Join us  

सुटलेले पोट कमी करायचे? ४ पैकी १ डाळ रोज खा, पोट होईल सपाट लवकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 17, 2023 3:06 PM

Add these 4 pulses to your diet for quicker weight loss : वेट लॉस, हेअर प्रॉब्लेम्स आणि त्वचेच्या समस्या सुटतील, फक्त नियमित ४ पैकी एक डाळ खा

वाढतं वजन हे अनेकांचं डोकेदुखीचं कारण बनले आहे. मुख्य म्हणजे बिघडलेल्या लाईफस्टाईलमुळे कित्येकांचं वजन झपाट्याने वाढते. योग्य आहार न घेणे, फास्ट फूड, कोल्डड्रिंक, व्यायामाचा अभाव यासह अनेक गोष्टींमुळे वजन वाढत जाते. वजन वाढलं की बॅड कोलेस्टेरॉल, हार्ट डिसीज, मधुमेह होण्याचा वाढतो. त्यामुळे वेळीच वजन वाढीवर नियंत्रण मिळवणे गरजेचं आहे. व्यायामासह आहारात देखील बदल करायला हवे. जर आपल्याला वजन कमी करायचं असेल तर, आहारात ४ डाळींचा समावेश करा(Add these 4 pulses to your diet for quicker weight loss).

मूग, तूर, मसूर, आणि चणा डाळ हे पौष्टीक तत्वांचे भांडार आहे. यामुळे शरीरातील अतिरिक्त चरबी कमी होते. याशिवाय डोळे, त्वचा, केस इत्यादी निरोगी ठेवण्यासही उपयुक्त ठरते. आहारात या ४ डाळींचा समावेश कसा करावा? यामुळे खरंच वजन कमी होते का? याची माहिती कानपूरच्या युएचएम जिल्हा रुग्णालयाच्या आयुर्वेदाचार्य डॉ. विभा वर्मा यांनी दिली आहे.

डाळींमध्ये असतात अनेक पोषक तत्व

मूग, तूर, मसूर आणि चणा डाळीमध्ये अनेक प्रकारचे पोषक घटक आढळतात. मुख्य म्हणजे यात प्रोटीन्सचे प्रमाण जास्त असते. ज्यामुळे शरीराला दिवसभर काम करण्याची उर्जा मिळते. या व्यतिरिक्त या डाळींमध्ये फायबर, मॅग्नेशियम, तांबे, पोटॅशियम आणि लोह आढळते. म्हणूनच तज्ज्ञ आपल्या आहारात डाळींचा समावेश करण्याचा सल्ला देतात.

दिवसातून दोनदा भात खाल्ला तरी वजन कमी होतं? वजन कमी करायचं तर भात बंद, हा धाक विसरा

अनेक समस्यांवर उपाय

पोषक तत्वांनी परिपूर्ण ४ डाळी खाल्ल्याने अनेक आजारांपासून आराम मिळतो. मुख्य म्हणजे बॅड कोलेस्टेरॉल कमी होते. यासह वजन कमी करण्यासही उपयुक्त ठरते. नियमित या ४ पैकी एक डाळ खाल्ल्याने केस, त्वचा आणि डोळ्यांची देखील समस्या सुटू शकते.

वजन कमी करण्यासाठी डाळींचा आहारात समवेश कसा करावा?

मूग डाळ

वाढते वजन कमी करण्यासाठी मूग डाळ अत्यंत गुणकारी मानली जाते. याच्या नियमित सेवनाने चयापचय वाढते. ज्यामुळे वजन नियंत्रित राहण्यास मदत होते. मूग डाळीचे विविध पदार्थ खाल्ल्याने पोट जास्त काळ भरलेले राहते. ज्यामुळे आपण उलट - सुलट पदार्थ खाण्यास टाळतो.

चणा डाळ

चणा डाळ वजन कमी करण्यास मदत करते. चणा डाळीमध्ये फायबर आणि प्रोटीन मुबलक प्रमाणात आढळते. एक वाटी चणा डाळ खाल्ल्याने शरीराला कॅल्शियम, लोह, प्रोटीन आणि पोटॅशियम मिळते. चणा डाळ एक सुपरफूड म्हणून ओळखले जाते. नियमित एक वाटी चणा डाळ खाल्ल्याने हृदय आणि मधुमेहाच्या रुग्णांनाही फायदा होतो. यासह कॅलरीज बर्न होण्यास मदत होते.

जेवल्यानंतर शतपावली करण्याचे ५ फायदे, जुनाट काहीतरी म्हणून नाक न मुरडता चालून तर पाहा..

तूर डाळ

वजन कमी करण्यासाठी तूर डाळ फायदेशीर ठरते. तूर डाळीमध्ये प्रोटीन, फायबर, फॉलिक ऍसिड, लोह, कॅल्शियम आणि कार्ब्स असते. ज्यामुळे भूक नियंत्रित राहण्यास मदत होते. यासह हृदयाशी संबंधित समस्यांचा धोकाही कमी होतो.

मसूर डाळ

लठ्ठपणापासून सुटका व्हावी असे वाटत असेल तर, आहारात मसूर डाळीचा समावेश करा. एक वाटी मसूर डाळीत भरपूर पोषक तत्वे असतात. त्यात कार्बोहायड्रेट्स व्यतिरिक्त अँटिऑक्सिडंट्स देखील आढळते. ज्यामुळे पोट दीर्घकाळ भरल्यासारखे वाटते. मसूर डाळ हे अँटी एजिंग फूड आहे. ज्यामुळे स्किन ग्लो करते.

टॅग्स :वेट लॉस टिप्सफिटनेस टिप्सहेल्थ टिप्स