Lokmat Sakhi >Fitness > हिना खानचा एअर योगा! फिट राहण्यासाठी बघा कसा करतेय जबरदस्त व्यायाम...

हिना खानचा एअर योगा! फिट राहण्यासाठी बघा कसा करतेय जबरदस्त व्यायाम...

Air yoga by actress Hina Khan: अभिनेत्री हिना खानचा एक फिटनेस व्हिडिओ सध्या सोशल मिडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. बघा फिट राहण्यासाठी ती कसा व्यायाम करते आहे..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 25, 2022 08:04 AM2022-09-25T08:04:29+5:302022-09-25T08:05:02+5:30

Air yoga by actress Hina Khan: अभिनेत्री हिना खानचा एक फिटनेस व्हिडिओ सध्या सोशल मिडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. बघा फिट राहण्यासाठी ती कसा व्यायाम करते आहे..

Air yoga by actress Hina Khan, How to do air yoga? | हिना खानचा एअर योगा! फिट राहण्यासाठी बघा कसा करतेय जबरदस्त व्यायाम...

हिना खानचा एअर योगा! फिट राहण्यासाठी बघा कसा करतेय जबरदस्त व्यायाम...

Highlightsतिचा हा अवघड व्यायाम तिच्या चाहत्यांना चांगलाच आवडला असून व्हिडिओ सोशल मिडियावर जबरदस्त व्हायरल झाला आहे. 

मलायका अरोरा, करिना कपूर, जान्हवी कपूर, शिल्पा शेट्टी या बॉलीवूडच्या अभिनेत्री त्यांच्या रोजच्या व्यायामाबाबत, फिटनेसबाबत (fitness tips by actress Hina Khan) जशा पक्क्या आहेत, तशी छोट्या पडद्यावरची प्रसिद्ध अभिनेत्री हिना खान ही देखील तिच्या वर्कआऊटबाबत (fitness workout) अतिशय शिस्तशीर आहे. हिना सहजासहजी तिचं रोजचं वर्कआऊट सोडत नाही. कधी स्विमिंग- जीम तर कधी योगा अशा पद्धतीचा तिचा व्यायाम नेहमीच सुरू असतो. हिनाने नुकताच तिचा एक व्हिडिओ सोशल मिडियावर (viral video of Hina Khan) अपलोड केला असून यात ती एअर योगा हा व्यायाम प्रकार करताना दिसते आहे.

 

एअर योगा हा व्यायाम प्रकार नेहमीच्या योगापेक्षा खरोखरच अतिशय वेगळा आणि अवघड आहे. जोपर्यंत तुम्हाला रोजच्या व्यायामाची सवय नसते, तुमचा फिटनेस एका उच्च लेव्हलपर्यंत पोहोचलेला नसतो, तोपर्यंत तुम्हाला एअर योगा जमणे शक्य नाही. कारण एअर योगासाठी शरीर अतिशय लवचिक पाहिजे असते, जेणेकरून चपळाईने हालचाली करता येतील. हिनाचा फिटनेस त्या लेव्हलचा आहे, म्हणूनच ती अतिशय सराईतपणे हा व्यायाम करते आहे. 

 

या व्हिडिओमध्ये हिना एका दोरीवर उभी आहे. झोक्याप्रमाणे ही दोरी असून हिना त्यावर दोन्ही पाय रोवून उभी राहिली. तिने पाय त्यात अडकवले आणि आणि हळूहळू गुडघ्यातून वाकून ती दोरीवर मांडी घालून बसल्याप्रमाणे बसली. दोन्ही हातही तिने सोडून दिले आणि अशा पद्धतीने बॅलेन्स टिकवून ठेवण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर तिने त्यावरच डोके खाली करून शिर्षासन करावे, त्यापद्धतीने व्यायाम केला. तिचा हा अवघड व्यायाम तिच्या चाहत्यांना चांगलाच आवडला असून व्हिडिओ सोशल मिडियावर जबरदस्त व्हायरल झाला आहे. 

 

 

Web Title: Air yoga by actress Hina Khan, How to do air yoga?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.