Join us  

रिंकू राजगुरुसारखं सुंदर दिसायचंय, करा तिच्यासारखी २ जबरदस्त आसनं; फिगर आणि फिटनेस कमाल 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 11, 2022 4:21 PM

Rinku Rajguru's Fitness Secret: रिंकू करतेय तो व्यायाम पोट कमी होण्यासाठी (how to reduce belly fat) अतिशय उपयुक्त आहे... स्लिमट्रीम व्हायचं तर ही काही योगासने (yoga) करायलाच हवीत..

ठळक मुद्देपरफेक्ट शेप असणारी टोन्ड बॉडी मिळविण्यासाठी ही दोन्ही आसनं अतिशय उपयोगाची ठरतात.तिचं हे वर्कआऊट आणि तिच्यामध्ये फिटनेसच्या बाबतीत झालेला बदल तिच्या चाहत्यांसाठीही सुखद आहे.

रेग्युलर वर्कआऊट आणि डाएट (workout and diet for fitness) हा तर जवळपास सगळ्याच अभिनेत्रींच्या रुटीनचा एक अत्यावश्यक भाग. आपल्याला कधी  मलायका अरोरा योगा करताना दिसते, तर कधी शिल्पा शेट्टीचं (shilpa shetty's workout) कमाल वर्कआऊट आवडून जातं. कधी जान्हवी कपूर, सारा अली खान तर कधी दक्षिणेतली समंथा प्रभु यांचं वर्कआऊट पाहूनही आपल्याला व्यायाम करण्याचा उत्साह येतो. या बाबतीत आपल्या मराठी अभिनेत्रीही अजिबातच मागे नाहीत बरं का.. आपली 'सैराट'ची 'आर्ची' म्हणजेच अभिनेत्री रिंकू राजगुरु हिचा एक वर्कआऊट व्हिडिओ (workout video of Rinku Rajguru) नुकताच व्हायरल (fitness video) झाला आहे. यात रिंकू जबरदस्त व्यायाम करताना दिसते आहे.

 

तिचं हे वर्कआऊट आणि तिच्यामध्ये फिटनेसच्या बाबतीत झालेला बदल तिच्या चाहत्यांसाठीही सुखद आहे. कारण अशाच आशयाच्या भरभरून प्रतिक्रिया तिला सोशल मिडियावर आलेल्या आहेत.

पोट- हिप्सवर वाढले चरबीचे थर? शिल्पा शेट्टी सांगते सुपर योगा, व्हा स्लिमफीट

अवघ्या काही तासांपुर्वी तिने हा व्हिडिओ शेअर  केला असून तो सोशल मिडियावर चांगलाच गाजतो आहे. या व्हिडिओमध्ये रिंकू हॅण्डस्टॅण्ड आणि चक्रासन हे दोन व्यायाम प्रकार करते आहे. दोन्ही व्यायाम प्रकार करण्यास कठीण असून त्यासाठी तुम्हाला नियमित वर्कआऊटची सवय असणं गरजेचं  आहे. परफेक्ट शेप असणारी टोन्ड बॉडी मिळविण्यासाठी ही दोन्ही आसनं अतिशय उपयोगाची ठरतात.

 

हॅण्डस्टॅण्ड करण्याचे फायदे (Benefits of Handstand)शिर्षासनासारखीच अवस्था या आसनात घेतली जाते. पण या दोन्ही प्रकारातला मुख्य फरक म्हणजे शिर्षासनात शरीराचा सगळा भार मस्तकावर असतो तर हॅण्डस्टॅण्ड प्रकारात हाताच्या तळव्यांवर असतो. सुरुवातीला भिंतीचा आधार घेऊन हा व्यायाम केला जातो. रिंकूने देखील तशाच पद्धतीने हॅण्डस्टॅण्ड केले आहे. 

डोळ्याखालची काळी वर्तुळे होतील गायब, ५ जबरदस्त फायदे; वाचा मकरमुद्रा करण्याचे महत्त्व - या वर्कआऊटमुळे हात, खांदे, पाठ आणि कंबर यांचे स्नायू बळकट होण्यास मदत होते.- रक्ताभिसरण अधिक उत्तम होण्यासाठी हा व्यायाम चांगला आहे.- हॅण्डस्टॅण्ड वर्कआऊट केल्यामुळे एकाग्रता वाढते.- हा व्यायाम केल्यामुळे मेंदूला खूप चांगल्या प्रकारे रक्तपुरवठा होतो. त्यामुळे एनर्जी मिळविण्यासाठी, सकारात्मक विचार करण्यासाठी आणि मन आनंदित, प्रफुल्लित होण्यासाठी हॅण्डस्टॅण्ड वर्कआऊट करावे.- हॅण्डस्टॅण्ड वर्कआऊटमुळे श्वसनसंस्था मजबूत होते आणि फुफ्फुसांची कार्यक्षमता वाढते.- या वर्कआऊटमुळे सगळ्या शरीराला उत्तम रक्तपुरवठा होतो. त्यामुळे संपूर्ण शरीरावर एक वेगळाच ग्लो येतो.

 

चक्रासन करण्याचे फायदे (Benefits of Chakrasana)- लिव्हर, किडनी, हृदय यांचे कार्य अधिक चांगल्या पद्धतीने होण्यासाठी चक्रासन करणे फायदेशीर मानले जाते.- पोटावरची चरबी कमी करण्यासाठी हा एक उत्तम व्यायाम मानला जातो.

फक्त ११ दिवस करा व्यायाम आणि डबल चिन गायब! बघा ४ मिनिटांचे ४ व्यायाम - चक्रासन केल्यामुळे पाठीच्या कण्याचा व्यायाम होतो. त्यामुळे बॉडी पोश्चर सुधारण्यास मदत होतो.- नियमितपणे चक्रासन केल्यास महिलांच्या पाळीच्या दिवसांतील वेदना कमी होतात. पोटदुखी तर कमी होतेच, पण खूप जास्त ब्लिडिंग होत असेल तर त्यावर देखील आराम पडतो. - हात, पाय, दंड, पाठ, मान या स्नायुंना बळकटी मिळते.- नियमितपणे चक्रासन केल्यास शरीर लवचिक होण्यास मदत होते. 

 

टॅग्स :फिटनेस टिप्सव्यायामयोगासने प्रकार व फायदेरिंकू राजगुरूइन्स्टाग्राम