदस्त व्यायाम- वाचा ५ फायदे

खाली डोकं- वर पाय! वयाच्या पन्नाशीतही भाग्यश्री करतेय जबरदस्त व्यायाम- वाचा ५ फायदे

Highlightsतिशी- पस्तीशीतले लोकही हा व्यायाम करण्यासाठी सहजासहजी तयार होत नाहीत. कारण त्यासाठी जबरदस्त फिटनेस लागतो. पण भाग्यश्री मात्र अगदी सहजतेने तो व्यायाम करते आहे.

मराठमोळी अभिनेत्री भाग्यश्री (Actress Bhagyashree) सोशल मिडियावर नेहमीच ॲक्टीव्ह असते. फिटनेसच्या बाबतीत तर ती प्रचंड जागरुक आहे. त्यामुळेच तर वयाच्या पन्नाशीतही ती एवढी फिट आणि ॲक्टीव्ह दिसते. फिटनेसबाबतची हीच जागृती आपल्या चाहत्यांमध्येही यावी, यासाठी ती दर आठवड्याला एक खास व्हिडिओ इन्स्टाग्रामवर शेअर करत असते. काही व्हिडिओंमधून ती डाएटबाबत माहिती देते तर काही व्हिडिओंमधून ती एखादा व्यायाम करून दाखवते आणि त्याचे फायदे समजावून सांगते. आता नुकताच तिने जो व्हिडिओ पोस्ट केला आहे, त्यामध्येही ती हॅण्डस्टॅण्ड (Actress Bhagyashree's Inversion workout) प्रकारातले काही व्यायाम (exercise) करून दाखवते आहे.

ती जो हॅण्डस्टॅण्ड किंवा इर्न्व्हजन Inversions प्रकारातला व्यायाम करते आहे, तो पाहूनच अनेकांचे धाबे दणाणते. तिशी- पस्तीशीतले लोकही हा व्यायाम करण्यासाठी सहजासहजी तयार होत नाहीत.

मधुमेह, बीपी, कॅन्सर हे आजार कमी वयातच होऊ नयेत म्हणून.... बघा तज्ज्ञ काय सांगतात

कारण त्यासाठी जबरदस्त फिटनेस लागतो. पण भाग्यश्री मात्र अगदी सहजतेने तो व्यायाम करते आहे. तिने इर्न्व्हजन प्रकारातले एकूण ३ व्यायाम केले आहेत. पहिल्या व्यायामात एक पाय भिंतीला आणि एक पाय गुडघ्यातून खाली वाकवलेला, असं एका नंतर एका पायाने ती करतेय. दुसऱ्या प्रकारात एक पाय भिंतीला आणि दुसरा थेट जमिनीला टेकलेला, अशा पद्धतीचा तिचा व्यायाम आहे. तर तिसऱ्या प्रकारात एका नंतर एक पाय मागच्या बाजूने ती स्ट्रेच करते आहे.

 

हॅण्डस्टॅण्ड किंवा इर्न्व्हजन व्यायामाचे फायदे
ज्यांना रक्तदाबाचा त्रास आहे, त्यांनी हा व्यायाम करू नये. शिवाय हा व्यायाम आधी फिटनेस तज्ज्ञांकडून व्यवस्थित शिकून घ्यावा आणि काही दिवस त्यांच्या मार्गदर्शनाखालीच करावा, असंही भाग्यश्रीने या पोस्टमध्ये सांगितलं आहे. 

हे काय भलतंच! चक्क गरमागरम तिखट मसाला जिलेबी? हा प्रयोग पाहूनच खवय्ये म्हणाले...
१. कंबरेच्या वरचे शरीर मजबूत होण्यासाठी उपयुक्त.

२. मेंदूला रक्तपुरवठा होण्यासाठी उत्तम व्यायाम. त्यामुळे एकाग्रता वाढून मन शांत होण्यास मदत होते.

३. फुफ्फुसांची ताकद वाढते.

४. बॉडी बॅलेन्सिंगसाठी उत्तम व्यायाम

५. चेहऱ्यावरचे तेज वाढण्यासाठीही उपयुक्त व्यायाम.

 

Web Title: Actress Bhagyashree's Inversion workout, Must watch her video that showing her amazing fitness 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.