Join us  

प्रिटी झिंटा म्हणते, ''पुन्हा नव्याने जिममध्ये येणं अमेझिंग आहे!"- जिममध्ये येताच केलं असं वर्कआऊट..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 29, 2022 1:14 PM

Weight Loss Workout: खूप दिवसांनी जीममध्ये गेल्यावर नेमकं कोणतं वर्कआऊट करून व्यायामाची सुरुवात करावी, अशा विचारात असाल, तर प्रिटी झिंटाचा (Preity Zinta) हा व्हायरल व्हिडिओ बघाच..

ठळक मुद्देअशा पद्धतीचे वर्कआऊट वेटलॉस, इंचेसलॉससाठी अतिशय उपयुक्त ठरते.

४६ वर्षांची प्रिटी झिंटा या वयातही कमालीची फिट आहे. सध्या विदेशात वास्तव्यास असणारी प्रिटी नेहमीच सोशल मिडियावर ॲक्टीव्ह असते. कधी तिच्या लहान बाळांचे फोटो शेअर करते तर कधी तिच्या वेगवेगळ्या ॲक्टीव्हिटीज चाहत्यांसोबत शेअर करत असते. तिच्या घराभोवती तिने एक छान बगिचा फुलवला आहे. या तिच्या बागेचे फोटोही चांगलेच व्हायरल झाले होते. आता सध्या प्रिटी झिंटाचा (Preity Zinta) आणखी एक व्हिडिओ गाजतो आहे. यामध्ये ती वर्कआऊट (workout video) करताना दिसतेय.

 

''Amazing to be back in the gym after forever'' असं कॅप्शन तिने तिच्या या व्हिडिओला दिलं आहे. या वर्कआऊटमध्ये ती पिलेट्स प्रकारातले वर्कआऊट करताना दिसते आहे. पिलेट्स विथ वेट हा तिच्या वर्कआऊटचा प्रकार आहे. हे वर्कआऊट करण्यासाठी ती पाठीवर झोपली आहे. दोन्ही हातात वेट आहे. दोन्ही पाय जमिनीवरून वर उचललेले आहेत. एक पाय आणि एक पुढे तर दुसरा पाय ाआणि दुसरा हात मागे, अशा पद्धतीने तिचा व्यायाम सुरू आहे. बघायला हे वर्कआऊट अगदी सोपं वाटतं. पण पाय जमिनीवर न टेकवता अशा पद्धतीने व्यायाम करणं खरोखरंच अतिशय कष्टदायी आहे. 

 

पिलेट्स वर्कआऊट करण्याचे फायदे (benefits of pilates workout)१. अशा पद्धतीचे वर्कआऊट वेटलॉस, इंचेसलॉससाठी (weight loss and inches loss) अतिशय उपयुक्त ठरते.२. प्रिटी झिंटासारखं फ्लॅट पोट हवं असेल, तर अशा पद्धतीचा व्यायाम करायलाच पाहिजे.३. या वर्कआऊटमुळे फुफ्फुसांची कार्यक्षमता वाढते.४. हिप्स आणि थाय (hips and thigh ratio) फॅट कमी करण्यासाठी हा व्यायाम उपयुक्त ठरतो.५. हे वर्कआऊट करताना हात, पाय, पाठ, पोट, कंबर अशा सगळ्याच अवयवांचा व्यायाम होत असल्याने या व्यायामाला Full Body Workout म्हणूनही ओळखलं जातं.

 

टॅग्स :फिटनेस टिप्सव्यायामप्रीती झिंटासेलिब्रिटी