अभिनेत्री शिल्पा शेट्टीच्या (Actress Shilpa Shetty) रेग्युलर वर्कआऊट पोस्ट सोशल मिडियावर चांगल्याच व्हायरल होत असतात. कधी कोणतं वर्कआऊट करावं, कसं करावं, त्याचे फायदे कोणते, याची सविस्तर माहिती शिल्पाच्या पोस्टद्वारे मिळत असते. याशिवाय ती प्रत्येक आसन किंवा वर्कआऊट प्रत्यक्ष करून दाखवत असल्याने त्याचा अधिक फायदा होतो.. आताही शिल्पाने नुकतीच तिची एक पोस्ट इन्स्टाग्रामला शेअर (instagram share) केली आहे. यामध्ये वर्कआऊटसाठी खूप वेळ देता येत नसेल तर कोणते वर्कआऊट केले पाहिजे, याबाबत शिल्पाने सांगितले आहे..
या पोस्टमध्ये ती सांगतेय की तिलाही तिच्या दिवसभराच्या शेड्यूलमधून वर्कआऊटसाठी अजिबातच वेळ नव्हता. १४ तासांचं तिचं शेड्यूल पुर्णपणे पॅक होतं. पण एवढं बिझी असूनही तिने त्यातून मार्ग काढला आणि कमीतकमी वेळेत जे काही शक्य होईल ते वर्कआऊट केलं. हे वर्कआऊट करताना शिल्पा तिच्या घरातच दिसते आहे. त्यामुळे अगदी सहज, घरच्याघरी हे वर्कआऊट करता येतं, हे यावरून लक्षात येतं. या वर्कआऊट सेशनमध्ये शिल्पाने काही स्ट्रेचेस केले, नटराजासन केलं आणि काही फ्री स्क्वॅट्स केले. यापैकी फ्री स्क्वॅट्स वर्कआऊट करण्याचे नेमके कोणते फायदे आहेत, तेदेखील तिने सांगितले आहेत..
कसे करायचे फ्री स्क्वॅट्स (Free Squats) वर्कआऊट
(How to do Free Squats?)
Squats या वर्कआऊटचे अनेक प्रकार आहेत. यापैकी एक प्रकार म्हणजे Free Squats. अशा प्रकारचा व्यायाम करायचा असेल तर सगळ्यात आधी सरळ ताठ उभे रहा. दोन्ही तळहात एकमेकांत गुंफून घ्या. हात कोपऱ्यातून वाकवा आणि छातीजवळ ठेवा. छातीला चिटकून ठेवू नका. यानंतर गुडघ्यातून वाका आणि पुन्हा सरळ उभे रहा. तुम्ही जेव्हा वाकलेले असणार तेव्हा पायाचा गुडघ्याच्या खालचा भाग आणि मांडी यांचा एकमेकांशी काटकोन झाला पाहिजे. ५, १०, १५ असं करत करत हळूहळू Free Squats करण्याची संख्या वाढवत न्यावी.
फ्री स्क्वॅट्स (Free Squats) वर्कआऊट करण्याचे फायदे (benefits)
१. पाय आणि कंबरेच्या स्नायुंना बळकटी देण्यासाठी हा व्यायाम महत्त्वाचा मानला जातो.
२. अनेक महिलांचे ओटीपोट सुटलेले असते. त्यांच्यासाठी Free Squats करणे फायद्याचे ठरेल.
३. मांड्या, पोटऱ्या आणि हिप्स या भागांवरील वाढलेली चरबी कमी करण्यासाठी उपयुक्त व्यायाम. त्यामुळे वेटलॉससाठी हा व्यायाम उपयुक्त मानला जातो.
४. गुडघे आणि पायाच्या घोट्यासाठीही हा व्यायाम फायदेशीर मानला जातो. भविष्यात गुडघेदुखी उद्भवू नये म्हणून उपयुक्त व्यायाम.
५. या व्यायामामुळे चयापचय क्रिया सुधारते. त्यामुळे शरीरावर अतिरिक्त चरबी जमा होण्याचे प्रमाण खूप कमी होते.