Lokmat Sakhi >Fitness > आई झाल्यानंतर पहिल्यांदाच आलियाने घातले तब्बल १०८ सूर्यनमस्कार! बाळ लहान असताना इतका व्यायाम योग्य की अयोग्य, तज्ज्ञ सांगतात....

आई झाल्यानंतर पहिल्यांदाच आलियाने घातले तब्बल १०८ सूर्यनमस्कार! बाळ लहान असताना इतका व्यायाम योग्य की अयोग्य, तज्ज्ञ सांगतात....

Alia Bhatt Done 108 Surya Namaskar Fitness Tips For New Moms : बाळंतपणानंतर व्यायाम जरुर करावा, मात्र त्यासाठी योग्य तज्ज्ञ सल्ला फार आवश्यक असतो.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 30, 2023 02:07 PM2023-01-30T14:07:19+5:302023-01-30T14:18:31+5:30

Alia Bhatt Done 108 Surya Namaskar Fitness Tips For New Moms : बाळंतपणानंतर व्यायाम जरुर करावा, मात्र त्यासाठी योग्य तज्ज्ञ सल्ला फार आवश्यक असतो.

Alia Bhatt Done 108 Surya Namaskar Fitness Tips For New Moms : For the first time after becoming a mother, Alia did as many as 108 Surya Namaskars! So much exercise is right or wrong when the baby is young, experts say.... | आई झाल्यानंतर पहिल्यांदाच आलियाने घातले तब्बल १०८ सूर्यनमस्कार! बाळ लहान असताना इतका व्यायाम योग्य की अयोग्य, तज्ज्ञ सांगतात....

आई झाल्यानंतर पहिल्यांदाच आलियाने घातले तब्बल १०८ सूर्यनमस्कार! बाळ लहान असताना इतका व्यायाम योग्य की अयोग्य, तज्ज्ञ सांगतात....

बाळंतपण म्हणजे प्रत्येक महिलेच्या आयुष्यातील एक महत्त्वाचा भाग. शारीरिक, मानसिक, भावनिकदृष्ट्या नव्या आव्हानांचा सामना करत असताना बाळाला सांभाळायची नवी जबाबदारी अंगावर येते. एकीकडे बाळ आणि दुसरीकडे आपला फिटनेस सांभाळायचा ही तारेवरची कसरत सगळ्याच महिला करत असतात. आपण बाळ होण्याआधी फिट होतो आणि आता आपले वजन वाढले असा कॉम्प्लेक्सही अनेकींना या काळात येतो. त्यासाठी आपण आधीपासून फिटनेसकडे पुरेसे लक्ष द्यायला हवे. प्रेग्नन्सीनंतर व्यायाम करावा का, किती करावा असे काही प्रश्न आपल्याला पडत असतात. त्यातच आलिया भटने अवघ्या २.५ ते ३ महिन्यांचे बाळ असताना आपले फिटनेस रुटीन सुरू केल्याचे दिसते. नुकतेच तिने १०८ सूर्यनमस्कार घातले. त्याची चर्चा आहे, पण हे सर्वांनी करणं योग्य ठरतं का? (Alia Bhatt Done 108 Surya Namaskar Fitness Tips For New Moms).

६ नोव्हेंबरला आलियाने राहाला जन्म दिला आणि कपूर कुटुंबात परीचे आगमन झाले. राहा जवळपास २ महिन्यांची झाल्यानंतर आलियाने फिटनेसकडे लक्ष द्यायला सुरुवात केली. तिचे व्यायाम करतानाचे काही फोटो आणि व्हिडिओही सोशल मीडियात मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले. प्रेग्नन्सीआधी स्लिम फिट असलेल्या आलियाचे बाळंतपणानंतर थोडे वजन वाढले. प्रसिद्ध सेलिब्रिटी फिटनेस ट्रेनर अंशुका परवानी हिच्याकडे फिटनेसचे धडे घेणाऱ्या आलियाने १०८ सूर्यनमस्कार घातल्याचे अंशुकाने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन सांगितले. बाळ झाल्यानंतर पहिल्यांदाच अशाप्रकारे सूर्यनमस्कार घातल्यावर कसे वाटले असे विचारले असता आलियाने ‘पॉवरफूल’ असे सांगितले. 


अशाप्रकारे व्यायाम करावा की नाही?

आता बाळ इतके लहान असताना आणि सिझेरीयन पद्धतीने बाळंतपण झाले असताना अशाप्रकारे व्यायाम करणे कितपत योग्य आहे असा प्रश्न आपल्याला साहजिकच पडू शकेल. तर याबाबत प्रसिद्ध योग अभ्यासक मनाली मगर-कदम म्हणतात, कोणत्याही पद्धतीचा व्यायाम करताना योग्य ते मार्गदर्शन घेऊनच करायला हवा. आधीपासून आपल्या शरीराला व्यायामाची सवय असेल तर अशाप्रकारे सूर्यनमस्कार आपण घालू शकतो. पण नव्यानेच व्यायामाला सुरुवात करत असाल तर आधी तज्ज्ञांचा सल्ला जरुर घ्यायला हवा. सूर्यनमस्काराने शरीराला, मनाला बरेच फायदे होत असले तरी बाळंतपणानंतर शरीर काहीसे हलके झालेले असते, त्यातही सिझेरीयन असेल तर ३ महिन्यानंतर आणि नॉर्मल असेल तर १.५ महिन्यानंतर आपण सूर्यनमस्कार घालू शकतो. यातही सुरुवातीला ६ मग १२, मग १८ असे करत आकडे वाढवत न्यायला हवेत. एकदम जास्त व्यायाम केला तर शरीरातील साखर कमी होऊन ॲसिडीटी वाढण्याची शक्यता असते. त्याचा आईच्या दुधावर आणि त्यामुळे बाळावर विपरीत परिणाम होऊ शकतो. त्यामुळे आलियासारखा फिटनेस ठेवण्याचा प्रयत्न तुम्ही करत असाल तरी योग्य ती काळजी घेऊनच या गोष्टी करायला हव्यात.

Web Title: Alia Bhatt Done 108 Surya Namaskar Fitness Tips For New Moms : For the first time after becoming a mother, Alia did as many as 108 Surya Namaskars! So much exercise is right or wrong when the baby is young, experts say....

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.