Join us  

वजन कमी झाल्यानंतर स्किन सैल पडली, ५ व्यायाम, मसल्स होतील टोन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 18, 2022 5:01 PM

Muscles Toned हातावरील मांस तेव्हाच सैल पडते जेव्हा त्यामध्ये चरबी जमू लागते. ही समस्या महिलांमध्ये जास्त प्रमणात दिसते.

बऱ्याच लोकांचे शरीरापेक्षा हात आणि पाय खूप जाड दिसतात. हातावर जर जास्त चरबी जमा झाली असेल, तर हात अगदीच थुलथुलीत दिसतात. हातावरील मांस तेव्हाच सैल पडते जेव्हा त्यामध्ये चरबी जमू लागते. ही समस्या महिलांमध्ये जास्त प्रमणात दिसते. त्यामुळे अनेक जण मोठ्या बाह्यांचे कपडे घालण्यास प्राधान्य देतात. कारण छोट्या बाह्यांच्या कपड्यांमुळे हात खूप जाड दिसतात. पूर्ण शरीराचं वजन कमी करण्यासाठी आपल्याला दहा ठिकाणावरून दहा सल्ले मिळत असतात. परंतु हातामध्ये जमा झालेली चरबी कमी करण्यासाठी नक्की काय करायचं याबद्दल कोणीही सांगत नाही. पण यावर नक्कीच उपाय आणि व्यायाम आहेत, जेणेकरून हातावरील अतिरिक्त चरबी कमी करण्यास मदत मिळेल. या लेखातून हातावरील चरबी कमी करण्यासाठी काही उपाय आणि व्यायामाची माहिती देण्यात आली आहे. 

आर्म टोन करण्यासाठी व्यायाम

स्विमिंग

हात टोन करण्यासाठी व्यायाम महत्त्वाचा आहे. वजन कमी करूनही आपली त्वचा घट्ट राहावी असे वाटत असेल, तर पोहणे या व्यायामाला नित्यक्रमात समावेश करा. यामुळे, तुमच्या हातांचे स्नायू स्विंग होणार नाहीत, मात्र घट्टपणा कायम राहील.

पुश अप होल्ड

पुश अप होल्ड व्यायाम करून तुम्ही तुमच्या सैल झालेल्या हातांची त्वचा टोन करू शकता. याशिवाय तुम्ही ओव्हरहेड ट्रायसेप्स देखील करू शकता. जेणेकरून हातातील चरबी कमी झालेल्या जागेवर घट्टपणा येईल.

डॉल्फिन पोज

आपण डॉल्फिन पोज देखील करू शकता. हे आपले हात टोन करण्यासाठी मदत करेल. या व्यायामाचा उपयोग, वृद्ध महिलांमध्ये सैल हात घट्ट करण्यासाठी आणि टोन करण्यासाठी केला जातो.

रेझिस्टन्स ट्रेनिंग एक्सरसाइज

रेझिस्टन्स ट्रेनिंग एक्सरसाइज स्किनला टाईट करण्यासाठी सर्वोत्तम आहेत. तसेच, हा स्नायूंच्या ताकदीचा व्यायाम आहे. याशिवाय धावणे आणि उडी मारणे, या व्यायामाचा देखील दैनंदिन आयुष्यात समावेश करू शकता.

प्लॅन्क आर्म एक्सरसाईज

प्लॅन्क आर्म एक्सरसाईज हा व्यायाम करण्याचा फायदा असा आहे की, यामुळे केवळ तुमचे हातच नाही तर तुमच्या हातावरील मसल्सही मजबूत आणि सुडौल बनतात. त्यामुळे वजन कमी करण्यासह हाताला शेपमध्ये आणण्यासाठी हा व्यायाम करा.

टॅग्स :फिटनेस टिप्समहिलाव्यायाम