आलिया भट. सौंदर्य, अदाकारी व अभिनयाच्या जोरावर तिने सिनेसृष्टीत आपली वेगळी छबी उमटवली. सध्या आपल्या पोस्ट प्रेग्नेंसी फिटनेसने तिने अनेकांचं लक्ष वेधून घेतलं आहे. मुलगी राहा कपूरच्या जन्माच्या काही आठवड्यांनंतर, आलियाने तिच्या फिटनेसवर लक्ष केंद्रित करण्यास सुरुवात केली. तिने जिमसह योगाभ्यास केला.
नुकतेच एका मुलाखतीत तिने गर्भधारणेनंतर तिच्या शरीरात होणारे बदल, व प्रसूतीनंतरचे वजन कमी करण्याची गरज याबद्दल माहिती दिली(Alia Bhatt on why she 'had to lose weight' after daughter Raha Kapoor's birth).
अतिशय देखण्या आणि फिट अभिनेत्री पाहा रोज ब्रेकफास्ट काय करतात? कोणते पदार्थ खातात..
गर्भधारणेनंतर वजन कमी करणे महत्वाचे का आहे?
ईटाईम्सला दिलेल्या मुलाखतीत आलिया म्हणते, ''मुलाच्या जन्मानंतर महिलेच्या शरीरावर लक्ष केंद्रित केले जाते. गरोदरपणानंतर महिलांना आकर्षक आणि सडपातळ दिसायचे असते, त्यांना या गोष्टींची खूप काळजी वाटते. मला माझ्या वाढलेल्या वजनावरुन खूप दडपण यायचे. कारण अनेक चित्रपटांचे शुटींग बाकी होते. मला वजन कमी करून तंदुरुस्त राहायचे आहे.'
भूमी पेडणेकरने कमी केलं ३२ किलो वजन, पण कसं? आईचा सल्ला तिने ऐकला आणि...
मला मुख्य म्हणजे या विषयावर मोकळेपणाने बोलायचे आहे, प्रेग्नेंसीनंतर वजन कमी करण्यासाठी महिला खूप मेहनत घेतात, त्यांना स्वतःच्या शरीरासाठी संघर्ष करावा लागतो. पुन्हा त्याच आकारात परत येणं सोपी गोष्ट नाही. त्या सर्व महिलांच्या वेदना आणि संघर्ष मी आता चांगल्या प्रकारे समजू शकते.
फिट राहण्यासाठी वजन कमी करा
आलियाच्या मते, ''महिलांना गर्भधारणेपूर्वीच वजन वाढवल्यानंतर आपण कसे दिसू याची चिंता वाटू लागते. पण, मी म्हणेन की काहीही असो आपण आपल्या शरीराचा स्वीकार करायला हवा, आपल्या शरीराचा आदर करा. मी खाण्यापिण्याची खूप शौकीन आहे, पण मला वजनही कमी करायचे आहे. त्यामुळे आता मला निरोगी राहण्यासाठी वजन कमी करायचे आहे.
वजन कमी करण्याच्या काही टिप्स
रोजच्या आहारात प्रथिनांचे प्रमाण वाढवा.
ऋतूनुसार हिरव्या भाज्या आणि उपलब्ध सर्व भाज्या खा.
सकाळी आणि संध्याकाळी दररोज चाला.
योगासनांचा सराव करा.