बदलत्या जीवनशैलीनुसार व्यायाम हा आपल्या रोजच्या रुटीनचा एक भाग झाला आहे. आजकाल आपल्याला बरेचे लोक आपल्या हेल्थची विशेष काळजी घेताना दिसतात. व्यायाम करण्यासाठी आपण जिम, झुंबा, डान्स अशा वेगवगेळ्या अॅक्टिव्हिटी करतो. जिममध्ये नॉर्मल कार्डिओ अॅक्टिव्हिटी करण्यासाठी आपण ट्रेडमिलचा वापर करतो. आपल्यापैकी बऱ्याचजणांना ट्रेडमिलवर चालणे किंवा धावणे आवडत असेल. जिममध्ये गेल्यावर आपण ट्रेडमिलसोबतच इतर एक्सरसाइज देखील करतो. कधी आवण घाई गडबडीत असू किंवा एक्सरसाइज करण्यासाठी वेळ नसल्यांस आपण किमान ट्रेडमिलवर १५ ते २० मिनिटे चालण्याचा व्यायाम तर नक्कीच करतो. जर आपल्याला ट्रेडमिलवर कसे धावायचे, चालायचे माहिती नसल्यास इजा होण्याची शक्यता असते. तसेच जर आपण जिममध्ये नवीन असाल आणि ट्रेडमिलचा वापर कसा करायचा हे माहित नसल्यास आपल्यासाठी काही खास टीप्स आहेत, त्या जाणून घेऊयात(Advice - Tips For Running First Time On Treadmill).
नक्की काय खबरदारी घ्यावी?
१. ट्रेडमिल हँडलचा जास्त वापर टाळा - जर आपण पहिल्यांदाच ट्रेडमिलचा वापर करत असाल तर ट्रेडमिलच्या हॅण्डल्सना वारंवार पकडणे टाळा. आपल्यापैकी काहीजण ट्रेडमिलचा पहिल्यांदाच वापर करत असल्यामुळे त्यांना भीती वाटते. अशावेळी ते ट्रेडमिलचे हॅण्डल्स हातांनी गच्च पकडून ठेवतात. असे जास्त वेळ केल्यास आपल्या खांद्यांच्या आणि हातांच्या कोपरा जवळील स्नायूंना इजा होऊ शकते.
२. समोर पाहा - ट्रेडमिलवर चालताना किंवा धावताना कायम समोर पाहत राहा. ट्रेडमिलवर आपल्या पायाखाली असणाऱ्या धावत्या पट्ट्यांवरून आपण धावत किंवा चालत असतो. जर आपण इकडे - तिकडे पाहिल्यास किंवा आपले लक्ष विचलित झाल्यास पाय सटकून खाली पडू शकतो. म्हणून हा छोटा अपघात टाळण्यासाठी कायम समोर पाहून चालावे किंवा धावावे.
३. चालत्या ट्रेडमिलवरून उतरू नका - ट्रेडमिलचा वापर पहिल्यांदा करणाऱ्या व्यक्तीने कधीच चालत्या ट्रेडमिलवरून उतरण्याचा प्रयत्न करू नये. असे केल्यास आपल्याला इजा होऊ शकते. ट्रेडमिलवरून उतरण्यासाठी सर्वप्रथम आधी ट्रेडमिलचे शट- ऑफ बटन दाबावे यामुळे ट्रेडमिल बंद होईल. त्यानंतरच ट्रेडमिलवरून खाली उतरावे.
४. स्पीड नियंत्रणात ठेवा - ट्रेडमिलवर चालण्याचा किंवा धावण्याचा व्यवस्थित सराव पूर्ण होत नाही तोपर्यंत ट्रेडमिलचा स्पीड वाढवू नये. आपल्याला ट्रेडमिलवर चालण्याची व धावण्याची सवय झाली की मग हळुहळु स्पीड वाढवत न्यावा. ट्रेडमिलचा वापर करताना आपण आपला बॅलन्स व्यवस्थित सांभाळू शकत आहे याची खात्री पटल्यानंतरच ट्रेडमिलचा स्पीड वाढवा. ट्रेडमिलचा स्पीड एकदम वाढवू नये एक एक स्टेप्सनुसार स्पीड वाढवावा.
५. पायातील बूट / शूज - ट्रेडमिलवर एक्सरसाइज करण्याआधी पायांना योग्य आणि कम्फर्टेबल वाटतील असे बूट किंवा शूज घ्यावेत. पायांच्या योग्य मापानुसारच शूज घ्यावेत. शूज घाल्यामुळे आपण कम्फर्टेबल फिल कराल. यामुळे आपल्याला ट्रेडमिलवर चालणे किंवा धावणे सोपे होईल.
६. स्वतःचा तोल सावरा - ट्रेडमिलवर एक्सरसाइज करण्यासाठी पहिल्यांदाच येत असाल तर सर्वात आधी स्वतःचा तोल सावरायला शिका. स्वतःचा तोल सावरता आला नाही तर तुम्ही ट्रेडमिलवरून पडू शकता.
७. वॉर्मअप करा - कोणताही एक्सरसाइज करण्याआधी वॉर्मअप करण्याची सवय ठेवा. वॉर्मअप केल्यामुळे शरीरातील स्नायूंना चालना मिळून आपले शरीर एक्सरसाइज करण्यासाठी तयार होते. यासाठी हेव्ही वर्कआऊट करण्याआधी वॉर्मअप करणे गरजेचे असते.