Lokmat Sakhi >Fitness > नाजूक दिशा पटानीने उचललं ८० किलो वजन! एवढी ताकद कमवायला पाहा ती कोणते वर्कआऊट करते..

नाजूक दिशा पटानीने उचललं ८० किलो वजन! एवढी ताकद कमवायला पाहा ती कोणते वर्कआऊट करते..

Fitness tips: नाजूकसाजूक अगदी चवळीची शेंग दिसणारी दिशा पटानी (Disha Patani) तब्बल ८० किलो वजन उचलत असेल, असं वाटत नाही ना... मग बघाचा तिचा हा वर्कआऊटचा व्हिडिओ..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 23, 2022 02:26 PM2022-02-23T14:26:15+5:302022-02-23T14:27:03+5:30

Fitness tips: नाजूकसाजूक अगदी चवळीची शेंग दिसणारी दिशा पटानी (Disha Patani) तब्बल ८० किलो वजन उचलत असेल, असं वाटत नाही ना... मग बघाचा तिचा हा वर्कआऊटचा व्हिडिओ..

Actress Disha Patani pulls 80 kg weight while doing rack pull workout, know the Benefits of this exercise | नाजूक दिशा पटानीने उचललं ८० किलो वजन! एवढी ताकद कमवायला पाहा ती कोणते वर्कआऊट करते..

नाजूक दिशा पटानीने उचललं ८० किलो वजन! एवढी ताकद कमवायला पाहा ती कोणते वर्कआऊट करते..

HighlightsRack pull 5 reps 80 kg असं कॅप्शन तिने या व्हिडिओला दिलं आहे.. हा व्हिडिओ पाहून टायगर श्रॉफ तिला 'वंडर वुमन' असं म्हटला आहे. 

दिशा पटानी  म्हणजे बॉलीवूड अभिनेत्रींच्या नव्या फळीतलं एक आघाडीचं नाव. अभिनयासोबतच दिशाच्या ॲट्रॅक्टिव्ह फिगरची आणि फिटनेसची नेहमीच चर्चा होत असते. बॉलीवूडमधल्या ज्या काही फिटनेस फ्रिक अभिनेत्री आहेत, त्यापैकी एक म्हणजे दिशा. म्हणूनच तर तिचा फिटनेस एवढा जबरदस्त झाला आहे की तिने चक्क ३०- ४० नाही, तर तब्बल ८० किलोचं (Disha Patani's 80 kg rack pull workout) वजन उचललं आहे.. सध्या ती आणि टायगर श्रॉफ (Tiger Shroff) एकमेकांना डेट करत असून टायगरने तिचा हा व्हिडिओ पाहून तिला दिलेली कमेंटही चांगलीच चर्चेत आहे. 

 

दिशाचा हा व्हिडिओ चांगलाच व्हायरल झाला असून तिचे चाहते तिच्या फिटनेसचं तोंडभरून कौतूक करत  आहेत. दिशा नेहमीच इन्स्टाग्रामवर तिच्या वर्कआऊटचे वेगवेगळे व्हिडिओ, फोटो शेअर करत असते. आता जो तिचा लेटेस्ट व्हिडिओ आहे यामध्ये ती रॅक पुल वर्कआऊट करते आहे. rack pull workout हा वेटलिफ्टिंगचाच एक प्रकार आहे. संपूर्ण बॉडी फिटनेस मिळविण्यासाठी अशा प्रकारचं वर्कआऊट उपयुक्त ठरतं, असं मानलं जातं. Rack pull 5 reps 80 kg असं कॅप्शन तिने या व्हिडिओला दिलं आहे.. हा व्हिडिओ पाहून टायगर श्रॉफ तिला 'वंडर वुमन' असं म्हटला आहे. 

 

रॅक पुल वर्कआऊट म्हणजे काय 
- वेटलिफ्टिंगच्या दोन प्रकारांपैकी हा एक प्रकार.
- वेटलिफ्टिंगचा डेडलिफ्ट प्रकार आपल्याला माहिती आहे. या प्रकारात जमिनीवरून वजन उचलावं लागतं.
- या रॅक पूल प्रकारात मात्र तुमच्या गुडघ्याच्या थोडं खाली, एवढ्या उंचीवर वजन असतं आणि तिथूनच तुम्हाला ते उचलायचं असतं. ओघळलेले दंड- बगल याची लाज वाटते, स्लीव्ह्जलेस घालणं टाळता? हा व्यायाम करा, फिट दिसा
- डेडलिफ्टच्या तुलनेत रॅक पुल प्रकार थोडा कमी मेहनतीचा मानला जातो. पण असं असलं तरी या दोन्ही वर्कआऊटमधून सारखाच फायदा मिळतो, असं फिटनेस तज्ज्ञांचं मत आहे. 
- स्त्री- पुरूष दोघेही हे वर्कआऊट करू शकतात. मात्र यासाठी आवश्यक असणारी फिटनेस लेव्हल तुमच्याकडे असेल, तरच हे वर्कआऊट करावं.

 

रॅक पुल वर्कआऊट करण्याचे फायदे (benefits)
- कंबर आणि पाठ यांचे स्नायू मजबूत करणं हा या वर्कआऊटचा सगळ्यात मोठा उपयोग.
- हॅमस्ट्रिंग, पायाचे स्नायू, हात आणि खांदे यांच्या फिटनेससाठीही रॅक पुल वर्कआऊट करतात.
- pulling strength वाढविण्यासाठी हे वर्कआऊट उपयुक्त आहे.
- ॲथेलेटिक्स खेळाडूंना या वर्कआऊटचा अधिक फायदा होतो.
- शरीराची लवचिकता वाढविण्यासाठीही हा व्यायाम केला जातो. 

 

Web Title: Actress Disha Patani pulls 80 kg weight while doing rack pull workout, know the Benefits of this exercise

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.