Join us  

रश्मिका मंदानासारखी परफेक्ट फिगर आणि तेजस्वी चेहरा हवा? रश्मिका सांगते, करा १ गोष्ट रोज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 17, 2024 4:28 PM

Actress Rashmika Mandana Fitness tip to Fans : नैसर्गिक सौंदर्य कायम ठेवत फिगर जपण्यासाठी रश्मिका न चुकता करते १ गोष्ट..

प्रसिद्ध दाक्षिणात्य अभिनेत्री रश्मिका मंदाना हिचे दक्षिणेकडेच नाही तर जगभरात असंख्य चाहते आहेत. ताकदीच्या अभिनयासोबतच तिची परफेक्ट फिगर, सौंदर्य यांमुळे तिच्या चाहत्यांच्या संख्येत दिवसेंदिवस भरच पडत आहे. बॉलिवूडमधील अभिनेत्री आपली फिगर आणि सौंदर्य जपण्यासाठी फिटनेस, आहार यांना विशेष महत्त्व देत असल्याचे आपण अनेकदा पाहतो. रश्मिकाही याला अपवाद नाही. नैसर्गिक सौंदर्य कायम ठेवायचे असेल आणि फिगर जपायची असेल तर अभिनेत्रींनाही फिटनेसशिवाय पर्याय नसतो. मानसिक, शारीरिक आरोग्य उत्तम ठेवण्यासाठी बहुतांश अभिनेत्री नियमित व्यायाम करत असल्याचे दिसते. रश्मिकाही उत्तम तब्येतीसाठी नियमित वर्कआऊट करते. तिचे वर्कआऊट करतानाचे काही व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरलही झाले आहेत (Actress Rashmika Mandana Fitness tip to Fans). 

१ गोष्ट न चुकता करायलाच हवी

तुम्हाला चांगली फिगर आणि फिटनेस हवा असेल तर १ गोष्ट नियमितपणे आवर्जून करायला हवी असं रश्मिका सांगते. ती गोष्ट म्हणजे दुसरं तिसरं काही नसून स्ट्रेचिंग हे आहे. रश्मिका नियमितपणे विविध प्रकारचे स्ट्रेचिंगचे व्यायाम करते आणि आपल्या चाहत्यांनाही स्ट्रेचिंग करण्याचा सल्ला देते. नुकतीच रश्मिकाने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक स्टोरी शेअर केली होती. यामध्ये तिने स्ट्रेचिंग करायला कधीच विसरु नका असे सांगत स्वत:चा स्ट्रेचिंग करतानाचा एक फोटो शेअर केला होता. स्ट्रेचिंग आपल्या शरीरासाठी अतिशय आवश्यक असते आणि वय वाढते तसे शरीर फिट राहण्यासाठी स्ट्रेचिंग करण्याचा फायदा होतो असे ती म्हणते. 

कोणताही व्यायाम सुरू करण्याच्या आधी आणि व्यायाम संपत आल्यावर स्ट्रेचिंग करणे आवश्यक असते. त्यामुळे व्यायाम करताना होणाऱ्या अपघातापासून आपण दूर राहू शकतो. आधी स्ट्रेचिंग केले की स्नायू व्यायामासाठी तयार होतात तर व्यायाम झाल्यावर स्नायूंना रिलॅक्स करण्यासाठी नंतरचे स्ट्रेचिंग उपयुक्त ठरते. स्ट्रेचिंगमुळे स्नायूंमधील रक्तप्रवाह सुधारण्यास चांगली मदत होते. तसेच स्नायूंमधील ताकद वाढण्यासाठी, हालचाल सुरळीत होण्यासाठी आणि जुने दुखणे दूर होण्यासाठी स्ट्रेचिंग फायदेशीर असते. म्हणूनच व्यायाम सुरू करण्याआधी मान, खांदे, हात, कंबर, मणका, पाठ, पायाचे स्नायू यांचे हळूहळू स्ट्रेचिंग करायला हवे. स्ट्रेचिंगमुळे शरीराची लवचिकता वाढत असल्याने त्याचा व्यायाम करताना निश्चितच फायदा होतो. 

 

टॅग्स :फिटनेस टिप्सव्यायामरश्मिका मंदाना