Join us  

वयाच्या ६३ व्या वर्षी नीना गुप्ता करतेय जबरदस्त व्यायाम.. बघा व्हायरल व्हिडिओ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 30, 2022 8:14 AM

Fitness Tips by Neena Gupta: वयाच्या ६३ व्या वर्षी अभिनेत्री नीना गुप्ता ज्या पद्धतीने व्यायाम करत आहे, ते पाहून नेटिझन्स त्यांच्या फिटनेसचं जबरदस्त कौतूक करत आहेत. 

ठळक मुद्देफिटनेसच्या बाबतीत तर ज्या जागरुक आहेतच, पण आता मात्र त्या अधिक सजग झाल्या आहेत, हेच सांगणारा हा एक व्हिडिओ.

दिलखुलास, मनमोकळ्या आणि मनातलं सगळं स्पष्टपणे सांगून मोकळं होणाऱ्या अभिनेत्री म्हणून नीना गुप्ता यांच्याकडे पाहिलं जातं. त्यामुळे त्यांच्या अनेक विधानांची, मोकळ्याढाकळ्या स्वभावाची नेहमीच चर्चा होत असते. सध्या मात्र एका वेगळ्याच गोष्टीमुळे त्या चर्चेत आल्या आहेत. ती गोष्ट म्हणजे त्यांचा फिटनेस आणि त्या करत असलेला व्यायाम. फिटनेसच्या बाबतीत तर ज्या जागरुक आहेतच, पण आता मात्र त्या अधिक सजग झाल्या आहेत, हेच सांगणारा हा एक व्हिडिओ.

 

काही तासांपुर्वी नीना गुप्ता यांनी हा व्हिडिओ शेअर केला असून त्याला लाखो लाईक्स मिळाले आहेत. "Just started but showing off...", असं कॅप्शन त्यांनी या व्हिडिओला दिलं आहे.

जुने झालेले टुथब्रश फेकून देऊ नका, ७ पद्धतींनी त्याचा वापर करा, स्वच्छतेची कामं होतील झटपट

त्यांनी त्यांच्यासाठी नुकताच एक पर्सनल फिटनेस ट्रेनर ठेवला असून त्या अधिक काटेकोरपणे त्यांचं रोजचं वर्कआऊट करत असल्याचीही चर्चा आहे. कदाचित त्यामुळेच अशा पद्धतीचं कॅप्शन त्यांनी दिलं असावं. या व्हिडिओमध्ये त्या त्यांच्या फिटनेस ट्रेनरच्या मार्गदर्शनाखाली पुशअप्स करताना दिसत आहेत. तुमच्यासाठी 'showing off' असला तरी कित्येक जणांसाठी तुमचा हा व्हिडिओ प्रेरणादायी आहे, अशा पद्धतीच्या अनेक कमेंटही त्यांना आल्या आहेत. 

 

पुशअप्स करण्याचे फायदेBenefits of Pushups१. हाताचे आणि खांद्याचे स्नायू बळकट करण्यासाठी हा व्यायाम फायदेशीर मानला जातो.

२. या व्हिडिओमध्ये नीना गुप्ता हाफ पुशअप्स हा प्रकार करताना दिसत आहेत. हा प्रकार हृदय, फुफ्फुस यांच्या आरोग्यासाठी उत्तम मानला जातो.

फक्त १० रुपयांत घरच्याघरी करा नॅचरल ब्लीच, काळवंडलेला चेहरा होईल फ्रेश- तुकतुकीत

३. पोटावरची चरबी कमी करण्यासाठीही पुशअप्स फायदेशीर मानले जातात.

४. बॉडी टोन्ड राहण्यासाठी किंवा परफेक्ट फिगरसाठी हा व्यायाम केला जातो. 

 

टॅग्स :फिटनेस टिप्सनीना गुप्ताव्यायाम