Lokmat Sakhi >Fitness > मासिक पाळीतल्या वेदना- पायदुखी होईल कमी,आलिया भटची फिटनेस ट्रेनर सांगतेय एक खास योगासन

मासिक पाळीतल्या वेदना- पायदुखी होईल कमी,आलिया भटची फिटनेस ट्रेनर सांगतेय एक खास योगासन

Benefits Of Virasana: मासिक पाळीतल्या वेदना, पाय दुखणं कमी करण्यासाठी तसेच पचनक्रिया सुधारण्यासाठी हे एक योगासन नियमित करावं, असा सल्ला सेलिब्रिटी फिटनेस ट्रेनर अंशुका परवानी ( Anshuka Parwani) यांनी दिला आहे.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 8, 2023 08:04 AM2023-01-08T08:04:31+5:302023-01-08T08:05:02+5:30

Benefits Of Virasana: मासिक पाळीतल्या वेदना, पाय दुखणं कमी करण्यासाठी तसेच पचनक्रिया सुधारण्यासाठी हे एक योगासन नियमित करावं, असा सल्ला सेलिब्रिटी फिटनेस ट्रेनर अंशुका परवानी ( Anshuka Parwani) यांनी दिला आहे.

Alia Bhat's fitness trainer Anshuka Parwani suggests yoga for reducing menstrual pain and cramps in leg | मासिक पाळीतल्या वेदना- पायदुखी होईल कमी,आलिया भटची फिटनेस ट्रेनर सांगतेय एक खास योगासन

मासिक पाळीतल्या वेदना- पायदुखी होईल कमी,आलिया भटची फिटनेस ट्रेनर सांगतेय एक खास योगासन

Highlightsपाेट, कंबर, पोटऱ्या आणि मांड्यांवरची चरबी कमी करण्यासाठी उपयुक्त योगासन. कधी कधी पाय खूप दुखतात किंवा वातामुळे पोटऱ्यांमध्ये गोळा येण्याचा त्रास होतो. हा त्रास कमी करण्यासाठी विरासन उपयुक्त ठरते. 

मासिक पाळीच्या काळातलं प्रत्येकीचं दुखणं वेगवेगळं असतं. कुणाचं खूपच पोट दुखतं (yoga for reducing menstrual pain), तर कुणाला खूपच ब्लिडींग होतं. काही जणींना तर पाळी येण्याच्या काही दिवसआधी आणि पाळीदरम्यानही पोटऱ्यांमध्ये गोळे (cramps in leg) आल्यासारखं होतं. हा त्रास कमी करायचा असेल शिवाय मांड्या, कंबर, पोटऱ्या येथील फॅट्स कमी करून इंचेस लॉस करायचा असेल तर त्यासाठी विरासन (Benefits Of Virasana) नियमितपणे करावं, असा सल्ला आलिया भट, करिना कपूर यांची फिटनेस ट्रेनर अंशुका परवानी  (Anshuka Parwani) यांनी दिला आहे. ते आसन कसं करायचं आणि त्याचे नेमके फायदे काय, याविषयीचा व्हिडिओ त्यांनी इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे.

कसं करायचं विरासन?
१. विरासन करण्यासाठी सगळ्यात आधी वज्रासनात बसा. त्यानंतर हळूहळू दोन्ही तळपाय दोन्ही बाजूंनी बाहेर काढा.

२. आता हळूहळू हाताचे कोपरे जमिनीवर टेकवा आणि हाताचा आधार घेत मागे सरकत पाठीवर झोपा.

ब्राऊन राईस डोसा, फिटनेस फ्रिक असाल तर असा डोसा खा- तब्येतीची पुरेपूर काळजी, बघा सोपी रेसिपी

३. पाठीवर झोपल्यानंतरही पायांची अवस्था बदलू नका. दोन्ही हात दोन्ही बाजूंनी जमिनीवर ठेवा किंवा पोटावर ठेवा.

४. ही आसनस्थिती ३० ते ३५ सेकंद टिकविण्याचा प्रयत्न करा. 

५. arthritis किंवा osteoporosis चा त्रास असेल, पाठीच्या मणक्याला काही दुखापत झाली असेल, तर हे आसन करू नये, असा सल्लाही अंशुका यांनी दिला आहे. 

 

विरासन करण्याचे फायदे
१. हे आसन नियमितपणे केल्यास पाळीच्या दिवसांतली पोटदुखी कमी होते. मासिक पाळीच्या काळातही तुम्ही हे आसन करू शकता.

२. कधी कधी पाय खूप दुखतात किंवा वातामुळे पोटऱ्यांमध्ये गोळा येण्याचा त्रास होतो. हा त्रास कमी करण्यासाठी विरासन उपयुक्त ठरते. 

बाप रे बाप! समंथा प्रभुच्या पर्सची किंमत तब्बल २.५ लाख, पाहा या लाखमोलाच्या पर्सची खासियत...

३. पचनक्रिया सुधारण्यासाठी फायदेशीर

४. पाेट, कंबर, पोटऱ्या आणि मांड्यांवरची चरबी कमी करण्यासाठी उपयुक्त योगासन. 

 

Web Title: Alia Bhat's fitness trainer Anshuka Parwani suggests yoga for reducing menstrual pain and cramps in leg

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.