वजन कमी (Weight Loss) करण्याआधी आपले वजन वाढण्यामागचं कारण काय? हे जाणून घेणं गरजेचं आहे. वजन वाढण्यामागे अनेक कारणे असू शकतात. वजन वाढण्यामागे ताण, हार्मोनल असंतुलन, चुकीच्या खाण्याच्या सवयी, चयापचय क्रिया मंदावणे, यासह इतर कारणांमुळे वजन वाढते. वजन वाढले की बरेच जण जेवण स्किप करतात, किंवा बराच वेळ उपाशी राहतात. पण जेवण (Meal Skip) स्किप केल्याने वजन कमी होत नसून, त्याव्यतिरिक्त इतर गंभीर आजार उद्भवतात.
वजन कमी करण्यासाठी आपण किचनमधील काही मसाल्यांचा वापर करू शकता. कोमट पाण्यात वेलची (Cardamom) घालून प्यायल्याने वजन कमी होण्यास मदत होते. वेलचीचे पाणी (Cardamom Water) प्यायल्याने वजन कसे कमी होईल याची माहिती पोषणतज्ज्ञ नेहा महाजन यांनी दिली आहे(Adding just 4 Cardamom pods to water can help in fat loss).
वजन कमी करण्यासाठी प्या वेलचीचे पाणी(Cardamom Water for Weight Loss)
- वेलचीचा वापर जेवणाची चव वाढण्यासाठी होते. एवढ्याश्या वेलचीमध्ये अनेक पौष्टीक गुणधर्म आढळतात. वेलची फक्त चावून खाल्ल्यानेही अनेक आरोग्यदायी लाभ मिळतात. वेलचीमध्ये पॉटेशियम, कॅल्शियम, मॅग्निशियम आणि अँटिऑक्सिडंट्स असतात. ज्यामुळे आरोग्याला फायदाच होतो.
८ तास नोकरी-२ तास प्रवास-व्यायाम कधी करणार? फक्त २० मिनिटं करा शतपावली, बघा वजनाची जादू
- नियमित वेलची खाल्ल्याने ब्रेन हार्मोन्स रिलॅक्स होतात. शिवाय पचनाशी संबधित समस्याही कमी होते. जर आपल्याला बद्धकोष्ठता, गॅसेस, पोट फुगणे, अपचनाची समस्या होत असेल तर, वेलचीचे पाणी प्या.
- वेलचीमध्ये मॅग्नेशियम, पोटॅशियम, कॅल्शियम आणि इतर अनेक खनिजे आढळतात. ज्यामुळे रक्त शुद्ध होते.
- नियमित वेलचीचे पाणी प्यायल्याने अनहेल्दी क्रेविंग्स कमी होतात. वेलचीमध्ये मेलाटोनिन आढळते. जे चयापचय बुस्ट करते. ज्यामुळे कॅलरीज बर्न होतात, व वजन कमी होण्यास मदत होते. शिवाय तोंडातील बॅक्टेरियाही दूर होतात.
वेलचीचे पाणी कसे तयार करायचे?(How to make Cardamom Water for Weight loss)
सर्वप्रथम, एका भांड्यात एक ग्लास पाणी घालून गरम करण्यासाठी ठेवा. पाणी गरम झाल्यानंतर त्यात ४ सोळलेली वेलची घाला. पाण्याला उकळी आल्यानंतर गॅस बंद करा, व पाणी गाळून रोज रात्री झोपण्यापूर्वी प्या.