Lokmat Sakhi >Fitness > योगा व्हील वापरून करिना कपूर करतेय स्ट्रेचिंग.. व्यायामाचा हा कोणता प्रकार- काय फायदे?

योगा व्हील वापरून करिना कपूर करतेय स्ट्रेचिंग.. व्यायामाचा हा कोणता प्रकार- काय फायदे?

Fitness Tips by Kareena Kapoor: अभिनेत्री करिना कपूर खान हिचा योगा करतानाचा एक व्हिडिओ सध्या सोशल मिडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. बघा असा नेमका कोणता व्यायाम करतेय ती..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 27, 2022 08:04 AM2022-11-27T08:04:54+5:302022-11-27T08:05:01+5:30

Fitness Tips by Kareena Kapoor: अभिनेत्री करिना कपूर खान हिचा योगा करतानाचा एक व्हिडिओ सध्या सोशल मिडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. बघा असा नेमका कोणता व्यायाम करतेय ती..

Actress Kareena Kapoor doing stretching using yoga wheel? Why to use yoga wheel for exercise? | योगा व्हील वापरून करिना कपूर करतेय स्ट्रेचिंग.. व्यायामाचा हा कोणता प्रकार- काय फायदे?

योगा व्हील वापरून करिना कपूर करतेय स्ट्रेचिंग.. व्यायामाचा हा कोणता प्रकार- काय फायदे?

Highlightsयोगा व्हील वापरून स्ट्रेचिंग केले तर शरीराचा बॅलेन्सही सांभाळला जातो आणि स्ट्रेचिंगही उत्तम होते.

बेबो म्हणजेच अभिनेत्री करिना कपूर (Kareena Kapoor) ही तिच्या तब्येतीबाबत, फिटनेसबाबत नेहमीच जागरुक असते. त्यामुळे सोशल मिडियावरही ती बऱ्याचदा योगा, व्यायाम, डाएट याविषयीच्या काही पोस्ट शेअर करत असते. सेलिब्रिटी फिटनेस ट्रेनर अंशुका परवानी (Anshuka Parwani) या तिच्या फिटनेस ट्रेनर आहेत. त्यामुळे अंशुकाच्या इन्स्टाग्राम पोस्टही बऱ्याचदा करिना कपूरच्याव्यायामासंदर्भात असतात. आता अंशुकाने नुकतीच एक पोस्ट सोशल मिडियावर शेअर केली असून यामध्ये करिना योगा व्हील (stretching using yoga wheel) वापरून व्यायाम करताना दिसते आहे. 

 

कसा व्यायाम करतेय करिना?
अंशुकाने शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये करिना कपूर स्ट्रेचिंगचा एक प्रकार करून दाखवत आहे. पण त्याची खासियत म्हणजे हे नेहमीप्रमाणे नुसतेच स्ट्रेचिंग नाही. कारण यामध्ये करिनानो योगा व्हील वापरले आहे.

त्वचेवर येईल ब्रायडल ग्लो... घ्या एक खास ज्यूस! दिसाल सुंदर आणि आरोग्यासाठीही फायदेशीर 

योगा व्हील वापरून स्ट्रेचिंग करण्याचा हा प्रकार खरेतर अनेकांसाठी नविनच आहे. व्हिडिओमध्ये असे दिसतेय की एक मध्यम आकाराचे व्हील करिनाने तिच्या पायाशी ठेवले होते. नंतर उजवा तळपाय व्हिलमध्ये अडकवून तिने ते उचलले आणि तसाच पाय उजव्या दिशेला नेऊन जमिनीला समांतर ठेवला. उजव्या हाताने ते व्हिल पकडले. त्याचवेळी डावा हात डाव्या बाजूला स्ट्रेच केला आणि डाव्या पायावर शरीराचा तोल सावरला. अर्थातच आता याच्या नंतर तिने डाव्या पायानेही अशाच पद्धतीचे आसन केले असणार. 

 

योगा व्हील वापरून का करायचे स्ट्रेचिंग?
योगा व्हील वापरून स्ट्रेचिंग करण्याचा सगळ्यात मुख्य फायदा म्हणजे आपल्याला बऱ्याचदा स्ट्रेचिंग करताना शरीराचा तोल व्यवस्थित सांभाळून ठेवणे जमत नाही.

९०० वर्षांचा इतिहास सांगणारी गुजरातची पटोला साडी... बघा तिचे सौंदर्य आणि खासियत 

त्यामुळे मग बऱ्याचदा स्ट्रेचिंग अचूक पद्धतीने होत नाही. पण जर योगा व्हील वापरून स्ट्रेचिंग केले तर मात्र शरीराचा बॅलेन्सही सांभाळला जातो आणि स्ट्रेचिंगही उत्तम होते.

 

Web Title: Actress Kareena Kapoor doing stretching using yoga wheel? Why to use yoga wheel for exercise?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.