Join us  

नाहीये माझं शरीर आत्ता परफेक्ट पण.. श्रुती हसन सांगतेय PCOS मुळे शरीरात होणाऱ्या बदलांचा भयंकर त्रास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 30, 2022 2:09 PM

Shruti Haasan Reveals About PCOS and Endometriosis: अनेक सर्वसामान्य महिलांप्रमाणे अभिनेत्री श्रुती हसन हिलाही PCOS आणि endometriosis चा त्रास आहेच. स्वत:चा हा त्रास कमी करण्यासाठी तिनं नेमकं काय केलं, हे नुकताच एक व्हिडिओ पोस्ट करून तिने शेअर केलं आहे. (Viral video of Shruti Haasan)

ठळक मुद्देहा त्रास कमी करण्यासाठी ती नेमके काय- काय उपाय करते आहे, याची सविस्तर माहितीही तिने एक व्हिडिओ शेअर करून दिली आहे.

पीसीओएस आणि एण्डोमेट्रीओसिस (PCOS and Endometriosis) असा त्रास हल्ली अनेक जणींना जाणवत आहे. अनियमित स्वरुपाची मासिक पाळी (menstruation) आणि त्यात होणारा प्रचंड त्रास हे त्या आजाराचं स्वरुप. महिलांच्या आरोग्याच्या दृष्टीने मासिक पाळीचं चक्र नियमित असणं अतिशय गरजेचं आहे. आणि या दोन्ही प्रकारच्या आजारांमध्ये नेमकं पाळीचं सगळंच रुटीन डिस्टर्ब होतं. अभिनेत्री श्रुती हसन (Actress Shruti Haasan) हिला देखील PCOS आणि endometriosis हा त्रास आहे. शिवाय यासोबतच तिला हार्मोनल इम्बॅलेन्सचा (harmonal imbalance) त्रासही होतो, असं तिनं नुकतीच एक इन्स्टाग्राम पोस्ट शेअर (instagram share) करून सांगितलं आहे. 

 

एवढंच नाही, तर हा त्रास कमी करण्यासाठी ती नेमके काय- काय उपाय करते आहे, याची सविस्तर माहितीही तिने एक व्हिडिओ शेअर करून दिली आहे. त्यामुळे हा त्रास सहन करणाऱ्या अनेक जणींना ती करतेय ते उपाय निश्चितच फायदेशीर ठरू शकतात. पीसीओएस आणि एण्डोमेट्रीओसिस या संदर्भात डॉक्टरांच्या सल्ल्याने सुरू असणारी औषधे आणि त्याच्या जोडीला परफेक्ट वर्कआऊट असं जर नियमितपणे केलं तर नक्कीच हा त्रास कमी होण्यास मदत होईल. Work out with me अशी कॅप्शनही श्रुतीने तिच्या व्हिडिओला दिली आहे. 

 

या व्हिडिओमध्ये श्रुती पिलेट्स, योगा, वेटलिफ्टिंग, स्ट्रेचिंग असे वेगवेगळे व्यायाम करताना दिसते आहे. या पोस्टमध्ये ती म्हणतेय की हार्मोनल इम्बॅलेन्स, मेटाबोलिक प्रॉब्लेम्स आणि शिवाय पीसीओएस आणि एन्डोमेट्रीओसिस या सगळ्या त्रासांविरुद्ध लढणं सोपं नाही. पण मी या सगळ्यांकडे अतिशय सकारात्मकतेने बघते आहे आणि त्यावर मात करण्यासाठी मी काही नैसर्गिक उपाय करते आहे. योग्य आहार, पुरेशी झोप आणि रेग्युलर वर्कआऊट हे ३ उपाय करून श्रुती तिच्या आजारावर मात करते आहे. ती म्हणते की अजून मी बरी झालेली नाही my body isn’t perfect right now. पण माझं मन मात्र आनंदी आहे. हे हॅप्पी हार्मोन्स असेच माझ्या शरीरात राहोत.. माझा हा त्रास मी एक चॅलेन्ज म्हणून स्विकारला असून हा लहानसा व्हिडिओ आणि या आजारांवरील उपाय शेअर करण्याचा आपल्याला आनंद आहे, असंही तिने पोस्टच्या शेवटी म्हटलं आहे.  

 

टॅग्स :फिटनेस टिप्सश्रुती हसनमासिक पाळी आणि आरोग्यआरोग्यव्यायाम