बॉलीवूडचा अभिनेता अक्षय कुमार हा सर्वात फिट आणि तंदुरुस्त कलाकार आहे (Akshay Kumar). तो त्याच्या फिटनेसमुळे कायम चर्चेत असतो. वयाच्या ५६ वर्षीही इतकं फिट राहणं अनेकांना जमेलच असे नाही (Fitness). अक्षयच्या फिटनेसचं रहस्य काय? या वयातही तो चित्रपटांमध्ये यंग आणि फिट दिसतो (Health Care). शिवाय अॅक्शन सीन्सही करतो.
अक्षय फिट राहण्यासाठी आहार आणि व्यायामयाकडे बारकाईने लक्ष देतो. त्याची सकाळी उठणे आणि झोपण्याची वेळ ही ठरलेली असते. आपण पाहिलं असेल अक्षय कायम एनर्जेटिक असतो. अक्षय नक्की कोणतं रुटीन फॉलो करतो? पन्नाशीतही जर आपल्याला तिशीप्रमाणे यंग दिसायचं असेल तर, अक्षय फॉलो करतो, ते रुटीन फॉलो करा. वजन नियंत्रणात आणि कायम एनर्जेटिक राहाल(Akshay Kumar says he wakes up at 4am, spends time with himself).
निरोगी आहार
अक्षय कुमारचा आहार खूप आरोग्यदायी आहे. तो हलका आणि पोषक आहार घेतो, ज्यामुळे त्याला भरपूर ऊर्जा आणि शक्ती मिळते.
बसायला जागा मिळवायची म्हणून पाहा महिला कशी चढली गाडीत.. कौतुक करावं की..
अक्षयच्या आहारात कोणते पदार्थ नाही?
अक्षय नेहमी पौष्टीक आणि आरोग्यदायी पदार्थ खातो. अक्षय तेलकट पदार्थ, मीठ आणि मसाले खाणे टाळतो. तो भाजलेले आणि उकडलेले अन्न खातो.
रात्री उशिरा खाणं टाळतो
अक्षय कुमारच्या फिटनेसच्या रहस्यामागे लवकर जेवण करणे हे देखील आहे. अक्षय नेहमी ७ च्या आत जेवण करतो. यानंतर तो पाण्याशिवाय काहीही खाणे किंवा पिणे टाळतो.
दिवसाची सुरुवात लवकर करतो
अक्षय आपल्या दिवसाची सुरवात ४: ३० वाजता करतो. तो रात्री लवकर झोपतो आणि सकाळी लवकर उठतो. याचे अनेक आरोग्यदायी फायदे आहेत. यामुळे सर्कॅडियन लय नियंत्रित राहते, व मानसिक आणि शारीरिक आरोग्य राखण्यास मदत होते.
मुलांशी सतत वादावादी-कडाक्याची भांडण? जनरेशनवर गॅप विसरा, करा फक्त ४ गोष्टी-मुलांशी पटेल मस्त
सकाळी उठल्याबरोबर १ काम अवश्य करतो
अक्षय कुमार पहाटे साडेचार वाजता उठतो आणि धावायला जातो. रनिंग केल्याने शरीरातील अतिरिक्त कॅलरीज बर्न होतात, आणि शरीर फिट राहण्यास मदत होते.