कंबरेचा आणि समस्त महिला वर्गाचा जणू छत्तीसचा आकडा आहे. कारण खूप जणी कंबरदुखीने (lower back pain) अक्षरश: वैतागलेल्या असतात. अनेक जणींना पहिल्या बाळंतपणापासून हा त्रास मागे लागतो, आणि नंतर काही जन्मभर तो साथ सोडत नाही. तरुण वयात याकडे आपण दुर्लक्ष करतो, नंतर मात्र कंबरेचा त्रास सोसवत नाही. अगदी अभिनेत्री समीरा रेड्डी (Sameera Reddy) ही देखील त्याला अपवाद नाहीये बरं का.. तिला देखील मागच्या अनेक वर्षांपासून कंबरदुखी, पाठदुखीचा भयंकर त्रास होत होता. पण आता मात्र तिला बऱ्याच प्रमाणात आराम (How To Reduce Back Pain) पडला आहे. कंबरदुखीवर तिने नेमका काय उपाय (solution for reducing back pain) केला, याची माहिती तिने नुकतीच इन्स्टाग्रामवर (instagram share) एक पोस्ट शेअर केली आहे.
या पोस्टमध्ये समीरा म्हणते आहे की जेव्हा ती चित्रपट सृष्टीत काम करत होती, तेव्हापासूनच तिला पाठदुखी- कंबरदुखीचा त्रास होत होता. नंतर २ बाळंतपणं झाली. त्यात हा त्रास आणखीनच वाढला. मागच्या २ महिन्यांपासून मात्र तिला या त्रासामुळे खूपच भयंकर वेदना होत होत्या.
जेवल्यानंतर पोट फुगल्यासारखं वाटतं? फक्त ३ मिनिटांचा व्यायाम आणि पचनाचा त्रास कमी
हा त्रास कमी करण्यासाठी बॅक पेन कमी करणारे व्यायाम नियमितपणे करायला पाहिजेत, मल्टी व्हिटॅमिन्सच्या गोळ्या घेतल्या पाहिजेत, हे मला कळत होतं, पण तरीही मी त्याकडे दुर्लक्ष करत होते. पण असह्य झाल्यानंतर मी ही बाब गांभीर्यान घेतली आणि त्यावर योग्य ते उपचार सुरू केले. आता आपल्याला बऱ्याच प्रमाणात फरक पडला आहे, असं समीरा सांगते आहे.
बॅकपेन कमी करण्यासाठी समीराने केलेले उपचार- कंबरदुखी, पाठदुखीचा त्रास कमी करण्यासाठी समीरा डॉक्टरांच्या सल्ल्याने काही औषधं घेते आहे. मल्टी व्हिटॅमिन, ओमेगा ३ आणि कॅल्शियमच्या गोळ्या नियमितपणे घेत आहे.- यासोबतच तिने व्हिटॅमिन D3 चा एक महिन्याचा कोर्स डॉक्टरांच्या मार्गदर्शनानुसार पुर्ण केला.
पावसामुळे चालायला- पळायला किंवा सायकलिंगला जाता येत नाही? घरातच करा कार्डिओ वर्कआऊट, व्यायाम चुकणार नाही- शरीरातील लोहाचं प्रमाण कमी असेल तरी पाठदुखी- कंबरदुखी वाढू शकते. त्यामुळेच आहारातील लोहाचे प्रमाण वाढविण्याचाही तिने प्रयत्न सुरू केला आहे.- हे सगळे औषधोपचार तर ती करतेच आहे, पण त्या जोडीला फिजिओथेरपी आणि तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली नियमितपणे योगा, या गोष्टीदेखील तिने सुरू केल्या आहेत.- हे सगळं सुरू केल्यानंतर आता कुठे २ महिन्यांनी जरा बरं वाटतंय, असं समीरा सांगते आहे.
समीरा सांगते.. दररोज आपल्यामागे कामांचा खूप ताण असतो. शारिरीक अणि मानसिक कष्ट, तणावही असतो. हे सगळं पुर्ण करताना आपण आपल्या शरीराकडून खूप जास्त अपेक्षा ठेवतो. पण शरीराच्या गरजा मात्र लक्षात घेत नाही. त्यामुळे थोडा वेळ काढा आणि तुमच्या शरीराला फिट राहण्यासाठी काय पाहिजे आहे, ते एकदा बघा. स्वत:मध्ये, स्वत:च्या तब्येतीमध्ये इन्व्हेस्ट करणं ही सगळ्यात चांगली इन्व्हेस्टमेंट आहे, असंही ती सांगते.